Sharad Pawar : शरद पवारांनी PM मोदींना डिवचलं, ''विधानसभेतही महाराष्ट्रात सभा...''
Sharad Pawar News : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात 18 सभा झाल्या आणि एक रोड शो झाला. त्यांच्या या 18 सभा ज्या ठिकाणी झाल्या आणि रोड शो ज्या ठिकाणी झाले, त्या ठिकाणी आमच्या उमेदवाराला जनतेने मोठ्या प्रमाणावर पाठिंबा दिला.
ADVERTISEMENT
Sharad Pawar On PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात 18 सभा झाल्या आणि एक रोड शो झाला. ज्या ठिकाणी मोदींच्या सभा झाल्या, त्या ठिकाणी आमच्या उमेदवाराला जनतेने मोठ्या प्रमाणावर पाठिंबा दिला. त्यामुळे मोदींचे आभार मानणे ही माझे कर्तव्य समजतो, अशा शब्दात शरद पवारांनी (Sharad Pawar) पंतप्रधान मोदींना (Pm Narendra Modi) डिवचलं. (sharad pawar criticize pm narendra modi on lok sabha election rally on maharashtra 2024 maha vikas aghadi meeting y b center)
ADVERTISEMENT
वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये आज महाविकास आघाडीची बैठक पार पडली. या बैठकीला शरद पवार, उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात, संजय राऊत पृथ्वीराज चव्हाण, जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील, आदित्य ठाकरे आदी नेते उपस्थित होते. या बैठकीनंतर महाविकास आघाडीने संयुक्त पत्रकार परिषद घेतली.
हे ही वाचा : 'मुख्यमंत्र्यांनी दाढी वाढवणं चांगलं पण दाढीवाल्याला...', मनसे नेता संतापला!
या पत्रकार परिषदेतून बोलताना शरद पवारांनी मोदींना चिमटा काढला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात 18 सभा झाल्या आणि एक रोड शो झाला. त्यांच्या या 18 सभा ज्या ठिकाणी झाल्या आणि रोड शो ज्या ठिकाणी झाले, त्या ठिकाणी आमच्या उमेदवाराला जनतेने मोठ्या प्रमाणावर पाठिंबा दिला. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या काळात पंतप्रधान मोदींच्या जितक्या अधिक सभा आणि दौरे होतील. तेवढी आमची स्पष्ट बहुमताच्या दिशेने वाटचाल होईल. त्यामुळे त्यांना ही धन्यवाद देणे माझं कर्तव्य समजतो, अशा शब्दात पवारांनी पंतप्रधान मोदींना डिवचलं.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
हे ही वाचा : अजित पवारांच्या राष्ट्रवादीने भुजबळांना का दिली नाही उमेदवारी? 'हा' आहे प्लॅन
ऑर्गनायझर या साप्ताहिकात अजित पवारांमुळे भाजपची ब्रँड वॅल्यु कमी झाल्याचा आरोप करण्यात आला होता. या आरोपावर शरद पवारांना प्रश्न विचारण्यात आला होता.यावर शरद पवार म्हणाले, भाजपला जो काही अनुभव आला, त्यांनी तो सांगितला. यात आम्ही काय बोलू इच्छित नाही,असे शरद पवारांनी सांगितले.
तसेच अजित पवारांना सोबत घेणार का? असा सवाल शरद पवारांना विचारण्यात आला होता.यावर शरद पवार म्हणाले, अजित पवारांना सोबत घेण्याचा प्रश्नच येत नाही. उद्धव ठाकरे यांनी देखील मला सोडून गेलेल्यांना अजिबात परत घेणार नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली. महाविकास आघाडी म्हणून आम्ही तीन पक्ष आणि इतर काही सामाजिक संघटना आणि छोटे पक्ष मिळून आगामी विधानसभा निवडणूक लढणार आहोत, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT