Sharad Pawar : "एवढं स्पष्ट बहुमत मिळूनही जर..." पुण्यात शरद पवारांचं मोठं विधान

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पुण्यात बाबा आढाव यांचं आत्मक्लेष उपोषण

point

बाबा आढाव यांच्या भेटीला शरद पवार

point

शरद पवार यांचा महायुतीवर निशाणा

Sharad Pawar on Mahayuti : राज्यात विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होऊन आठ दिवस उलटले आहेत, मात्र मुख्यमंत्री कोण होणार याबाबत महायुतीचा अंतिम निर्णय झालेला नाही. त्यामुळे महायुतीवर निशाणा साधण्याचं आयतं कोलित महाविकास आघाडीच्या नेत्यांना मिळालं आहे. अशातच शरद पवार यांनी महायुतीवर टीका करत, सत्तास्थापनेसाठी वेळ लागत असल्यानं हा महाराष्ट्राच्या जनादेशाचा अनादर असल्याचं म्हटलं आहे.निवडणुकांमध्ये पैशांचा आणि सत्तेचा गैरवापर आणि इव्हीएम प्रकरणावरुन गंभीर आरोप करत बाबा आढाव यांनी पुण्यात आत्मक्लेष उपोषण सुरू केलं आहे. याठिकाणी शरद पवार यांनी भेट दिली असताना ते बोलत होते.

ADVERTISEMENT

एवढं स्पष्ट बहुमत असूनही अद्याप सरकार स्थापन झालेले नाही. याचा स्पष्ट अर्थ असा होतो की, त्यामुळे जनतेने दिलेल्या बहुमताची किंमत महायुतीला नाही. सध्या जे काही सुरू आहे ते राज्यासाठी योग्य नाही. तसंच राज्यातील लोकांमध्ये या निकालानंतर अस्वस्थता निर्माण झाल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे. 

राज्याच्या विधासनभा निवडणुकीत सत्तेचा आणि पैशाचा गैरवापर करण्यात आल्याचा आरोप शरद पवार यांनी केला. त्यामुळे लोकांमध्ये अस्वस्थता वाढली आहे असंही ते म्हणाले. तसंच या मुद्द्यावर आता जनतेला जनआंदोलन तयार करावं लागेल असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. देशातील संसदीय लोकशाही व्यवस्था नष्ट होईल असं वाटतंय. विरोधी पक्षनेते संसदेत या मुद्द्यावर प्रश्न उपस्थित करतात तेव्हा त्यांना बोलू दिलं जात नाही. दररोज सकाळी 11:00 वाजता विरोधी पक्षाचे नेते संसदेत आपलं म्हणणं मांडण्यासाठी येतात आणि आपल्या मुद्द्यांवर बोलू द्यावे अशी विनंती ते करतात. मात्र त्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत. त्यामुळे आता  जनतेलाच जनआंदोलन सुरू करावं लागेल असं पवार म्हणालेत.

हे वाचलं का?


हे ही वाचा >>Sankarshan Karhade Poem : "विरोधकच नसल्यानं, मुख्यमंत्रिपदाचं कोडंही लवकर सुटेल", संकर्षण कऱ्हाडेची कविता पुन्हा व्हायरल

सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी पुण्यात इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन्स (ईव्हीएम) विरोधात आंदोलन सुरू केले असून, निवडणुकीत त्याचा वापर फसवणूक असल्याचे म्हटले आहे. 90 वर्षीय बाबा आढाव यांनी 28 नोव्हेंबर रोजी प्रख्यात समाजसुधारक ज्योतिबा फुले यांचे निवासस्थान असलेल्या फुले वाडा येथे 3 दिवसांपूर्वी हे आंदोलन सुरू केलं होते. या आंदोलनाचा आज शेवटचा दिवस होता. यावेळी शरद पवार त्यांना भेटायला आले होते. 

'निवडणूक आयोग या प्रकरणी एवढी चुकीची भूमिका घेईल, यावर आमचा विश्वास नाही. निवडणुकीच्या वेळी आम्ही या संस्थेवर अविश्वास व्यक्त केला नाही. मात्र निवडणुकीनंतर जे बोललं जात आहे त्यात काही प्रमाणात तथ्य असल्याचं दिसतंय असं शरद पवार म्हणाले आहेत. 

ADVERTISEMENT

जनतेने जनआंदोलन उभारावे : पवार

हे ही वाचा >> Murlidhar Mohol : "माझ्या नावाची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासाठी चर्चा...", पहिल्याच टर्ममध्ये केंद्रात मंत्रिपद मिळालेले मोहोळ काय म्हणाले?

शरद पवार म्हणाले, 'ज्यांच्या हातात सत्ता आहे, त्यांना या प्रश्नांची चिंता नाही. हा संपूर्ण देशाचा प्रश्न आहे. विरोधकांच्या प्रश्नांवर संसदेत चर्चा होत नाही आणि याचा स्पष्ट अर्थ असा होतोय की, संसदीय लोकशाहीचं योग्य पालन होत नाही. असंच चालू राहिलं तर ते योग्य नाही आणि त्यामुळे आता लोकांमध्ये जावं लागेल. लोकांना जागरूक करावं लागेल. खरं सांगायचे तर जनता जागरूक आहे आणि म्हणूनच त्यांनी स्वत:हून जनआंदोलन सुरू केलं पाहिजे. आज बाबा आढाव जी चळवळ चालवत आहेत ती असंच एक जनआंदोलन आहे. आज नाही तर उद्या या आंदोलनाचे परिणाम नक्कीच दिसून येतील, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला. 

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT