Sharad Pawar : ...म्हणून मी भुजबळांना मुख्यमंत्री करणं टाळलं, पवारांचं खळबळजनक विधान, अजितदादांवरही निशाणा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

2004 ला राष्ट्रवादीने मंत्रिपद का नाही घेतलं?

point

छगन भुजबळ यांना तेव्हा मुख्यमंत्री का नाही केलं?

point

शरद पवार यांचा अजित पवारांबद्दलही मोठा गौप्यस्फोट

Sharad Pawar on Chhagan Bhujbal : छगन भुजबळ हे वेगवेगळ्या कारणांमुळे गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेत आहेत. एकीकडे Manoj jarange यांच्याविरोधात दंड थोपटून मैदानात उतरलेले छगन भुजबळ हे मध्यंतरी काही काळ महायुतीमध्येही नाराज असल्याचं दिसलं होतं. त्यानंतर अलीकडेच त्यांनी ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांना दिलेल्या एका मुलाखतीवरुन ते सध्या चर्चेत आहेत. आपण ईडीच्या भीतीने भाजपसोबत गेल्याचं भुजबळ यांनी राजदीप सरदेसाई यांना एका पुस्तकासाठी दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं. त्यानंतर आता शरद पवार यांनी लोकमतला दिलेल्या मुलाखतीत या सर्व गोष्टी खऱ्या आहेत असं म्हटलं आहे. तसंच शरद पवार यांनी 2004 साली घडलेल्या एका राजकीय घडामोडीवरही भाष्य केलं, ज्यामध्ये त्यांनी आपण भुजबळांना मुख्यमंत्रिपद न देण्याचं कारण सांगितलं.

ADVERTISEMENT

हे ही वाचा >>Bunty Shelke : काँग्रेस उमेदवार पळत पळत थेट भाजप कार्यालयात, नागपूरमध्ये काय घडलं? व्हिडीओ का व्हायरल होतोय?

 

राष्ट्रवादीने 2004 साली मुख्यमंत्रीपद घेतलं नाही, अशी खदखद अजित पवार यांनी अनेकदा बोलून दाखवली. त्याबद्दल बोलताना शरद पवार म्हणाले की, 2004 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीला सर्वाधिक जागा होत्या. मुख्यमंत्रीपदासाठी वरीष्ठ म्हणून  माझ्यापुढे छगन भुजबळ यांचं नाव होतं. मात्र त्यानंतरचं भुजबळांचं राजकारण पाहा, त्यांना तुरुंगातही जावं लागलं होतं. त्यावेळी छगन भुजबळ यांना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री केलं असतं, तर राज्याची अवस्था चिंताजनक झाली असती असं शरद पवार म्हणालेत. तसंच अजित पवार यांचा तेव्हा मुद्दाच नव्हता असंही शरद पवार यांनी सांगितलं.

 

हे वाचलं का?

हे ही वाचा >>Ajit Pawar: 'मी यावेळेस मुख्यमंत्रीपदाच्या भानगडीतच...', अजितदादांनी उडवून दिली खळबळ

 

Sharad Pawar त्यावेळच्या राजकीय घडामोडींबद्दल बोलताना म्हणाले की, Ajit Pawar  यांचा तेव्हा मुद्दाच नव्हता, आम्ही त्यावेळी अधिक मंत्रीपदं घेतली होती. माझे अनेक तरुण सहकारी मंत्री झाले होते. आर. आर. पाटील, जयंत पाटील, अजित पवार हे तरूण पुन्हा कॅबिनेट मंत्री झाले होते. नव्या नेतृत्वाला बळ देण्यासाठी ते गरजेचं होतं असं शरद पवार म्हणाले. तसंच विलासराव देशमुख हे काँग्रेसी विचारांचे होते, त्यामुळे ते काँग्रेसचे असले, तरी ते मुख्यमंत्री झाले हे योग्यच झालं असं शरद पवार म्हणालेत.



शरद पवार यांनी पुढे बोलताना राजदीप सरदेसाई यांनी केलेल्या दाव्याबद्दलही भाष्य केलं. पवार म्हणाले की, राजदीप सरदेसाई हे मला काही दिवसांपूर्वीच भेटले होते. त्यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल बोलताना ते म्हणाले की, छगन भुजबळ नाकारत असले, ते काय बोललेत हे मला राजदीप सरदेसाई यांनी सांगितलं. एकदा तुरूंगात गेले गेले होते, त्यामुळे पुन्हा तुरुंगात जायचं नसल्यानं भुजबळ भाजपसोबत गेले. तसंच नोटीस आल्यानंतर अजित पवारही अस्वस्थ होते आणि त्यामुळेच ते तिकडे गेले असं पवार म्हणाले.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT