आजही मी बाळासाहेबांच्या आठवणीने भावूक होतो : नारायण राणे

मुंबई तक

ADVERTISEMENT

memories of balasaheb make me emotional narayan rane says
memories of balasaheb make me emotional narayan rane says
social share
google news

Balasaheb memories make me emotional says narayan rane :बाळासाहेबांची तुलना कोणाशीच होऊ शकत नाही, ते एक वेगळचं व्यक्तिमत्व होते. त्यांचे विचार, आचार, निर्धार वेगळा होता. त्यांना मी गुरू मानतो, ते आजही मलाही आठवले की मी भावूक होतो, असे विधान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुंबई Tak बैठकीत केले होते. मुंबई Takचे संपादक साहिल जोशी यांनी त्यांची मुलाखत घेतली होती. या मुलाखतीत नारायण राणे यांनी बाळासाहेबांनी राजकारणात कसे घडवले याची माहिती दिली. (memories of balasaheb make me emotional narayan rane says in mumbai tak baithak)

ADVERTISEMENT

बाळासाहेबांना मी खुप मानतो, त्यांची आजही मला आठवण आली की मी भावूक होतो.कारण मी त्यांना फार जवळून पाहिलंय असे नारायण राणे यांनी सांगितले. माझ्या इतकी पद महाराष्ट्रात कोणालाच मिळाली नाही. जी पदही मिळाली, त्या प्रत्येक पदाला न्याय दिला.बीएसीटी चेअरमन असो, आमदारकी असो यासह इतर अनेक पदे मी हाताळली. मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते पद तर मी गाजवली आहेत त्यांना न्याय दिला असे देखील राणे म्हणाले आहेत.

भाषणशैली शिकवली

माझ्या साहेबांना मी शिवसेनापक्ष प्रमुख नाही म्हणायचो, दैवत म्हणायचो. त्यांनी मला बऱ्य़ाच गोष्टी शिकवल्या. माझं भाषण असो, सुरुवातीला मी फार वेगाने बोलायचो, एका दिवशी बाळासाहेबांनी मला बोलावले. कुठे जाऊन आलास? …दौऱ्यावर, सभा कशी झाली? किती फास्ट बोलतोस? तुम्ही कुठे ऐकलंत?…अरे कॅसेट ऐकली तुझी, सावकाश बोल…एकतरी कोपरखळी मार, श्रोत्यांना तू खुप गंभीर ठेवतोस, हसवं थोडं…आणि तू भाषण करू नको, लोकांना तू त्यांच्याशी बोलतोय असे वाटू दे, असा सल्ला बाळासाहेबांनी दिला. आपण कस असावं? लोकप्रतिनिधी म्हणजे काय? सरकारमध्ये असताना कसे वागले पाहिजे? या सर्व गोष्टी त्यांनी शिकवल्या.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

…तरीही बाळासाहेबांनी आम्हाला जवळ केलं

मी कुठेही गेलो तर विचारपूस करायचे…कुठे चालला? कोकणात चाललोय, संध्याकाळी जाईन सकाळी पोहोचेण, ड्रायव्हर कोण आहे? त्यावेळेस बाळासाहेबांनी ड्रायव्हरला बोलावलं त्याची चौकशी केली. झोपला होता आज, जेवला आहेस, साहेबांना (नारायण राणे) व्यवस्थित घेऊन जा,अशी प्रश्न विचारायचे. इतकं सगळ कोण करतो? साहेब साहेब आहेत बाकी इतर कोणी नाही,अशी काळजीवाहू आठवण बाळासाहेबांबाबतची त्यांनी सांगितली. माणसाचा चेहरा पाहिला की ते स्वभाव सांगायचे, नाहीतर आमची ओळख कशी झाली असती,आमचा कोणच राजकारणात नाही आहे. तरीपण आम्हाला जवळ घेऊन न्याय दिला. ते बाळासाहेब होणे नाही,असे नारायण राणे म्हणाले.

मुख्यमंत्र्यांना धनुष्यबाण पेलवेल का?

एकनाथ शिंदे माझ्या सारखा शिवसैनिक आहे.शिवसैनिक पहिला मग कार्यकर्ता, शिवसैनिक हाच कार्यकर्ता असतो, त्याला साहेबांची विचारधारा माहितीय. पण त्यांना काम किती जमेल हे मी सांगू शकत नाही,असे नारायण राणे यांनी सांगितले.

ADVERTISEMENT

एकनाथ शिंदे शिवसैनिक आहे पहिल्यापासून, साहेबांचा फोटो किंवा व्यक्तिमत्व डोळ्यासमोर ठेवून काम करत असतो. पण तुम्हाला तुलना करायची असेल तर बाळासाहेबांनी प्रमुख म्हणून शिवसैनिक घडवले. हिंदूत्व आणि मराठी माणसांना न्याय देणे हे त्यांचे धोरण होते
मुख्यमंत्री व्हायचंय.. दिल्लीत जायचंय…पंतप्रधान व्हायचंय ही त्यांची स्वप्ने नव्हती, असे देखील नारायण राणे यांनी मुंबई Tak बैठकीत सांगितले.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT