Devendra Fadnavis Mumbai tak Baithak 2024: 'ते मी गंमतीत बोललो होतो...', देवेंद्र फडणवीसांचा नवा दावा!

साहिल जोशी

ADVERTISEMENT

देवेंद्र फडणवीसांचा नवा दाव
देवेंद्र फडणवीसांचा नवा दाव
social share
google news

Devendra Fadnavis: मुंबई: 'मी पुन्हा आलो पण येताना दोन पक्ष फोडून आलो...', असं विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीआधी केलं होतं. ज्यावरून त्यांच्यावर बरीच टीका देखील झाली. ज्याचा काही प्रमाणात भाजपला निवडणुकीतही फटका बसला. पण आता याचबाबत पहिल्यांदाच देवेंद्र फडणवीस हे बोलले आहेत. 'मुंबई Tak बैठक' या विशेष कार्यक्रमात बोलताना फडणवीस यांनी याचबाबत भाष्य केलं आहे. (devendra fadnavis at mumbai tak baithak 2024 i said that in jes Devendra fadnavis new claim about i came back to power after breaking 2 parties)

ADVERTISEMENT

2019 च्या विधानसभा निवडणुकीआधी विधानसभेत बोलताना देवेंद्र फडणवीसांनी आपल्या भाषणात 'मी पुन्हा येईन...' असं विधान केलं होतं. पण विधानसभा निवडणुकीनंतर जी राजकीय उलथापालथ झाली त्यामुळे फडणवीसांना मुख्यमंत्री पद गमवावं लागलं. ज्यानंतर त्यांना 'पुन्हा येईन' यावरून बरंच ट्रोल केलं गेलं.

हे ही वाचा>> Devendra Fadnavis Mumbai tak Baithak 2024: लोकसभेला इतका फटका का बसला? फडणवीस स्पष्टच बोलले

दरम्यान, दोन वर्षांपूर्वी राज्यात पुन्हा एकदा शिंदे सरकार आलं. ज्यामध्ये फडणवीसांना उपमुख्यमंत्री पद देण्यात आलं. ज्यानंतर लोकसभा निवडणुकीआधी एका मुलाखतीत फडणवीस यांना 'पुन्हा येईन' यावरून प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर फडणवीस म्हणाले की, 'मी सत्तेत पुन्हा आलो.. आणि येताना दोन पक्ष फोडून आलो..' 

हे वाचलं का?

पण त्यांचं हेच विधान पुन्हा चर्चेत आलं. ज्यावरून ते ट्रोल झाले. याबाबत मुंबई Tak बैठकीत त्यांनी असं विधान का केलं हे सांगितलं. पाहा मुंबई Tak बैठकीत यावर फडणवीस नेमकं काय म्हणाले..

मुंबई Tak बैठकीत फडणवीसांचा नवा दावा...

प्रश्न: भाजपने सुरुवातीला सांगितलं की, पक्ष फुटले त्याच्याशी आमचा काही संबंध नाही..नंतर तुम्ही एका ठिकाणी म्हटलं की, मी परत आलो आणि दोन पक्ष फोडले त्याचा लोकसभा निवडणुकीवर परिणाम झाला का? 

ADVERTISEMENT

देवेंद्र फडणवीस: पहिली गोष्ट म्हणजे मी एकदाच बोललो आणि ते गंमतीत बोललो... पण इको सिस्टमने पकडलं आणि तेच चालवलं... पण ठीक आहे.. ते त्यांचं काम आहे. पण आम्ही हे सातत्याने सांगितलं की, कोणी कोणाचा पक्ष फोडू शकत नाही. त्या-त्या पक्षातील महत्त्वाकांक्षांमुळे ते पक्ष फुटले आहेत. त्या ठिकाणी उद्धवजींकडे आणि पवार साहेबांकडे ज्या वेळेस शिंदे साहेबांना वाटलं आणि तिकडे अजित पवारांना वाटलं.. की पक्षात आमचं कोणतंही भविष्य नाही. कारण इकडे आदित्य ठाकरेंना भविष्य आहे, दुसरीकडे सुप्रिया सुळेंना भविष्य आहे.   

एक कुचंबणा त्यांची व्हायला लागली. ज्या गोष्टींकरिता पक्षात आहोत किंवा जी विचारसरणी आपण सांगतो त्याच्या विरोधात आपण करत आहोत. अशा अनेक गोष्टी घडल्या. यामुळे ते पक्ष फुटले.

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> Aaditya Thackeray Mumbai tak Baithak 2024 : ठाण्यातून लढणार की वरळीतून? आदित्य ठाकरेंचा निर्णय झाला

एक गोष्ट मला सांगा... जो नरेटिव्ह तयार करतात की, सहानुभूती... सहानुभूती... आता आपण विचार केला की, जर सहानुभूती होती तर सगळ्यात जास्त सहानुभूती कुठे असायला पाहिजे होती? मुंबईपासून-कोकणापर्यंत काय अवस्था होती? कोकणात शिवसेनेला एकही जागा मिळाली नाही. मुंबईतही आम्हाला शिवसेनेपेक्षा दोन लाख मतं आम्हाला जास्त आहेत

जर सहानुभूती असायला हवी होती तर ती मुंबई आणि कोकणात असायला हवी होती. ती तर कुठे दिसत नाही. 

असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी पक्ष फोडण्यात त्यांचा किंवा भाजपचा कोणताही हात नसल्याचा पुन्हा एकदा दावा केला आहे.

 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT