Devendra Fadnavis Mumbaitak Baithak 2024 : भाजप विधानसभेच्या किती जागा लढणार?

मुंबई तक

ADVERTISEMENT

devendra fadnavis mumbaitak baithak 2024 on vidhan sabha seat sharing maratha reservation manoj jarange patil maharashtra politics
देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई Tak बैठकीत मोठं विधान केले आहे.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

विधानसभेच्या किती जागा लढणार?

point

महायुतीचे जागावाटप कसे होणार आहे?

point

देवेंद्र फडणवीसांनी मुंबई तक बैठकीवर मोठं विधान

Devendra Fadnavis Mumbaitak Baithak 2024 : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी तयारी सूरू केली आहे. मतदार संघाची चाचपणी सुरु आहे आणि जोरबैठका देखील घेतल्या जात आहेत. त्यामुळे आता विधानसभेत कोणता पक्ष किती जागा लढवणार? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.अशात आता महायुतीचे जागावाटप कसे होणार आहे? आणि भाजप नेमक्या किती जागा जिंकणार आहे? यावर आता उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुंबई  Tak बैठकीत (Mumbaitak Baithak 2024) मोठं विधान केले आहे. (devendra fadnavis mumbaitak baithak 2024 on vidhan sabha seat sharing maratha reservation manoj jarange patil maharashtra politics)

''ज्याची ज्याची जेवढी शक्ती आहे, तेवढ्या त्याला जागा मिळतील,शेवटी प्रत्येकाला आपली शक्ती देखील माहिती आहे आणि मर्यादा देखील. आम्हालाही आमची मर्यादा माहिती आहे. मागताना सगळीकडे जास्तच मागावे लागते.मागताना तोफ मागितली की बंदुक मिळते. त्यामुळे प्रत्येकजण मागताना जास्तीच मागतो. प्रत्येकाला आपली ताकद माहिती आहे,त्या ताकदीने आम्ही जागा मागतो,असे देवेद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. तसेच जागावाटपावर आमच्या बैठका सुरु झाल्या आहेत. दिशाही आमची ठरली आहे. 2-4 जागांवर थोडी ओढाताण येईल.पण यावेळेस ती कमी होईल,असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. 

हे ही वाचा : Devendra Fadnavis Mumbai tak Baithak 2024: लोकसभेला इतका फटका का बसला? फडणवीस स्पष्टच बोलले

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, ''लोकसभेच्या निकालावरून जर विरोधी पक्षाने आराखडे बांधली असतील तर त्यांचे मनसुबे पुर्ण होतील असे मला वाटत नाही. लोकसभेतले काही फॅक्टर होते त्यावर आम्ही काम करतोय.लाडक्या बहिणींचा परिणाम दिसतोय. काही गोष्टी ज्या जनतेला बोचत होत्या,त्या गोष्टी कशा नीट करता येईल यावर आम्ही भर दिला आहे. त्यामुळे विधानसभेत आव्हान असलं तरी ते आम्ही पेलवू शकू, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Eknath Shinde Mumbaitak Baithak 2024 : 'माझी लाडकी बहीण योजना' कल्पना कुणाची? CM शिंदेंनी दिलं उत्तर

लोकसभेत फटका बसला का? 

"लोकसभेचे विश्लेषण केले, तर आमच्या १२ जागा अशा आहेत, जिथे वेगळा पॅटर्न दिसला. तो विधानसभेत दिसणार नाही. आमच्याकडे जी मते होती, त्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीची मते मिळून विशिष्ट जागा मिळवू असे वाटले होते. पण, दुसरीकडे नवीन पक्ष होते, त्यांची मते एकमेकांना गेली नाहीत.""अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे मते जाणे, सगळ्यात कठीण होते. पण, आता ते विधानसभेला घडणार नाही. आम्ही जितकी मते शिवसेनेकडे ट्रॉन्स्फर करू शकलो, तितकी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे करू शकलो नाही", असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT