‘जयंत पाटलांसारखा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मुख्यमंत्री हवा…’, अमोल कोल्हे असं का म्हणाले?

मुंबई तक

ADVERTISEMENT

we need educated cm like jayant patil says amol kolhe
we need educated cm like jayant patil says amol kolhe
social share
google news

Amol kolhe Reaction in CM changing Movement :राज्यात मुख्यमंत्री बदलाच्या चर्चा सुरु आहेत, यासाठी दिल्लीतून हालचाली सूरू असल्याची माहिती आहे.या चर्चेला उधाण आले असतानाच आता मुख्यमंत्री पदावरून राष्ट्रवादीतचं रस्सीखेच सुरु झालाय. भावी मुख्यमंत्री म्हणून अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नावाची चर्चा असतानाच,आता या शर्यतीत जयंत पाटील (Jayant Patil) यांचे नाव देखील चर्चेत आले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्या सूचक विधानानंतर आता भावी मुख्यमंत्री म्हणून जयंत पाटील यांचे नाव चर्चेत आहे. (amol kolhe Reaction in cm changing Movement we need an educated and cultured cm like jayant patil)

ADVERTISEMENT

अमोल कोल्हे काय म्हणाले?

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्या सूचक विधानानंतर राजकीय चर्चांना उधाण आले आहे. जयंत पाटील (Jayant Patil)  यांच्यासारख्या सुशिक्षित व सुसंस्कृत नेत्याची मुख्यमंत्री म्हणून राज्याला गरज असल्याचे विधान अमोल कोल्हे यांनी केले होते. तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसजवळ जयंत पाटलांच्या ताकदीचा दुसरा उमेदवार नाही, त्यामुळे जयंत पाटील आदर्श मुख्यमंत्री ठरतील, असे कोल्हे यांनी मत व्यक्त केले होते. सांगलीतल्या एका कार्यक्रमात त्यांनी हे विधान केले होते.

हे ही वाचा : ‘रिफायनरी लोकांच्या हिताची मग जबरदस्ती का?’ बारसूवरून उद्धव ठाकरे संतापले

विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी एका मुलाखतीत मुख्यमंत्री होण्याची इच्छा जाहिर केली होती. या इच्छेनंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून भावी मुख्यंमंत्री आणि जनतेच्या मनातील मुख्यमंत्री अशा आशयाची बॅनरबाजी करण्यात आली होती.धाराशिव, उल्हासनगर आणि नागपूर या जिल्ह्यात हे अजित पवारांच्या भावी मुख्यमंत्री असल्याच्या आशयाचे बॅनर्स झळकले होते. या बॅनर्सनंतर अजित पवार मुख्यमंत्री होण्याच्या चर्चांना ऊत आले होते. या चर्चेनंतर आता अमोल कोल्हे यांच्या विधानानंतर जयंत पाटील यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे.

हे वाचलं का?

अजित दादा (Ajit Pawar) मुख्यमंत्री व्हावेत ही कार्यकर्ते म्हणून सर्वांची भावना आहे. माझी देखील तीच भावना आहे. अजित दादा महाराष्ट्राचे नेतृत्व आहेत आणि भविष्यात ते महाराष्ट्रचे नेतृत्व करतील. अजित दादांसारखा तोलामोलाचा नेता राज्यात नाही, हे दस्तुरखुद्द अमित शाह यांनी कबूल केले आहे, असे देखील अमोल कोल्हे यांनी म्हटले होते. अजित पवार मुख्यमंत्री होणार, वेट अॅंड वॉच, दिल्लीतून सुत्र हलत आहे, असे अमोल कोल्हे (Amol Kolhe) म्हणाले होते.

हे ही वाचा : ‘खारघर दुर्घटना दाबण्यासाठी…,’सुप्रिया सुळेंचा शिंदे-फडणवीस सरकारवर गंभीर आरोप

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT