‘तू लय शिवभक्त झालास का’, स्टेट्सवरून 13 जणांचा शिवसैनिकाच्या घरावर हल्ला
Beed Crime : बीड जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. छत्रपती संभाजीनगर असे स्टेट्स ठेवल्यामुळे शिवसैनिकाच्या घरावर हल्ला करण्यात आल्याची प्रकार सिरसाळा येथे घडली. याप्रकरणी सिरसाळा पोलीस ठाण्यात तेरा आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी याबद्दल दिलेली माहिती अशी की, सिरसाळा येथील शिवसेनेचे (शिंदे गट) रुपेश गायकवाड यांनी आपल्या मित्राने ठेवलेले छत्रपती संभाजीनगर असे व्हॉट्सअप […]
ADVERTISEMENT
Beed Crime : बीड जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. छत्रपती संभाजीनगर असे स्टेट्स ठेवल्यामुळे शिवसैनिकाच्या घरावर हल्ला करण्यात आल्याची प्रकार सिरसाळा येथे घडली. याप्रकरणी सिरसाळा पोलीस ठाण्यात तेरा आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
पोलिसांनी याबद्दल दिलेली माहिती अशी की, सिरसाळा येथील शिवसेनेचे (शिंदे गट) रुपेश गायकवाड यांनी आपल्या मित्राने ठेवलेले छत्रपती संभाजीनगर असे व्हॉट्सअप स्टेट्स स्वतःच्या मोबाईलवर डाऊनलोड करून ठेवले होते. हे व्हॉट्सअप स्टेट्स ठेवल्यानंतर रात्री अकराच्या दरम्यान गायकवाड यांच्या घरावरती ओळखीच्या तेरा आणि अज्ञात 10 ते 15 लोकांनी हल्ला केला.
या हल्ल्यात गायकवाड यांच्या घरावर दगडफेक तसेच गायकवाड यांना ‘तू लय शिवभक्त झाला आहेस का? तू बाहेर ये तुला जीवाशी ठार करतो, आम्ही पण निजामांच्या अवलादी आहोत’, असे म्हणत त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना मारहाण केली.टोळक्याने त्यांच्या स्वयंपाक घरातील संसार उपयोगी साहित्याची तोडफोड केली.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
Kalyan: धावत्या लोकलमध्ये सीटवर बसण्यावरून वृद्धाची हत्या?
याप्रकरणी रुपेश गायकवाड यांच्या फिर्यादीवरून शिरसाळा पोलीस ठाण्यामध्ये उमेर मोईन शेख, शहीद आक्रमखा पठाण, सय्यद अजीज अनिस, शेख अख्तर मोईन, मुखिद पाशा मणियार, अरबाज उर्फ बबु अलवार शेख, सय्यद अजीज जुबेर, शेख साबीर गफार, नेहाल तांबोळी, सय्यद शाबाज, नेहाल इनामदार, सलीम अली इनामदार आणि इतर आठ ते 10 आरोपींविरोधात भादंवि कलम 452,143, 147,149,504,506,336,327,323 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सिरसाळा पोलीस करीत आहेत.
ADVERTISEMENT
Crime : माहेरी आलेल्या प्रेयसीला घरी बोलावलं अन्… प्रियकराच्या कृतीने सातारा हादरलं
ADVERTISEMENT
हल्ला करणाऱ्यांमध्ये दोन राष्ट्रवादी काँग्रेसचे ग्रामपंचायत सदस्य; रुपेश गायकवाड यांचा गंभीर आरोप
घरावर हल्ला झाल्यानंतर रुपेश गायकवाड यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले की, त्यांच्या घरावर हल्ला झाला त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे दोन ग्रामपंचायत सदस्य होते. उमेर मोईन शेख, शहीद आक्रमखा पठाण अशी त्यांची नावं आहेत. या दोघांच्या पुढाकारानेच 50 ते 100 लोकांनी आपल्या घरावर हल्ला करत आपणास व आपल्या कुटुंबीयास मारहाण केल्याचा आरोप शिवसेना कार्यकर्ते रुपेश गायकवाड यांनी केला आहे.
ADVERTISEMENT