Dalai Lama video : चुंबन व्हिडीओचा वाद वाढला! दलाई लामांनी सोडलं मौन, म्हणाले…
Dalai Lama Apologize on kissing video : दलाई लामा एका अल्पवयीन मुलाला चुंबन करतानाचा व्हिडिओ समोर आला होता. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी आक्षेप नोंदवत टीका करायला सुरूवात केली होती. या टीकेनंतर आता दलाई लामा यांनी एक निवेदन जारी करून माफी मांगितली आहे.
ADVERTISEMENT
Dalai Lama Apologize on kissing video : दलाई लामा (Dalai Lama) यांचा एक वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओत दलाई लामा एका अल्पवयीन मुलाला चुंबन करतानाचा आणि त्यांच्या जीभेला जीभेने स्पर्श करायला लावणारा व्हिडिओ समोर आला होता. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी आक्षेप नोंदवत दलाई लामा यांच्यावर टीका करायला सुरूवात केली होती. या टीकेनंतर आता दलाई लामा यांनी एक निवेदन जारी करून मुलाची आणि त्याच्या कुटुंबियांची माफी मांगितली आहे. (dalai lama apologize on kissing video with minor on lips asks suck tongue video viral)
ADVERTISEMENT
प्रकरण काय?
दलाई लामा (Dalai Lama) यांचा एक व्हिडिओ व्हाय़रल झाल्य़ानंतर सोशल मीडियावर वाद पेटला आहे. नेटकऱ्यांनी या व्हि़डिओवर तिखट प्रतिक्रिया दिली आहे.व्हायरल व्हिडिओत एक अल्पवयीन मुलगा दलाई लामा (Dalai Lama) यांना आदर देण्यासाठी नतमस्तक होतो. या दरम्यान धर्मगुरू त्याच्या ओठाचे चुंबन घेतात. त्यानंतर व्हिडिओत जीभेला जिभेने स्पर्श करशील का? असे अल्पवयीन मुलाला विचारताना दिसत आहेत. ट्विटर युझर जोस्ट ब्रोकर्सने हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनला जोस्ट ब्रोकर्स लिहतो की, दलाई लामा एका बौद्ध कार्यक्रमात भारतीय मुलाचे चुंबन घेतात आणि नंतर त्याला जीभ चोखायला लावतात. विशेष म्हणजे व्हिडिओत ते जीभ चोखु शकतो का ? असे अल्पवयीन मुलाला विचारताना दिसत आहेत. कोणी सांगू शकतो असे दलाई लामा का करतायत? असा सवाल त्याने उपस्थित केला आहे.
हे ही वाचा : ओठांचं चुंबन, जीभही… दलाई लामा यांच्या वादग्रस्त व्हिडीओने खळबळ
दलाई लामा यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकरी संतापले आहेत. दलाई लामा यांचे असे वागणे हे अजिबात समर्थनीय नाही आहे, अशी प्रतिक्रिया दीपिका पुष्कर हिने दिली आहे.हे काय पाहतो मी? या प्रकरणासाठी त्यांना अटक केले पाहिजे, अशी प्रतिक्रिया जस ओबेरॉयने दिली आहे.
हे वाचलं का?
— Dalai Lama (@DalaiLama) April 10, 2023
हे ही वाचा : आई बॉयफ्रेंडसोबत दिसली ‘त्या’ अवस्थेत; नंतर घडलं थरारक कांड
माफीनाम्यात काय?
दलाई लामा यांच्याकडून या प्रकरणावर एक निवदेन जारी करण्यात आले आहे. या निवेदनात त्यांनी मुलाची आणि कुटुंबियांची माफी मागितली आहे. एका लहान मुलाने परमपूज्य दलाई लामा यांना मी तुम्हाला मिठी मारू का असे विचारले होते. यानंतर दलाई लामा यांनी त्यांच्या कृतीने किंवा शब्दांनी झालेल्या नुकसानासाठी संबंधित मुलाची, त्याच्या कुटुंबाची तसेच त्याच्या मित्राची माफी मागितली आहे. परमपूज्य अनेकदा निष्पाप आणि खेळकरपणे भेटलेल्या नागरीकांशी संवाद साधतात. अगदी सार्वजनिक ठिकाणी आणि कॅमेरासमोरही.मात्र त्यांना या घटनेचा खेद वाटतो, असे दलाई लामा यांना निवेदनात म्हटले आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : VIDEO : ‘रिवॉल्वर रानी’! भर लग्नमंडपात नवरीने खऱ्या खुऱ्या बंदूकीतून झाडल्या गोळ्या
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT