Exclusive: तांबे, पटोले की थोरात… अशोक चव्हाणांनी नेमकं कोणाला सुनावलं?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Ashok Chavan Interview: मुंबई: राज्यात विधान परिषद निवडणुकीनंतर (Vidhan Parishad Election) काँग्रेसमध्ये (Congress) फारच उलथापाल झाली आहे. सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) अपक्ष निवडून आल्यानंतर काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी नाना पटोलेंविरोधात (Nana Patole) नाराजी व्यक्त करत थेट काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा काँग्रेस हायकमांडकडे देऊ केला. ज्यामुळे काँग्रेसमध्ये मोठा भूकंप झाला. दरम्यान, या सगळ्याबाबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी मुंबई Tak ला एक विशेष मुलाखत दिली. ज्यामध्ये त्यांनी तांबे आणि पटोले या दोन्ही नेत्यांना खास आपल्या शैलीत सुनावल आहे. (exclusive interview tambe patole or thorat who exactly did ashok chavan say tough words to)

ADVERTISEMENT

अशोक चव्हाण मुलाखतीत नेमकं काय म्हणाले?

‘सत्यजीत तांबेंना उमेदवारी देण्याविषयी कुणाचंही दुमत नव्हतं’

‘सत्यजीत तांबे यांच्या प्रकरणातील नेमकी सत्यता काय आहे हे अध्यक्ष आणि उमेदवारच सांगू शकतील.पण माझं मत आहे की, ही जागा काँग्रेसची होती. काँग्रेसच्या चिन्हावर सुधीर तांबे त्या ठिकाणी निवडून आले होते. त्यामुळे काँग्रेसने दिलेली उमेदवारी नाकारणं हे उचित झालं नाही. दुसरा मुद्दा असा की, मुलाला द्यायचंच होतं तर मग कोणाचा विरोध होता? सत्यजीत तांबेंना उमेदवारी देण्याबाबत कोणाचंही दुमत नव्हतं.’

‘मला वाटतं तिथे नेमकं काय घडलं किंवा त्यांना अपक्ष फॉर्म का भरावा लागला याचे बारकावे काही मला माहित नाही. पण मला वाटतं ती जागा जी पक्षाची अधिकृत आली असती ती शेवटी अपक्ष म्हणून त्यांनी निवडणूक लढवली. त्यात काँग्रेसचं नुकसान झालं आहे.’ अशा शब्दात अशोक चव्हाणांनी आपलं मत व्यक्त केलं.

Balasaheb थोरातांचा राजीनामा, सुधीर तांबेंनी काँग्रेसला सुनावलं; म्हणाले..

ADVERTISEMENT

‘काँग्रेसचं नुकसान टाळता आलं असतं’

ADVERTISEMENT

‘काँग्रेसचं नुकसान टाळता आलं असतं. हा जो विषय थोडक्यात आटोपता आला असता तर अजून बरं झालं असतं. दोन्हीकडून दावे-प्रतिदावे केले जातात. त्यामुळे मला काही त्यात पडायचं नाही. पण माझं म्हणणं आहे की, जे व्हायचं ते होऊन गेलं आहे. आगामी काळात हा विषय अशा पद्धतीने होऊ नये. त्याकरिता काही गोष्टी टाळता आल्या तर बरं होईल.’

‘टोकाच्या भूमिकेपेक्षा हा विषय समन्वयाने सोडवला पाहिजे. आपल्याकडे आव्हानं समोर आहेत. वेगवेगळ्या निवडणुका येणार आहेत. अशावेळी कोण बरोबर कोण चूक यापेक्षा पक्षात जे ताकदवर नेतृत्व आहे त्या नेतृत्वाला अधिक ताकद द्यायची गरज आहे.’ असं अशोक चव्हाण यावेळी म्हणाले.

‘सगळेच मवाळ झाले तरी अडचण, सगळेच उथळ झाले तरी अडचण..’

‘काही ठिकाणी उमेदवारी देताना निर्णय चुकत होते. मला काही जणांचे फोनही आले. मग मी नाना पटोलेंना फोन करून सांगितलंही की, काही लोकांचा असं-असं म्हणणं आहे. त्यानंतर त्यांनी माझं म्हणणं ऐकलं आणि त्याचा फायदा झाला आपल्याला. बऱ्याचदा काही गोष्टी समजून घ्याव्या लागतात.’

‘सगळेच मवाळ झाले तरी अडचण, सगळेच उथळ झाले तरी अडचण.. असं आहे की, राजकीय परिस्थितीला त्या पद्धतीनेच हाताळावं लागतं. जिथे जशी परिस्थिती असेल तसं काम करावं लागतं.’ असं मत अशोक चव्हाण यांनी व्यक्त केलं.

‘फक्त सुधीर तांबेंनी सांगायला हवं होतं की, मुलाला उमेदवारी द्या…’

‘मी बाळासाहेबांचं नेहमी कौतुक करतो. मी त्यांच्या एका कार्यक्रमात गेलो होतो. म्हटलं, बाळासाहेब तुम्ही प्रत्येकाचं कौतुक करता. तुम्ही काम करता त्याचंही कौतुक करता आणि जो नाही करत त्याचंही कौतुक करता. तुमच्या जीभेवर खरंच साखर आहे. ही बाळासाहेबांची खासियत आहे.’

‘नाना पटोलंचं तसंच आहे. कधीही उठले की नाना एकदम भडकून जातात. नंतर म्हणतात चूक झाली.. जाऊ दे.. माझं म्हणणं आहे की, दोघंही आपल्या परीने काम करत आहेत. त्यामुळे त्यांनीही काळजी घेतली पाहिजे.’

‘मला काय वाटतं यापेक्षा सुधीर तांबेंना काय वाटतं हे महत्त्वाचं आहे. सुधीर तांबे आणि सत्यजीत तांबे यांना काय वाटतं हा त्यांचा प्रश्न आहे. पण जागा आपल्या हातून गेली एवढंच वाईट वाटतंय. सुधीर तांबे हे पक्षाचे आमदार होते. त्यांनी पक्षाला सांगायला हवं होतं की, मला आमदारकी लढवायची नाही तुम्ही तिकीट माझ्या मुलाला द्या. म्हणजे विषय पुढे गेलाच नसता ना.’ असं म्हणत पुन्हा एकदा अशोक चव्हाण यांनी तांबे कुटुंबाकडेच बोट दाखवलं आहे.

Balasaheb Thorat: वाद विकोपाला! थोरातांचा विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा

‘उद्धव ठाकरे जंटलमन.. मी कधीही त्यांच्यात कपटीपणा पाहिला नाही’

‘राजकारणात जी निवडणूक प्रक्रिया सुरु आहे ती कायद्याने अधिक कडक केलं तर हे सगळं बरंचसं थांबून जाऊ शकतं. लोकशाहीमध्ये हार-जीत होत राहते. कायद्याने काही गोष्टी कडक झाल्या तर गोष्टी सोप्या राहणार नाहीत. वैचारिक बांधिलकी मात्र आता संपत चालली आहे हे खरंय.’

‘महाविकास आघाडी टिकवायची असेल तर अधिक समन्वय, पारदर्शकता, संवाद आणि एकमेकांना मानसन्मान. अजून काय हवं. मी पण सीनियर आहे तुम्ही पण सीनियर आहात. एकमेकांचा सन्मान राहिला पाहिजे.’

‘समजा, काँग्रेस मविआमध्ये सामील झाली नसती तर सरकार बनलं असतं का? काँग्रेसमुळे सरकार बनलं ना.. सोनिया गांधींची इच्छा नसताना शेवटी त्यांनी भाजपला दूर ठेवण्यासाठी त्यांनी एक निर्णय घेतला ना. पण सामील झाल्यावर काँग्रेसमुळे सरकार आहे. त्यामुळे काँग्रेसला महत्त्व मिळालं असतं तर बरं झालं असतं. पण तुलनेने आम्हाला थोडं कमीच महत्त्व मिळालं.’

‘खरं तुमची ताकद असताना तुम्ही कसं वागवता लोकांना हे पण महत्त्वाचं आहे ना. तुमची ताकद असताना तुम्ही लोकांना नीट वागवलं तुम्ही त्यांना लक्षात ठेवता. खरं म्हणजे उद्धव ठाकरेंना याबाबतीत मानलंच पाहिजे. ते खूपच जंटलमन आहेत. त्यांना प्रशासकीय अनुभव कमी होता. पण ते खुलापणाने सांगायचे.. की, मला प्रशासनाचा अनुभव कमी आहे हा अशोकराव.. तेव्हा आम्ही त्यांना सांगायचो. कधी आमचं ऐकायचे कधी राष्ट्रवादीचं ऐकायचे. परंतु ते खरंच जंटलमन आहेत.’

‘मृदू स्वभाव, चांगला माणूस.. असा कपटीपणा उद्धव ठाकरेंमध्ये मी कधी पाहिला नाही. मी त्यांच्यासोबत काम केलंय.. हा अनुभव कमी जास्त यायचे कारण तीन पक्ष एकत्र होतो. परंतु सरकार आम्ही यशस्वीपणे चालवलं. आम्ही आणखी अडीच वर्ष सरकार चालवलं असतं हे जर बाकी लोकं पळून गेले नसते तर नक्कीच सरकार चाललं असतं.’ असं म्हणत अशोक चव्हाण यांनी उद्धव ठाकरेंकडून मिळणाऱ्या वागणुकीचं देखील कौतुक केलं.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT