Murlidhar Jadhav : “गोळी घातली की…”, ठाकरेंचा नेता ढसाढसा रडला, काय घडलं?
murlidhar jadhav : पक्षाकडून करण्यात आलेल्या कारवाईनंतर मुरलीधर जाधवांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी डॉ. सुजित मिंचेकर यांच्यावर गंभीर आरोप केले.
ADVERTISEMENT
Murlidhar Jadhav Uddhav Thackeray : राजू शेट्टींवर टीका करत मुरलीधर जाधवांनी हातकंणगले लोकसभा मतदारसंघातून उद्धव ठाकरेंनी आपल्याला उमेदवारी द्यावी अशी मागणी केली. त्याच्या दोन दिवसानंतरच त्यांची जिल्हाप्रमुख पदावरून हटवलं. पक्षाकडून करण्यात आलेल्या कारवाईनंतर मुरलीधर जाधवांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी डॉ. सुजित मिंचेकर यांच्यावर गंभीर आरोप केले. त्याचबरोबर घडलेला घटनाक्रम सांगताना त्यांना अश्रू अनावर झाले.
ADVERTISEMENT
मुरलीधर जाधव यांची शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख पदावरून उचलबांगडी करण्यात आली. त्यानंतर कोल्हापुरात त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांची भूमिका मांडण्याबरोबरच पडद्यामागील राजकारणाबद्दल खुलासा केला.
मुरलीधर जाधव पत्रकार परिषदेत काय बोललो?
जाधव म्हणाले, “माझं म्हणणं एवढंच होतं की, पक्षासाठी झीज करणारा… 19 वर्षे मी जिल्हाप्रमुख आहे. 3 वर्षे मी हातकंणगले तालुकाप्रमुख म्हणून काम केलं. 5 वर्ष उपरीचा शहरप्रमुख काम केलं. अंगावर प्रसंगी चाकूचे वार घेतलेले आहेत. पोलिसांच्या लाठ्या खाल्ल्या आहेत. मला का वाटू नये की, मी पक्षासाठी उभं राहिलं पाहिजे”, अशा भावना मुरलीधर जाधव यांनी व्यक्त केल्या.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
हेही वाचा >> ‘कानशिलात कशी मारतात माहितीए ना..’, भाजप आमदाराची उर्मट भाषा
“निर्णय निवडणुकीला गेला. येईल न येईल हा भाग गौण आहे. पण, जी तुमच्याबरोबर तुम्ही उभी केली, ती किती आपल्याबरोबर राहिली? हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. मी राजू शेट्टींना विरोध एवढ्यासाठीच केलाय की, 2014 ला महायुतीतून त्यांना निवडून दिलं. त्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेना-भाजपची युती फिस्कटली. अशा वेळेला राजू शेट्टींचा हात उद्धव ठाकरेंनी ओढून धरला होता. जाऊ नका म्हणाले. त्यावेळी सदाभाऊ खोत आणि ते होते. मी या घटनेचा साक्षीदार आहे. त्यावेळी राजू शेट्टी निघून भाजपकडे गेले. माझ्यासारख्या शिवसैनिकाला किती वेदना झाल्या असतील”, असे सांगताना मुरलीधर जाधवांच्या अश्रुंचा बांध फुटला.
ठाकरे विठ्ठल, त्यांच्या शेजारी बडवे -मुरलीधर जाधव
“मी माझ्या परवाच्या स्टेटमेंटमध्ये एवढं देखील बोललो की, उद्धव ठाकरे हे माझे दैवत आहे. अजूनही दैवत आहेत. बाळासाहेब ठाकरेंच्या ज्वलंत हिंदुत्वाच्या मुशीत तयार झालेला मी कार्यकर्ता आहे. माझ्या मनात पाप अजिबात नव्हतं. पण, काही लोकांनी उद्धवजींचे कान भरलेले आहेत. माझा जो विठ्ठल (उद्धव ठाकरे) त्यांच्या शेजारचे जे बडवे आहेत आणि माझ्या जिल्ह्यातील काही लोकांनी त्यांचे कान भरले आहेत की, मुरली जाधव कदाचित बंड करण्याच्या तयारीत आहेत”, असे गौप्यस्फोट जाधवांनी करत ठाकरेंच्या जवळ असणाऱ्यांवर आरोप केले.
ADVERTISEMENT
हेही वाचा >> ‘मी पुढचे 8 महिने…’, मुख्यमंत्री पदाबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान
“माझं शेवटचं वाक्य बघा. त्यांना भेटून आल्यानंतर आठ दिवसांत मी माझी भूमिका जाहीर करेन, याचा अर्थ मी माझी भूमिका सोडेन का? हा होता. त्याचा विपर्यास करण्यात आला. खरी वस्तुस्थिती सांगतो. हे फक्त निमित्त होतं”, असे जाधव म्हणाले.
ADVERTISEMENT
सुषमा अंधारे-मिंचेकरांची सलगी; जाधवांनी काय सांगितलं?
जाधव म्हणाले, “सुजित मिंचेकर हे गेल्या चार महिन्यापासून मुरलीधर जाधवांना पदमुक्त करा यासाठी झटत आहेत. त्यांचा पाठिंबा हिंदुत्वाच्या विरोधात बोलणाऱ्या, पूर्वी शिवसेनेच्या विरोधात बोलणाऱ्या, आता शिवसेना उपनेत्या आहेत. त्यांची आणि यांची पूर्वीपासून सलगी आहे. मला त्यांचं नावही घेऊ वाटत नाही. प्रवक्त्या आहेत, चांगलं भाषण करतात”, असे म्हणत मुरलीधर जाधवांनी अप्रत्यक्षपणे सुषमा अंधारेंनाही लक्ष्य केलं.
हेही वाचा >> लग्नाच्या वाढदिवशीच हत्या, शरद मोहोळला कुणी घातल्या गोळ्या?
“ज्यावेळी मिंचेकरांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला होता. प्रत्येक गावात त्यांची चाचपणी सुरू होती की, आपण शिंदे गटात गेलो तर कसं होईल. जवळपास त्यांचं फिक्स झालं होतं. या ताईंनी त्यांना बोलून घेतलं. त्यांना सांगितलं की जाऊ नका. त्यांची उद्धवजींसोबत भेट करून दिली. त्यावेळी त्यांना (उद्धव ठाकरेंना) सांगितलं की, मुरलीधर जाधवांना तुम्ही पदावरून कमी करत असाल, तर मी शिवसेनेत थांबतो. हे षडयंत्र रचत नेले. ते सातत्याने सांगत होते की, दिवाळी झाल्यावर जाधवांना पदमुक्त करणार आहेत. त्यांना निमित्त पाहिजे होतं”, असा आरोप मुरलीधर जाधव यांनी केला.
“गोळी घातली की माझा विषय संपला”
“याचं जर उद्धवजी ऐकत असतील, तर आपण कुठे चाललोय? त्या ज्या ताई आल्या परवा… तुमचं भाषण चांगलं आहे, सगळं चांगलं आहे. पण, तुम्ही जर याला खतपाणी घालत असाल, तर माझ्यासारख्या कडवट शिवसैनिकाने फक्त गोळी घालून घ्यायचं राहिलं आहे आता. गोळी घातली की विषय संपला एवढा माझ्यावर अन्याय झाला आहे. माझी संपूर्ण राजकीय कारकीर्द मिंचेकरांनी संपवली आहे”, असे सांगताना मुरलीधर जाधवांना अश्रू अनावर झाले.
ADVERTISEMENT