Mumbai Airport : मुंबई विमानतळाचे अधिकारी हादरले... दुबईहून आलेल्या तस्करांच्या टोळीकडे सापडलं 7 किलो सोनं
डीआरआयला दुबईहून येणारे काही प्रवासी मोठ्या प्रमाणात सोन्याची तस्करी करत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारावर अधिकारी लक्ष ठेवून होते. गुरुवारी अधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर या प्रवाशांना थांबवलं आणि त्यांची कसून तपासणी केली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

मुंबई विमानतळावर मोठी कारवाई

तब्बल 7 किलो सोनं जप्त

जप्त केलेल्या सोन्याची किंमत ऐकून थक्क व्हाल
मुंबईतील महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) 7.143 किलो सोन्याची तस्करी केल्याप्रकरणी विमानतळावर (CSMIA) तीन इराणी नागरिकांना अटक केली आहे. जप्त केलेल्या सोन्याची किंमत 6.28 कोटी रुपये एवढी आहे.
डीआरआयला दुबईहून येणारे काही प्रवासी मोठ्या प्रमाणात सोन्याची तस्करी करत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारावर अधिकारी लक्ष ठेवून होते. गुरुवारी अधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर या प्रवाशांना थांबवलं आणि त्यांची कसून तपासणी केली.
हे ही वाचा >> Suresh Dhas : सुरेश धस-धनंजय मुंडे यांच्यात काय चर्चा झाली? सुरेश धस म्हणाले, "या लोकांना फाशी होईपर्यंत..."
अधिकाऱ्यांनी या तिन्ही आरोपींच्या सामानाची तपासणी केली असता, प्रत्येकी 1 किलो वजनाची सात सोन्याच्या बिस्किटं आढळली. याशिवाय, कपड्यांखाली कमरेला लावलेल्या पिशवीत लपवलेला एक परदेशी बनावटीचा सोन्याचा तुकडाही जप्त करण्यात आला.
सोन्याच्या तस्करी प्रकरणातील तिन्ही आरोपींना सीमाशुल्क कायद्यांतर्गत अटक करण्यात आली आहे. चौकशीदरम्यान, अधिकाऱ्यांना तस्करी नेटवर्कशी संबंधित महत्त्वाची माहिती मिळाली आहे. त्याच आधारावर पुढचा तपास सुरू आहे.
हे ही वाचा >> Jitendra Awhad : "दोन-तीन महिने जे झालं ते...", धस-मुंडेंच्या भेटीनंतर काय म्हणाले आव्हाड?
मुंबई आणि इतर प्रमुख विमानतळांवर सोन्याच्या तस्करीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होतेय. तस्कर अनेकदा दुबई, आखाती देश आणि आग्नेय आशियाई देशांमधून सोने आणतात आणि ते भारतात बेकायदेशीरपणे विकतात.