Aamir Khan : लाल सिंह चड्ढा फ्लॉप ठरल्यापासून आमिर खान डिप्रेशनमध्ये, स्वत: म्हणाला...

मुंबई तक

"जेव्हा माझे चित्रपट अपयशी ठरतात तेव्हा मी निराश होतो. मी सुमारे 2-3 आठवडे अस्वस्थ होतो. मग मी माझ्या टीमसोबत बसतो. काय चूक झाली याचं यावर चर्चा करतो. मी त्यातून शिकतो. मला आलेल्या अपयशाला मी महत्त्व देतो, कारण तीच एकमेव गोष्ट आहे जी मला पुढे जाण्यास प्रेरित करते." असं आमिर खान म्हणाला. 

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

लाल सिंग चड्ढा फ्लॉप, आमिर खान नैराश्यात

point

डिप्रेशनबद्दल काय म्हणाला आमिर खान?

Aamir Khan : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा आमिर खान अनेकदा आयुष्यातल्या वेगवेगळ्या घटनांबद्दल स्पष्टपणे व्यक्त होताना दिसतो. अशातच आमिरने सांगितलं की, आजही जेव्हा त्याचा एखादा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला, तर वाईट वाटतं. आपण भावनिक व्यक्ती असल्याचं आमिर खानने सांगितलं.

एका कार्यक्रमात आमिर म्हणाला, माझे चित्रपट चांगले चालत नाहीत, तेव्हा मला वाईट वाटतं. चित्रपट निर्मिती ही एक कठीण गोष्ट आहे. कधीकधी गोष्टी तुम्ही ठरवल्याप्रमाणे घडत नाहीत. 'लाल सिंग चड्ढा' मध्ये माझा अभिनय थोडा चांगला होता. पण ते टॉम हँक्सने चित्रपटात केलेल्या कामगिरीशी जुळत नव्हतं.

हे ही वाचा >> Abdul Sattar : शिंदे सरकारच्या काळातील निर्णयाला फडणवीसांचा झटका, अब्दूल सत्तार यांच्या निर्णयावर आक्षेप

"जेव्हा माझे चित्रपट अपयशी ठरतात तेव्हा मी निराश होतो. मी सुमारे 2-3 आठवडे अस्वस्थ होतो. मग मी माझ्या टीमसोबत बसतो. काय चूक झाली याचं यावर चर्चा करतो. मी त्यातून शिकतो. मला आलेल्या अपयशाला मी महत्त्व देतो, कारण तीच एकमेव गोष्ट आहे जी मला पुढे जाण्यास प्रेरित करते." असं आमिर खान म्हणाला. 

आमिर खानचा 'लाल सिंग चड्ढा' हा चित्रपट 2022 मध्ये प्रदर्शित झाला होता. त्यावेळी या चित्रपटानं फक्त 60 कोटी रुपये कमावले होते. बॉक्स ऑफिसवर तो खूपच फ्लॉप ठरला होता. प्रेक्षकांमध्ये आपलं स्थान निर्माण करण्यात आमिरला अपयश आलं होतं. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर एक वर्षानंतर, आमिर खानची माजी पत्नी किरण रावने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, जेव्हा चित्रपट अयशस्वी झाला तेव्हा त्याचा परिणाम कुटुंबावरही झाला. कुटुंब म्हणून आम्ही सर्वजण आमिरसोबत होतो.

हे ही वाचा >>Ganesh Naik : शिंदेंच्या बालेकिल्ल्यात मंत्री गणेश नाईक घेणार जनता दरबादर, शिवसेना भाजपमधील धुसफूस वाढणार?

'लाल सिंग चड्ढा' या चित्रपटानंतर आमिर खान पडद्यावरून गायब झाला. आमिर म्हणाला की आता त्याला त्याच्या कुटुंबासोबत वेळ घालवायचा आहे. आमिर गेल्या तीन वर्षांपासून पडद्यावर दिसला नाहीये. तर दुसरीकडे तो वेगलेगळ्या सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये दिसून येतो.

हे वाचलं का?

    follow whatsapp