Akola : वाद, मारहाण, दगडफेक ते जाळपोळ... अकोल्यातील हातरूण गावात नेमकं काय घडलं होतं?
घटनेचं गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. आतापर्यंत दोन्ही गटातील तिघांना ताब्यात घेण्यात आलं असून, त्यांची चौकशी सुरू आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

दोन गटातला वाद विकोपाला, थेट जाळपोळ...

लाठ्या-काठ्यांनी दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी

पोलिसांकडून हातरूण गावात कडक बंदोबस्त
अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील हातरूण गावात सोमवारी दुपारी दोन गटांमधील संघर्षाला हिंसक वळण लागलं. किरकोळ वादातून सुरू झालेला तणाव इतका वाढला की, दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडफेक सुरू केली आणि रागाच्या भरात एका चारचाकी वाहनाला आग लावली. या घटनेत सहा जण जखमी झाले असून, त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येतंय. सर्व जखमींवर अकोला जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पोलिसांना माहिती दिल्याच्या संशयातून हाणामारी केल्याचं प्राथमिक माहितीमधून समोर आलंय.या संशयामुळे दुसऱ्या गटाने हल्ला केला आणि काही वेळातच परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. वादादरम्यान लोकांनी एकमेकांवर काठ्यांनी हल्ला केला आणि नंतर दगडफेक सुरू झाली.
हे ही वाचा >>Nitin Gadkari: "...तर आपण जगात राज्य करू शकतो", केंद्रीय मंत्री नितिन गडकरींनी स्पष्टच सांगितलं
घटनेचं गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. आतापर्यंत दोन्ही गटातील तिघांना ताब्यात घेण्यात आलं असून, त्यांची चौकशी सुरू आहे. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत आणि गावात शांतता राखण्यासाठी सतत गस्त घालताना दिसत आहेत.
हे ही वाचा >> Supriya Sule: "70 दिवस व्हायला आले, मग पाचवा खुनी...", संतोष देशमुख हत्याप्रकरणी सुप्रिया सुळेंचं मोठं विधान!
दरम्यान, तीन दिवसांपूर्वी हातरूण गावातही हिंसाचाराची घटना घडली होती. काही तरुणांनी टोपल्या विक्रेत्यांना मुलांचं अपहरण करणारी टोळी असल्याचा संशयातून मारहाण केली होती. आता अशी चर्चा आहे की, सोमवारी झालेला वादही त्याच घटनेशी संबंधित असू शकतो. पोलिसांनी दोन्ही गटांच्या तक्रारी नोंदवून कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे. गावात तणाव असल्यानं शांतता राखण्यासाठी अतिरिक्त सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहेत.