Anjali Damania : "धनंजय मुंडेंकडून 280 कोटींचा घोटाळा", दमानियांनी सांगितलेले आकडे जसेच्या तसे वाचा

मुंबई तक

युरिया, नॅनो युरिया, कापूस गोळा करण्याची बॅग, स्प्रे महागात खरेदी केल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केला. याप्रकरणात धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप अंजली दमानिया यांनी केला.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

अंजली दमानिया यांचे धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप

point

"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना झाला घोटाळा"

point

अंजली दमानिया यांनी सांगितले धक्कादायक आकडे

Anjali Damania : एक कृषी मंत्री कसे पैसे खातो याचे कथित पुरावे घेऊन आज सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया माध्यमांसमोर आल्या. धनंजय मुंडे यांनी जुलै 2023 ते 2024 या एका वर्षात 280 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केल्याचा आरोप केला. या संपूर्ण प्रकरणात धनंजय मुंडे यांनी रात्रीच्या रात्री अजित पवार आणि मुख्यमंत्र्यांकडे जाऊन आणि त्यांनी सही घेतली आणि हा प्रकार केला असा आरोप अंजनी दमानिया यांनी केला. 12 मार्चला एक जीआऱ निघाला, तेव्हा कृषी आयुक्त प्रविण गेडाम होते. नॅनो युरिआ, नॅनो डीएपीच्या 5 वस्तु खरेदीत मुंडेंनी भ्रष्टाचार केला. अजितदादा, शिंदेंची सही घेऊन मुंडेंनी ही स्कीम राबवली असं अंजली दमानिया म्हणाल्या आहेत.

अंजली दमानिया यांनी सांगितलं की, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पैसे देण्याचे आदेश केंद्र सरकारने काढले होते. राज्य सरकारलाही आदेश बंधनकारक होते. मात्र, धनंजय मुंडे कृषीमंत्री असताना त्यांच्या कृषीखात्याने शेतीसंबंधित उपकरणे आणि खतांची खरेदी करताना सर्व नियमांचं उल्लंघन केलं. शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे हस्तांतरित न करता अनेक वस्तू बाजारपेठेतून खरेदी करण्यात आल्या. तसंच वस्तू खरेदी करताना बाजारभावाच्या तुलनेत जास्त पैसे दिले असा दावा अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी केला.

"कृषी मंत्र्यांनी कृषी माल महागात खरेदी केला"


1. नॅनो युरिया : 220 किंमतीच्या 19,68,408 बॉटल विकत घेतल्या
2. नॅनो DFA : 590 रुपयाने 19,57,438 बॉटल विकत घेतल्या.
3. बॅटरी स्प्रे : 3426 रुपयाने 2,36,427 स्प्रे विकत घेतले.
4. मेटाल्डिहाईड (PI Industries Petant Product) : 1275 रुपयांनी  1,96,000 किलो विकत घेतलं.
5. कापूस गोळा करण्याच्या बॅग : 1250 रुपयांनी 6 लाख 18 हजार बॅग घेतल्या

मालाची खरी किंमत कमी?

अंजली दमानिया यांनी लाईव्ह प्रेसमध्ये याच मालाचे ऑनलाईन दर दाखवले. 

1. नॅनो युरिया : 90 रुपये
2. नॅनो DFA : 269 (500 ML) रुपये
3. बॅटरी स्प्रे : 2450 ते 2946 रुपये
4. मेटाल्डिहाईड : 817 रुपये
5. कापूस गोळा करण्याच्या बॅग : 20 बॅग 577 रुपये

 

हे ही वाचा >> Kharghar Road Rage : गाडीचा धक्का लागला म्हणून वाद झाला, डोक्यात हेल्मेट मारल्यानं एकाचा मृत्यू
 

अंजली दमानिया यांनी हे आरोप करत धनंजय मुंडे यांनी फक्त एकाच वर्षात 160 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचं म्हटलं आहे. तर या सर्व वस्तू बल्क रेटने घेतल्या आणखी स्वस्त मिळू शकतात, त्यामुळे हा भ्रष्टाचाराचा आकडा 280 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचं म्हटलं आहे. म्हणजे एकूण खरेदीसाठी खर्च केलेल्या रकमेच्या 70 टक्क्यांचा घोटाळा झाला असं अंजली दमानिया म्हणाल्या आहे. त्यामुळेच धनंजय मुंडे यांना मंत्रि‍पदावर ठेवण्याची काय गरज आहे असा सवाल अंजली दमानिया यांनी केला. एकूणच हे सर्व आरोप पाहता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार धनंजय मुंडेंबद्दल काय निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचं आहे. 

भगवान गडाने त्यांचा पाठिंबा काढून घ्यावा असं आवाहनही अंजली दमानिया यांनी केलं आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp