Maharashtra politics : राज्यात पुन्हा राजकीय भूकंप होणार? अंजली दमानियांची स्फोटक पोस्ट
दमानिया यांनी एक पोस्ट शेअर केली असून त्यात सध्या विरोधी पक्षनेते असलेले अजित पवार हे पुन्हा भाजपसोबत जाणार असल्याची माहिती मिळाल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT

Anjali Damania shared post on twitter : राज्यात शिवसेनेत झालेल्या बंडाळीनंतर पुन्हा एक राजकीय भूकंप होण्याची शक्यता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी व्यक्त केली आहे. दमानिया यांनी एक पोस्ट शेअर केली असून त्यात सध्या विरोधी पक्षनेते असलेले अजित पवार हे पुन्हा भाजपसोबत जाणार असल्याची माहिती मिळाल्याचं त्यांनी म्हटलं आहे. (Anjali Damania Explosive post on twitter about Maharashtra politics)
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड केलं आणि 40 आमदारांसोबत वेगळा निर्णय घेतला. शिंदे आणि 40 आमदारांच्या बंडामुळे शिवसेनेचे दोन गट पडले. एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत जात मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, पण यादरम्यान सुप्रीम कोर्टात त्यांच्या अपात्रतेचा मुद्दा गेला.
सर्वोच्च न्यायालयात एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा प्रलंबित आहे. घटनापीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली असून सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यांच्या घटनापीठाणे निकाल राखून ठेवला आहे.
हेही वाचा >> MSC Bank scam case : ईडीची अजित पवार, सुनेत्रा पवारांना क्लिनचीट
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या चर्चा होत असतानाच अंजली दमानिया यांच्या एका ट्विटने खळबळ उडवली आहे.
दमानिया म्हणतात, “आज मंत्रालयात कामानिमित्त गेले होते. तिथे एका व्यक्तीने मला थांबवलं आणि एक गमतीशीर माहिती त्यांनी दिली. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, 15 आमदार बाद होणार आहेत, आणि अजित पवार भाजप बरोबर जाणार आहेत…. तेही लवकरच. बघू….. आणि किती दुर्दशा होतेय महाराष्ट्राच्या राजकारणाची”, असं ट्विट दमानिया यांनी केलं आहे.
Karnatak election : उमेदवारांच्या नावाची घोषणा होताच भाजपत धुसफूस; काय घडतंय?
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील निकाल मे मध्ये येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे हा निकाल कुणाच्या बाजूने जाणार याकडे महाराष्ट्राच्याच नव्हे तर दिल्लीतील सत्ता केंद्राचंही लक्ष लागलेलं आहे.
अंजली दमानिया यांचं ट्विट
आज मंत्रालयात कामानिमित्त गेले होते. तिथे एका व्यक्तीने मला थांबवलं आणि एक गमतीशीर माहिती त्यांनी दिली. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, 15 आमदार बाद होणार आहेत, आणि अजित पवार भाजप बरोबर जाणार आहेत…. तेही लवकरच
बघू…..
आणि किती दुर्दशा होतेय महाराष्ट्राच्या राजकारणाची
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) April 11, 2023
ठाकरे विरुद्ध शिंदे : सुप्रीम निकाल ठरणार महत्वाचा
सुप्रीम कोर्टात महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सलग सुनावणी झाली. न्यायालयाने वेगवेगळे मुद्दे सुनावणी दरम्यान उपस्थित केलेले आहेत. 16 आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा कळीचा असून यासंदर्भात काय निकाल येतो, त्यावर राज्यातील सत्तासमीकरण ठरणार आहे. त्यामुळे न्यायालयीन लढ्यात ठाकरे जिंकणार की शिंदे हे आगामी निवडणुकीच्या दृष्टीने महत्वाचं आहे.