अंबाजोगाई बलात्कार प्रकरण : आतापर्यंत १५ पैकी ९ आरोपींना अटक
अंबाजोगाई येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणात आजपर्यंत १५ आरोपींची ओळख पटवण्यात आली असून ९ आरोपींना अटक करण्यात आली आहे. यापैकी बुधवारी एका आरोपीला ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. लहानपणीच आईचे छत्र हरवलेल्या अल्पवयीन मुलीचा अनेकांनी अत्याचार करून लैंगिक शोषण केल्याची घटना अंबाजोगाई शहरात घडली होती. याबाबत सुरुवातीला नऊ जणांवर अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात […]
ADVERTISEMENT
अंबाजोगाई येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणात आजपर्यंत १५ आरोपींची ओळख पटवण्यात आली असून ९ आरोपींना अटक करण्यात आली आहे. यापैकी बुधवारी एका आरोपीला ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
लहानपणीच आईचे छत्र हरवलेल्या अल्पवयीन मुलीचा अनेकांनी अत्याचार करून लैंगिक शोषण केल्याची घटना अंबाजोगाई शहरात घडली होती. याबाबत सुरुवातीला नऊ जणांवर अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. यातील जेवायला देतो म्हणून बलात्कार करणाऱ्या दुसऱ्या आरोपींलाही पकडण्यात आले असून बुधवारी अंबाजोगाई येथील न्यायालयात उभे केले असता पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
या गुन्हयाचा तपास अंबाजोगाईच्या अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर ह्या करत असून आजपर्यंत या गुन्हयात पंधरा आरोपी निष्पन्न झाले असून नऊ आरोपीला अटक करण्यात पोलीसांना यश आले आहे.
हे वाचलं का?
अंबाजोगाई तालुक्यातील सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर घरच्यांनी साथ सोडल्यामुळे फुटपाथवर जगण्याची वेळ आली आहे. आतापर्यंत ४०० जणांनी तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. अप्पर पोलीस अधिक्षक कविता नेरकर यांनी एका आरोपीला अटक केली होती. मात्र या प्रकरणातील दुसरा आरोपी फरार होता.
पोलिसांनी त्याला धारुर तालुक्यातून अटक करुन न्यायालयासमोर उभं केलं. अटक केलेल्या आरोपीची प्रशिक्षण घेऊन देशसेवा करण्याची इच्छा होती अशी माहिती समोर आली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT