EVM Hacking Row : "इव्हीएम हॅकींगचा दावा खोटा...", निवडणूक आयोगाची माहिती, 'त्या' व्यक्तिविरोधात FIR

मुंबई तक

काही राजकीय मंडळींकडून आणि सोशल मिडीया युजर्सकडून व्हायरल केल्या जात असलेल्या एका व्हिडिओच्या आधारे अनेकांनी मोठे आरोप केले आहेत. या व्हिडिओमध्ये एक हॅकर दावा करताना दिसतोय की, तो इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन (EVM) हॅक करू शकतो. या व्हिडीओची दखल निवडणूक आयोगाने घेतली आहे.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

निवडणूक आयोगाने EVM हॅकिंगबद्दल काय म्हटलं?

point

'मुंबई तक'च्या व्हिडीओमध्ये नेमकं काय म्हटलंय?

Maharashtra Politics : राज्यात नुकत्याच झालेल्या निवडणुकांनंतर EVM बद्दल अनेक शंका उपस्थित केल्या जात आहे. अशातच काही राजकीय मंडळींकडून आणि सोशल मिडीया युजर्सकडून व्हायरल केल्या जात असलेल्या एका व्हिडिओच्या आधारे अनेकांनी मोठे आरोप केले आहेत. या व्हिडिओमध्ये एक हॅकर दावा करताना दिसतोय की, तो इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन (EVM) हॅक करू शकतो आणि काही राजकीय पक्षांचा निकाल बदलू शकतो. या प्रकरणाची दखल घेतली आहे. 

संबंधित व्हिडीओ 'मुंबई तक'ने प्रसिद्ध केलेल्या आणि इंडिया टुडेने केलेल्या एका 'स्टिंग ऑपरेशन'चा हा कापलेला भाग आहे. या रिपोर्टमध्ये इंडिया टुडेच्या पत्रकारांनी एका वरिष्ठ खासदारासाठी काम करणारे गुप्त अधिकारी म्हणून स्टिंग ऑपरेशन केलं होतं. या रिपोर्टमध्ये अमेरिकन हॅकर सय्यद शुजाने दावा केला होता की, तो यूएस डिफेन्स डिपार्टमेंटच्या तंत्रज्ञानाचा वापर करून ईव्हीएम हॅक करू शकतो, तसंच त्याने 54 कोटी रुपयांची मागणीही केली होती. एका खासदाराला आलेल्या फोननंतर प्रकरणाच्या खोलात जाऊन माहिती समोर आणण्यासाठी इंडिया टुडेकडून हे स्टिंग ऑपरेशन करण्यात आलं होतं.

महाराष्ट्र निवडणूक आयोगाने दावा फेटाळला

निवडणूक आयोगाने या प्रकरणाची दखल घेत, एक निवेदन जारी केलं आहे. निवेदन प्रसिद्ध करताना निवडणूक आयोगानं म्हटलं आहे की, हे दावे पूर्णपणे निराधार, खोटे आणि सिद्ध न झालेले दावे आहेत. मुंबई सायबर पोलिसांनी या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या व्यक्तीविरुद्ध एफआयआरही नोंदवला आहे.

 

हे ही वाचा >> Eknath Shinde : शिंदेंचं हेलिकॉप्टर साताऱ्यातून उडणार, कुठे उतरणार? दौऱ्याबद्दल मोठी अपडेट, घडामोडींना वेग

EVM टॅम्परप्रूफ, नेटवर्कशी कनेक्ट होत नाही : निवडणूक आयोग

भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 318/4 आणि आयटी कायदा 2000 च्या कलम 43 (सी) आणि कलम 66 (डी) अंतर्गत आरोपी सय्यद शुजाविरोधात एफआयआर नोंदवण्यात आला आहे. इव्हीएम पूर्णपणे टेम्परप्रूफ असून, त्याच्यासोबत कुठलीही फेरफार होऊ शकत नाही, त्याच्याशी कुठलंही नेटवर्क जोडलं जाऊ शकत नाही असं निवडणूक आयोगाने म्हटलं आहे. असाच विश्वास सर्वोच्च न्यायालयानेही अनेकवेळा ईव्हीएमबद्दलच्या प्रकरणांवर सुनावणी करताना व्यक्त केला आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp