Samay Raina च्या मदतीला धावली भारती? म्हणाली, त्याचा शो तसाच आहे, पण तो मुलगा...
India's Got Latent मध्ये पाहुणी म्हणून आलेली विनोदी कलाकार अभिनेत्री भारती सिंगनेही एकदा समयच्या समर्थनार्थ तिचं मत दिलं होतं. भारती तिचा पती हर्ष लिंबाचिया आणि गायक टोनी कक्कर यांच्यासोबत शोमध्ये सामील झाली होती.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

रणवीर अलाहबादियामुळे समय रैनाही वादाच्या भोवऱ्यात

समय रैनावर अश्लील जोक्समुळे टीकेची झोड

भारतीने केली समयची पाठराखण? म्हणाली...
Samay Rain Controversy : सध्या स्टॅन्ड-अप कॉमेडियन समय रैनाच्या विरोधात मोठी संतापाची लाट उसळलेली आहे. लोक त्यानं केलेल्या अश्लील जोक्सचा निषेध करत आहेत. इंडियाज गॉट लॅटेंट या शोमधील वादग्रस्त कंटेंटमुळे समय रैना वादाच्या भोवऱ्यात सापडलाय. पण दुसरीकडे उर्फी जावेद आणि राखी सावंत यांच्यासह अनेक सेलिब्रिटी त्याच्या बचावासाठी धावले आहेत.
इंडियाज् गॉट लॅटेंटमध्ये पाहुणी म्हणून आलेली विनोदी कलाकार अभिनेत्री भारती सिंगनेही एकदा समयच्या समर्थनार्थ तिचं मत दिलं होतं. भारती तिचा पती हर्ष लिंबाचिया आणि गायक टोनी कक्कर यांच्यासोबत शोमध्ये सामील झाली होती. यानंतर, तिला अनेक प्रश्नांना सामोरं जावं लागलं होतं. समय रैनाचं कौतुक करत, भारतीने तिच्या स्पष्टीकरणात म्हटलं होतं की, हा शो असाच आहे.
हे ही वाचा >> Nagpur Car Accident : नागपूरमध्ये भरधाव कार विहिरीत कोसळली, दोन भाऊ आणि एका मित्राचा जागीच अंत...
भारती म्हणाली, तो शोच असा आहे, पण शोमध्ये जाऊन शोला जे हवं आहे तेच करणं आवश्यक नाही. तुम्ही बोलायचं की नाही, हे तुमच्यावर अवलंबून आहे. समय म्हणत नाही, की तुम्ही बोलाच. समय हा खूप छान मुलगा आहे आणि तो हुशारही आहे. ज्याची त्याची आवड असते. जर तुम्ही स्वतः तिथे गेलात तर तुम्ही त्याचे चाहते व्हाल. तो खूप चांगला आहे असं भारती म्हणाली.
हे ही वाचा >> "शरद पवार साहेबांची राजकारणातील गुगली...", महादजी शिंदे पुरस्कार मिळाल्यानंतर DCM एकनाथ शिंदेंचं मोठं विधान!
समयने वापरलेल्या अपशब्दांबद्दल पुढे बोलताना भारती म्हणाली होती, जर तुम्हाला तो वापरत असलेली भाषा आवडत नसेल, पण लाखो लोक त्याला पाहतात. एका मुलाखतीत भारतीने कबूल केले होतं की, त्या शोमध्ये इतके अश्लील विनोद असतात की तिलाही लाज वाटली होती. भारती शांत बसली असताना, तिचा पती हर्ष मोठ्या उत्साहाने सहभागी झाला. हर्षचं ते रूप पाहून तिलाही आश्चर्य वाटलं होतं असं तिने सांगितलं.