Udayanraje Bhosale : उदयनराजे भोसले औरंगजेबाच्या कबरीबद्दल काय म्हणाले? कबर नेमकी आहे तरी कुठे?
भारतीय जनता पक्षाचे नेते आणि खासदार उदयनराजे भोसले यांनी काल पत्रकार परिषदेत मोठी मागणी केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांच्याबद्दल बेताल विधाने करणाऱ्यांविरुद्ध विशेष कायदा करण्याची मागणी त्यांनी केली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

"महापुरुषांबद्दल बेताल विधान करणाऱ्यांविरुद्ध विशेष कायदा करा",

खासदार उदयनराजे भोसलेंची मोठी मागणी

औरंगजेब चोर होता, त्याची कबर JCB ने उखडून टाका
राज्यात गेल्या काही दिवसांपासून महापुरूषांबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्यांची यादी दिवसेंवर वाढत जातेय, मात्र त्यांच्यावर कारवाई मात्र, होताना दिसत नाहीये. अभिनेता राहुल सोलापूरकर, इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना धमकी देणारा प्रशांत कोरटकर आणि अबू आझमी यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे शिवप्रेमींमध्ये संताप निर्माण झाला होता. त्यानंतर खासदार उदयनराजे यांनी या संपूर्ण वक्तव्यांवर संताप व्यक्त केला आहे.
हे ही वाचा >> Pune Police : पुण्यात 'खाकी'लाही भाईगिरीचा नाद? पोलिसाचं गुन्हेगारांसोबत वाढदिवसाचं सेलिब्रेशन
भारतीय जनता पक्षाचे नेते आणि खासदार उदयनराजे भोसले यांनी काल पत्रकार परिषदेत मोठी मागणी केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांच्याबद्दल बेताल विधाने करणाऱ्यांविरुद्ध विशेष कायदा करण्याची मागणी त्यांनी केली. यासोबतच त्यांनी या कायद्यात कोणत्या अटी असाव्यात याबद्दल पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती दिली.
वादग्रस्त विधान करणाऱ्यांविरूद्ध कायदा करा...
उदयनराजे यावेळी बोलताना म्हणाले, "आता विधिमंडळाचं अधिवेशन सुरू असल्यानं, या अधिवेशनात एक विशेष कायदा मंजूर व्हावा असं माझं मत आहे. असा कायदा असावा, की या महापुरुषांबद्दल पुन्हा कोणीही काहीही बोलण्याचं धाडसच करू शकणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांच्याबद्दल कोणीही बोलण्याचे धाडस करू नये. या संदर्भात अजामीनपात्र गुन्ह्याचा कायदा करण्याची गरज आहे. या कायद्यात किमान 10 वर्षांची शिक्षा आणि जास्तीत जास्त दंड असावा. अशा घटनांची चौकशी डीवायएसपी स्तरावरील अधिकाऱ्याकडून करावी. याशिवाय, असा कायदा करावा की अशा प्रकरणांमध्ये किमान ३० दिवसांत आरोपपत्र दाखल करावे आणि या गुन्ह्याचा निर्णय ६ महिन्यांत द्यावा", असे खासदार उदयनराजे भोसले म्हणाले.
औरंगजेबाची कबर जेसीबीने उखडून टाका..
उदयनराजे भोसले यांना यावेळी बोलताना काही सवाल केले असता, त्यांनी औरंगजेबाचं कौतुक करणाऱ्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतली. मुघल सम्राट औरंगजेबाचं कौतुक केल्याबद्दलच्या प्रश्नावर उदयनराजे म्हणाले, औरंगजेब दरोडेखोर आणि चोर होता. महापुरुषांबद्दल औरंगजेबाचं कौतुक कुणी करू नये. कारण तो एक चोर होता जो या देशाला लुटण्यासाठी आला होता. मग अशा परिस्थितीत त्याचं कौतुक का केलं जातंय?
हे ही वाचा >>Santosh Deshmukh: तुमच्या पायखालची जमीन हादरून जाईल, संतोष देशमुखांचा पोस्टमार्ट्म रिपोर्ट आला समोर!
उदयनराजे पुढे म्हणाले, "औरंगजेबाच्या कबरीला भेट देणारे कदाचित त्याचे नातेवाईक असतील. जर तसे असेल तर त्यांनी कबर त्यांच्या घरी घेऊन जावे का? इथे हिंदू-मुस्लिमचा प्रश्न नाही, औरंगजेबाची कबर जेसीबीने खोदून काढा."
कुठे आहे औरंगजेबाची कबर?
औरंगजेबाची कबर ही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुल्ताबाद तालुक्यात आहे. औरंगजेबाच्या कबरीच्या शेजारीच मुस्लिम धर्मगुरूंच्या देखील दर्गा आहेत. भारतीय पुरातत्व विभागाच्या मदतीने इथल्या वास्तूची देखभाल केली जाते. यापूर्वी या विषयावरुन जेव्हा वाद झाला होता, तेव्हा वंचित बहुजन आघडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी इथे भेट दिली होती.