Chhaava Movie 7th Day Collection : आठवडा उलटला, रेकॉर्डवर रेकॉर्ड मोडत निघालाय 'छावा', आतापर्यंत किती कमावले
बॉक्स ऑफिस ट्रॅकर सकनिल्कच्या सुरुवातीच्या आकडेवारीनुसार, छावाने सातव्या दिवशी 22 कोटी रुपये कमावले आहेत. तर भारतातील चित्रपटाच्या कमाईचा आकडा 219.75 कोटी रुपयांवर पोहोचला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

छावा चित्रपटाची सातव्या दिवशीही रेकॉर्ड ब्रेक कमाई

विकी कौशलच्या अभिनयाचं होतंय कौतुक

चित्रपटाने जगभरात किती कमावले? वाचा सविस्तर...
Chhaava Movie Collection : लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'छावा' या चित्रपटातून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.विकी कौशलच्या अभिनयाचंही मोठं कौतुक होतंय. बॉक्स ऑफिसवर कमाई सुद्धा जोरात सुरूय. चित्रपटाचं कलेक्शन दिवसेंदिवस वाढत असतानाच, आता या चित्रपटाने एक नवा विक्रम केलाय. या चित्रपटानं 7 दिवसांत 200 कोटींचा टप्पा ओलांडला आहे, तर आता 2025 मध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटाचा किताबही छावाने पटकावलाय.
बॉक्स ऑफिस ट्रॅकर सकनिल्कच्या सुरुवातीच्या आकडेवारीनुसार, छावाने सातव्या दिवशी 22 कोटी रुपये कमावले आहेत. तर भारतातील चित्रपटाच्या कमाईचा आकडा 219.75 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. तर जगभरात या चित्रपटानं 270 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. तर चित्रपटाचं बजेट फक्त 130 कोटी रुपये आहे. जो आकडा पहिल्या काही दिवसातच ओलांडलं आहे.
हे ही वाचा >>Manikrao Kokate यांची आमदारकी रद्द कधी करणार? 'त्या' प्रकरणाचा उल्लेख, विधानसभा अध्यक्षांना सवाल
'छावा'च्या 6 दिवसांच्या कमाईवर नजर टाकल्यास, पहिल्या दिवशी 31 कोटींची ओपनिंग केली होती. दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 37 कोटी रुपये कमावले. तिसऱ्या दिवशी हा आकडा 48.5 कोटी रुपयांवर पोहोचला. चौथ्या दिवशी 24 कोटी रुपये, पाचव्या दिवशी 25.25 कोटी रुपये कमावले. तर सहाव्या दिवशी हा आकडा 32 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे.
हे ही वाचा >>Dhananjay Munde : धनंजय मुंडे यांना झालेला Bells Palsy आजार नेमका काय? लक्षणं आणि त्रास नेमका काय?
विकी कौशल व्यतिरिक्त, रश्मिका मंदाना महाराणी येसूबाईच्या भूमिकेत, अक्षय खन्ना औरंगजेबच्या भूमिकेत, आशुतोष राणा सरसेनापती हंबीराव मोहितेच्या भूमिकेत, दिव्या दत्ता सोयराबाईच्या भूमिकेत आणि डायना पेंटी औरंगजेबची मुलगी झीनत-उन-निसा बेगमच्या भूमिकेत आहे.