Chhaava Box office Collection : बॉक्स ऑफिसवर 'छावा'ची हवा... पहिल्या दिवशी 'पद्मावत'चा रेकॉर्ड मोडला

मुंबई तक

छावा चित्रपटाने पहिल्याच दिवशी 31 कोटींहून अधिक कमाई केली आहे. 'छावा' चित्रपटाद्वारे अभिनेता विकी कौशलने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर आपली छाप पाडली आहे.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

विकी कौशलच्या कामाचं कौतुक

point

बॉक्स ऑफिसवर 'छावा'ने मोडले रेकॉर्ड

point

पहिल्याच दिवशी तब्बल 31 कोटींची कमाई

छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित छावा चित्रपटाने पहिल्याच दिवशी अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवरील सर्वाधिक कमाई करणाऱ्या पाचही चित्रपटांपेक्षा त्याची सुरुवात चांगली झाली आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत आतापर्यंत बनवलेल्या ऐतिहासिक चित्रपटांमध्ये सर्वाधिक कमाईचा विक्रम 'पद्मावत' या चित्रपटाच्या नावावर होता. पद्मावतने बॉक्स ऑफिसवर 300 कोटींपेक्षा जास्त कमाई केली होती पण त्याच्या पहिल्या दिवसाची सुरुवात फक्त 24 कोटी रुपये होती.

'छावा' चित्रपटाद्वारे अभिनेता विकी कौशलने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर आपली छाप पाडली आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 31 कोटींहून अधिक कमाई केली आहे. विकी कौशलच्या सोलो हिरो म्हणून कारकिर्दीतील ही आतापर्यंतची सर्वात मोठी ओपनिंग आहे. 'छावा' हा चित्रपट फक्त विकी कौशलच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा ओपनरच नाही, तर पहिल्याच दिवशी त्याच्या खर्चाच्या 20 टक्क्यांहून अधिक कमाई करून वीकेंडला नवे रेकॉर्ड बनवण्याच्या दिशेनं एक पाऊल टाकलंय.

हे ही वाचा >> Ranveer Allahbadia : रणवीर अलाहाबादिया कुठे गायब? घराला कुलूप, फोनही बंद, काय म्हणाले पोलीस?

निर्माता दिनेश विजन यांच्या 'छावा' या चित्रपटाच्या 12,344 शोसाठी गेल्या सोमवारपासून बुकिंग सुरू आहे. हा चित्रपट शुक्रवारी जगभरात प्रदर्शित झाला. व्हॅलेंटाईन डे ला अनेक जोडप्यांनी हा चित्रपट पाहण्याला पसंती दिली. 

दरम्यान, आतापर्यंतच्या अनुभवानुसार कोणत्याही चित्रपटाची पहिल्या दिवसाची कमाई त्याच्या मेकिंग आणि प्रमोशन बजेटच्या 20 टक्के किंवा त्याहून अधिक असेल तर तो हिट होण्याची शक्यता असते. 'छावा' हा चित्रपट 130 कोटी रुपयांमध्ये बनवण्यात आला आहे. त्या अर्थानं, 'छावा' चित्रपटाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी 30 कोटींपेक्षा जास्त कमाई केल्यानं, हिंदी चित्रपटसृष्टीत विकी कौशलचं वजन चांगलंच वाढलं आहे. या कलेक्शननंतर हे सुद्धा स्पष्ट झालं की, या वर्षीच्या सर्व हिंदी चित्रपटांच्या तुलनेत सर्वात मोठी ओपनिंग छावा मिळाला आहे.

हे ही वाचा >> New India Cooperative Bank : RBI ची कारवाई, लोकांचे लाखो रुपये बँकेत अडकले, रांगेतील लोकांच्या वेदनादायी कहाण्या

याआधी अक्षय कुमार आणि वीर पहाडिया यांच्या 'स्काय फोर्स' या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या दिवशी सुमारे 15.30 कोटी रुपयांची कमाई केली होती. त्यामुळे आतापर्यंत हिंदीमध्ये बनलेल्या सर्व ऐतिहासिक चित्रपटांपैकी ही सर्वात मोठी ओपनिंग आहे. याआधी हा विक्रम दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंगच्या 'पद्मावत' या चित्रपटाच्या नावावर होता. पद्मावतने 24 कोटींची ओपनिंग केली होती. 

हे वाचलं का?

    follow whatsapp