Chhatrapati Shivaji Maharaj Movie : 'कांतारा' फेम ऋषभ शेट्टी दिसणार शिवरायांच्या भूमिकेत, कधी येणार चित्रपट?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

कांतारामधून जगभर पोहोचलेला ऋषभ साकारणार शिवरायांची भूमिका

point

'छत्रपती शिवाजी महाराज' चित्रपट कधी येणार?

Rishab Shetty New Movies : ऋषभ शेट्टीने 2022 मध्ये कांतारा या चित्रपटाच्या माध्यमातून देशभरातील प्रक्षकांचं कौतुक मिळवलं होतं. कन्नड फिल्म इंडस्ट्रीतून आलेल्या ऋषभला या चित्रपटामुळे  जगभरातील प्रेक्षक ओळखू लागले आहेत. त्यामुळेच आता दिग्दर्शकांचीही मोठ्या प्रोजेक्ट्ससाठी ऋषभच्याच नावाला पसंती असल्याचं दिसतंय. ऋषभने नुकत्याच त्याच्या एका नवीन चित्रपटाची घोषणा केली आहे. ऋषभच्या जगभरातील प्रेक्षकांसाठी त्याने ही माहिती दिली असली, तरी महाराष्ट्रात मात्र या चित्रपटाची मोठी चर्चा होते आहे. कारण हा चित्रपट आहे 'छत्रपती शिवाजी महाराज'. 

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Mohit Kamboj Vs Gajabhau : मोहित कंबोज यांचं पुन्हा ट्विट, 'गजाभाऊ'कडून पुन्हा उत्तर, म्हणाला बापाचं नाव...

ऋषभ शेट्टीने या चित्रपटाची घोषणा करत पोस्टरही सोशल मिडीयावर शेअर केलं आहे. या चित्रपटात ऋषभ मुख्य भूमिकेत असून, या चित्रपटाचं दिग्दर्शन संदीप सिंग यांनी केलं आहे.  या पोस्टरमध्ये ऋषभ अठरापगड जातींचं स्वराज्य निर्माण करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसतो आहे. अत्यंत दमदार पोस्टर शेअर करत ऋषभने ही माहिती दिली आहे. भारताची शान, योद्धा, राजा, छत्रपती शिवाजी महाराज यांची गाथा सादर करता येणं ही आमच्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. हा केवळ एक चित्रपट नाही, तर हा एका अशा योद्ध्याचा सन्मान आहे, ज्याने बलाढ्य मुघल साम्राज्याला आव्हान दिलं आणि कधीही न विसरता येणारा वारसा निर्माण केला.' ऋषभने त्याच्या पोस्टमध्ये पुढे सांगितले की, त्याचा हा चित्रपट 21 जानेवारी 2027 रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे.

हे ही वाचा >> Chhagan Bhujbal : "शिंदेंच्या बरोबरीतच आम्हालाही...", मुख्यमंत्रिपदाचा तिढा सुटण्यापूर्वी भुजबळांची मागणी


फेब्रुवारीमध्ये संदीप सिंगने 'छत्रपती शिवाजी महाराज' या चित्रपटाची घोषणा करत पोस्ट शेअर केली होती. त्यानंतर त्याने एक पोस्टरही शेअर केलं होतं आणि चित्रपटाची रिलीज डेट 23 जानेवारी 2026 दिली होती. मात्र आता संदीपचा हा भव्यदिव्य प्रकल्प ऋषभ शेट्टीच्या आगमनानंतर पुढे सरकल्याचं दिसतं आहे.

 

हे वाचलं का?


ऋषभ शेट्टी हा कांतारा चित्रपटामुळे भारतातील आणि जगभरातील प्रेक्षकांच्या कौतुकाचा धनी ठरला होता. त्यानंतर तो 'जय हनुमान' या चित्रपटामध्येही दिसणार आहे. 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT