Amravati : 22 दिवसांच्या बाळाला लोखंडी सळईने 65 चटके, श्वास घेता येत नव्हता म्हणून अंद्धश्रद्धेतून विचित्र प्रकार

मुंबई तक

चिखलदरामध्ये असणाऱ्या सिमोरी गावात ही घटना घडली. काल, 26 फेब्रुवारी रोजी, नवजात बाळाला श्वास घेण्यास त्रास होत होता. अंधश्रद्धेमुळे कुटुंबानं मुलाला डॉक्टरकडे नेण्याऐवजी त्याला गरम लोखंडी रॉडने चटके दिले. कुटुंबाला वाटलं, असं केल्यानं मूल बरं होईल, पण त्याची तब्बेत आणखीच बिघडली.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

अंधश्रद्धेतून 22 दिवसांच्या बाळाला लोखंडी रॉडने 65 वेळा चटके

point

पारंपारिक उपचारांच्या नावाखाली अंधश्रद्धेचा प्रकार

point

मुलाची प्रकृती बिघडल्यावर कुटुंबानं गाठलं रुग्णालय

अमरावतीमध्ये एक भयानक घटना समोर आली आहे. अंधश्रद्धेमुळे 22 दिवसांच्या एका निष्पाप मुलाला गरम लोखंडी रॉडने 65 वेळा चटके देण्यात आले. यानंतर मुलाची प्रकृती बिघडली. पारंपारिक उपचारांच्या नावाखाली हा अंधश्रद्धेचा प्रकार केला गेला. मुलाची प्रकृती गंभीर झाल्यानं त्याला अमरावती येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करण्यात व्यस्त आहेत.

हे ही वाचा >>इमॅजिकामध्ये पिकनिकला गेलेल्या 14 वर्षीय मुलाचा हृदयविकाराने मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना चिखलदरामध्ये असणाऱ्या सिमोरी गावात घडली. काल, 26 फेब्रुवारी रोजी, नवजात बाळाला श्वास घेण्यास त्रास होत होता. अंधश्रद्धेमुळे कुटुंबानं मुलाला डॉक्टरकडे नेण्याऐवजी त्याला गरम लोखंडी रॉडने चटके दिले. कुटुंबाला वाटलं, असं केल्यानं मूल बरं होईल, पण त्याची तब्बेत आणखीच बिघडली.

यानंतर, त्यांना परतवाडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अमरावती रुग्णालयात पाठवण्यात आलं. डॉक्टरांचं म्हणणं आहे की, मुलाला जन्मजात हृदयविकाराचा त्रास असू शकतो. त्यामुळे त्याला श्वास घेण्यास त्रास होत होता. तर तज्ञांचं म्हणणं आहे की गरम लोखंडी रॉडनं चटके देण्याला कोणताही वैज्ञानिक आधार नाही, ते मुलांसाठी खूप धोकादायक ठरू शकतं. मुलाचा खरा आजार शोधण्यासाठी 2D इको चाचणी आवश्यक आहे, पण सध्या ही सुविधा रुग्णालयात उपलब्ध नाही.

हे ही वाचा >>PUNE: शिवशाही बसमध्ये तरुणीवर बलात्कार, वसंत मोरेंकडून डेपोत तोडफोड!

जर मुलाची प्रकृती बिघडली तर त्याला नागपूर मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये रेफर केले जाऊ शकते. लोक म्हणतात की, आजही ग्रामीण भागात काही लोक पारंपारिक बनावट उपचार आणि जादूटोण्यावर विश्वास ठेवतात, ज्यामुळे निष्पाप लोकांचे जीवन धोक्यात येते.

हे वाचलं का?

    follow whatsapp