"अपघातातून वाचल्यावर म्हणाले होते दुसरा जन्म मिळाला, दहशतवाद्यांनी तो सुद्धा हिरावून घेतला"

मुंबई तक

Pahalgam Attack: मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात कौस्तुभ गणबोटे आणि त्यांचा मित्र संतोष जगदाळे यांची पत्नी आणि मुलीसमोर गोळ्या घालून हत्या करण्यात आली.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

आयुष्यात पहिल्यांदाच पत्नीसोबत शहराबाहेर गेले होते कौस्तूभ

point

पत्नी आणि मुलीसमोर अतिरेक्यांनी घातल्या गोळ्या

point

पुण्यातील दोन कुटुंब क्षणार्धात उध्वस्त झाले

Pune News : पुण्यातील 58 वर्षीय व्यावसायिक कौस्तुभ गणबोटे यांनी आयुष्यभर कठोर परिश्रम करून स्नॅक्सचा व्यवसाय उभारला. आयुष्याच्या धावपळीपासून दूर काही शांत क्षण घालवण्यासाठी, त्यांनी आयुष्यात पहिल्यांदाच पुण्याबाहेर काश्मीरच्या खोऱ्यात जाण्याचा निर्णय घेतला. त्यांची पत्नी संगीता आणि जवळचा मित्र संतोष जगदाळे यांच्या कुटुंबासह पहलगामला गेले होते. पण ही सहल त्यांचा शेवटचा प्रवास ठरली. 

हे ही वाचा >> "आणखी 15 मिनिट थांबलो असतो तर...", नांदेंडचं जोडपं काश्मीरमधून काय म्हणालं?

मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात कौस्तुभ गणबोटे आणि त्यांचा मित्र संतोष जगदाळे यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. त्यांच्या पत्नी आणि संतोषची मुलगी आसावरी या दोघीही बचावल्या.  पण या घटनेमुळे दोन्ही कुटुंबांना मोठा धक्का बसला आहे.

आयुष्यात पहिल्यांदा पत्नीसोबत शहराबाहेर गेले 

कौस्तुभ यांचे बालपणीचे मित्र सुनील मोरे म्हणाले की, कौस्तुभने त्याच्या आयुष्यात कधीही इतकी मोठी रजा घेतली नव्हती. आठ दिवसांपूर्वीच त्याने मला सांगितलं होतं की तो काश्मीरला जाणार आहे. तो खूप आनंदात होता. तो त्याच्या पत्नीसोबत शहराबाहेर जाण्याची ही पहिलीच वेळ होती.

रास्ता पेठेच्या अरुंद गल्लीत राहणारे कौस्तुभ अलीकडेच कोंढवा-सासवड रोडवरील एका नवीन घरात राहायला आले होते. तिथेच त्यांचा एक कारखानाही होता. ते काही काळापूर्वी आजोबा झाले होते. कौटुंबिक जबाबदाऱ्यांनंतर आयुष्यातून ब्रेक घेऊन त्यांना आता आनंदात जगायचं होतं.

"वीस वर्षांपूर्वी अपघातानंतर दुसरा जन्म"

सुनील मोरे सांगितलं की, कौस्तुभ वीस वर्षांपूर्वी एका टेम्पो अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. ते म्हणायचे की मला दुसरा जन्म मिळाला. पण दहशतवाद्यांनी ते सुद्धा हिरावून घेतलं.

व्यवसायाने इंटिरियर डिझायनर असलेले संतोष जगदाळे हे कौस्तुभचे मित्रच नव्हते तर त्यांच्या व्यवसायाच्या मार्केटिंगमध्येही मदत करत होते. संगीताची आवड असलेला संतोष हार्मोनियम देखील वाजवत असे. गुरुवारी पहाटे 5:30 वाजता दोघांचेही मृतदेह पुणे विमानतळावर आणण्यात आले. केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ देखील उपस्थित होते. मृतदेह अंत्यसंस्कारापूर्वी त्यांच्या घरी ठेवण्यात आले होते. सकाळी 9 वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात आले.

हे वाचलं का?

    follow whatsapp