Swara Bhaskar : महाकुंभ आणि 'छावा' बद्दलच्या पोस्टमुळे वाद, स्वरा भास्कर स्पष्टीकरण देताना म्हटली...

मुंबई तक

स्वरा भास्करने आपल्या पहिल्या पोस्टमध्ये लिहिलं होतं की, "500 वर्षांपूर्वी हिंदूंवर झालेल्या अत्याचारांचं चित्रण करणाऱ्या काल्पनिक चित्रपट पाहून समाज संतापला. पण चेंगराचेंगरी आणि खराब व्यवस्थेमुळे झालेल्या जीवितहानीबद्दल लोक संतापले नाहीत."

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

स्वरा भास्करने माफी मागितली?

point

छावा आणि महाकुंभ बद्दलच्या पोस्टनंतर वाद

point

स्पष्टीकरण देताना स्वरा भास्कर काय म्हणाली?

परखड मत व्यक्त करण्यामुळे नेहमी चर्चेत असणारी अभिनेत्री स्वरा भास्कर सध्या वादात सापडली आहे. अलीकडेच स्वराने सोशल मीडियावर 'छावा' चित्रपट आणि 2025 च्या महाकुंभातील चेंगराचेंगरीबाबत एक पोस्ट शेअर केली होती. स्वराची पोस्ट व्हायरल झाली आणि अनेकांच्या भावना दुखावल्या. त्यानंतर आता अभिनेत्री स्वरा भास्कने यावर स्पष्टीकरण दिलं आहे.

स्वरा भास्करने आपल्या पहिल्या पोस्टमध्ये लिहिलं होतं की, "500 वर्षांपूर्वी हिंदूंवर झालेल्या अत्याचारांचं चित्रण करणाऱ्या काल्पनिक चित्रपट पाहून समाज संतापला. पण चेंगराचेंगरी आणि खराब व्यवस्थेमुळे झालेल्या जीवितहानीबद्दल लोक संतापले नाहीत. बुलडोझरने मृतदेह काढून टाकण्यात आले, त्यावरुन कुणी चीडलं नाही. समाजाचं मन आणि आत्मा मृत झालेला आहे." विकी कौशलने अभिनय केलेल्या छावा चित्रपटाची सध्या देशभरात चांगलीच चर्चा सुरू आहे. त्या चित्रपटाचं मोठं कौतुक केलं जातंय. त्यामुळेच लोकांच्या भावना दुखावल्या.

हे ही वाचा >> Buldhana : शेतात 10 गुंठ्यावर अफूची लागवड, पोलीस हादरले, बुलढाण्यात मोठी कारवाई, कोट्यवधींचा...


स्वराने केले्ल्या या पोस्टमुळे तिला मोठ्याप्रमाणात ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं. त्यानंतर आता स्वरा भास्करने तिच्या पोस्टवर स्पष्टीकरण दिलं आहे. स्वराने म्हटलं, 'माझ्या ट्विटमुळे खूप वादविवाद आणि गैरसमज निर्माण झाले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या परंपरेचा आणि त्यांच्या योगदानाचा मी निःसंशयपणे आदर करते. पण माझा दृष्टिकोन असा आहे की, इतिहासाचा गौरव करणे ठीक आहे, पण सध्याच्या चुका लपवण्यासाठी या गौरवाचा वापर करू नका." 

हे ही वाचा >> Thane Crime News : महिलांना गोड बोलण्यात अडकवून दागिने चोरायचे, गुजरातच्या दोघांना अटक

स्वराने पुढे असंही लिहिलं की, 'माझ्या पहिल्या ट्विटमुळे जर कुणाचं मन दुखावलं असेल, तर मी त्याबद्दल माफी मागते.' ज्याप्रमाणे कोणत्याही भारतीयाला अभिमान आहे, तसाच मलाही आपल्या इतिहासाचा अभिमान आहे. आपला इतिहास आपल्याला एकत्र आणेल आणि एका चांगल्या उद्यासाठी लढण्याची ताकद देईल.

हे वाचलं का?

    follow whatsapp