वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेसोबत तुरुंगात काय घडलं? दोन टोळ्या भिडल्याच्या माहितीनंतर खळबळ
Beed Crime News : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असलेला वाल्मिक कराड हा सध्या बीड जिल्हा कारागरामध्ये नऊ नंबरच्या बराक मध्ये आहे. त्याचबरोबर हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले आणि इतर आरोपीही इथेच आहेत.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

सुदर्शन घुले आणि वाल्मिक कराड यांना मारहाण

तुरूंगात दोन टोळ्यांमध्ये वाद झाल्याची माहिती

बराक नंबर 9 मध्ये नेमकं काय घडलं?
Beed Crime News : बीडमध्ये गुन्हेगारीच्या घटनांची मालिका कायम सुरू आहे. जिल्हाभरात मागच्या काळात घडलेल्या घटनांची राज्यभर चर्चा सुरू आहे. खून, खंडणी, मारहाण, धमक्या आणि थेट बॉम्बस्फोटाच्या घटनेनं बीड अक्षरश: बिहार झाल्याची टीका होतेय. आता पुन्हा एक घटना समोर आली आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांना थेट तुरूंगातच मारहाण झाली आहे.
हे ही वाचा >> Raj Thackeray : छावा सिनेमाचा फिव्हर ते औरंगजेबाची कबर, राज ठाकरे यांनी 'तो' नरेटीव्ह हाणून पाडला?
बीड जिल्हा कारागृहात दोन टोळ्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली. शाब्दिक चमकीनंतर दोन टोळ्यांमध्ये वाद झाल्याची माहिती आहे. यावेळी वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेला मारहाण झाल्याची माहिती आहे. बापू आंधळे हत्या प्रकरणातील आरोपी महादेव गीते आणि अक्षय आठवले यांच्याकडून तुरूंगात या दोघांना मारहाण झाल्याची सूत्रांची माहिती आहे. आज सकाळी साडेदहाच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असलेला वाल्मिक कराड हा सध्या बीड जिल्हा कारागरामध्ये नऊ नंबरच्या बराक मध्ये आहे. त्याचबरोबर हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले आणि इतर आरोपीही याच जिल्हा कारागरामध्ये आहेत. याच कारागृहामध्ये परळीतील सरपंच बापू आंधळे हत्या प्रकरणातील आरोपी महादेव गीते देखील या जिल्हा करागरामध्ये आहेत.
हे ही वाचा >> बीडमध्ये धमक्या देणाऱ्या तरूणाला दगडाने ठेचून संपवलं, स्वप्निल देशमूखचा 'त्याच' झाडाखाली शेवट
आरोपी वाल्मिक कराड आणि महादेव गीते यांचे जुनेच वाद आहेत. दोघंही एकमेकांचे राजकीय विरोधक आहेत. बापू आंधळे यांची भर दिवसा चौकामध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी महादेव गीते आणि इतर आरोपींवरती गुन्हा दाखल करण्यात आला होता.