'कबर ठेवा.. जगाला दाखवा आम्हा मराठ्यांना संपवायला आलेला इथे गाडला', औरंगजेबाची कबर आणि राज ठाकरेंचं सडेतोड भाषण!

मुंबई तक

औरंगजेबाच्या कबरीवरून वाद घालणाऱ्यांवर राज ठाकरेंनी जोरदार टीका केली आहे. यावेळी त्यांनी हे स्पष्टपणे सांगितलं की, औरंगजेबाची कबर ठेवा आणि आपला इतिहास जगाला समजू द्या.

ADVERTISEMENT

औरंगजेबाची कबर आणि राज ठाकरेंचं सडेतोड भाषण!
औरंगजेबाची कबर आणि राज ठाकरेंचं सडेतोड भाषण!
social share
google news

Raj Thackeray speech: मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या निमित्ताने (30 मार्च) मुंबईतील शिवाजी पार्क येथे आयोजित जाहीर सभेत जोरदार भाषण केलं. यावेळी त्यांनी औरंगजेबाची कबरीबाबत एकदम सडेतोड भूमिका घेतली. 'औरंगजेबाची कबर ठेवा, आम्ही कोणाला गाडलाय हे जगाला दिसू दे.' असं म्हणत राज ठाकरेंनी कबरीच्या वादावर त्यांची भूमिका काय ते स्पष्ट केलं. 

आपल्या भाषणात राज ठाकरेंनी नेमका इतिहास काय आणि त्यावेळी महाराजांनी घेतलेले राजकीय निर्णय काय हे सांगत अनेक गोष्टींचा उहापोह केला. पाहा राज ठाकरे नेमकं काय-काय म्हणाले.  

'शिवाजी महाराजांच्या समोर संभाजी महाराजांनी औरंगजेबाची 5 हजारी मनसबदारी स्वीकारलेली...'

'आग्र्याच्या दरबारात शिवाजी महाराजांच्या समोर संभाजी महाराजांनी औरंगजेबाची 5 हजारी मनसबदारी स्वीकारलीय. शिवाजी महाराजांचा होकार असल्याशिवाय होईल? पण आता दरबारात अडकलोय. आता स्विकारू नंतरचं नंतर बघू.. राजकारण असतं ते. परिस्थिती काय आहे, कोणत्या परिस्थितीत काय निर्णय घ्यावे. आपण पाहणार आहोत की नाही ते.'

हे ही वाचा>> 'WhatsApp वर इतिहास वाचू नका..' राज ठाकरेंनी औरंगजेबाच्या कबरीवरून थेट...

'शिवाजी महाराजांसाठी जो माणूस आला होता मिर्झाराजे जयसिंग. रजपूत.. हिंदू होता ना.. ज्या सिंहगडावर तानाजी मालुसरेंचा मृत्यू झाला ते कोणाबरोबरच्या लढाईत झाला? तर उदयभान राठोडबरोबरच्या लढाईत झाला. तो पण रजपूत होता ना.. काय घेऊन बसलोय आपण..कोणत्या काळात जगतो आहोत आपण.' 

'शिवाजी महाराजांच्या जन्माच्या अगोदरचा काळ वेगळा होता नंतरच काळ वेगळा आहे. मी परत एकदा सांगतो औरंगजेब विषय निघालाय म्हणून..' असं राज ठाकरे म्हणाले. 

'आम्हा मराठ्यांना संपवायला आलेला औरंगजेब इथे गाडला गेला.'

औरंगजेबाच्या कबरीबाबत बोलताना राज ठाकरे म्हणाले, 'औरंगजेब बादशाह याचं राज्य अफगाणिस्तानपासून दक्षिणेपर्यंत आणि इथे बंगालपर्यंत. शिवाजी महाराज जेव्हा आग्र्यावरून जेव्हा सुटले महाराष्ट्रात जेव्हा आले त्यानंतर राज्याभिषेक झाला 74 साली आणि 1680 साली महाराजांचं निधन झालं.' 

'त्यादरम्यान औरंगजेबाचा एक मुलगा महाराज गेल्यानंतर दक्षिणेत आला आणि औरंगजेबाच्या मुलाला शह.. म्हणजे राहायला जागा, बरोबर घेतलं हे संभाजीराजांनी घेतलंय. तो सुद्धा पळून आलाय. वाचा जरा इतिहास वाचा. औरंगजेब जेव्हा आग्र्यावरून निघालाय... महाराज गेले 1680 साली आणि औरंगजेब महाराष्ट्रात पोहचला 1681 साली.' 

'1681 ते 1707.. तो 27 वर्ष महाराष्ट्रात लढत होता. आमच्या संभाजी महाराजांबरोबर लढला, त्यांना क्रूर पद्धतीने मारलं. राजाराम महाराज लढले, संताजी-धनाजी लढले आणि आमच्या ताराराणी साहेब लढल्या.'

हे ही वाचा>> MNS: 'कुंभमेळ्याला गेलेले लाखो लोक...', राज ठाकरेंची पुन्हा एकदा तुफान टीका

'एक महाराष्ट्राचे खूप मोठे लेखक होऊन गेले.. नरहर कुरुंदकर त्यांच्या एका पुस्तकात एक अप्रतिम वाक्य आहे. की, मराठे सर्व लढाया हरत होते. पण औरंगजेब एकही लढाई जिंकू शकत नव्हता. याचं कारण.. शिवाजी महाराजांचं निधन झाल्यावर औरंगजेबाने माघारी जायला हवं होतं आग्र्याला..'

'नाही... तो इथे का थांबला? एवढ्या मोठ्या बलाढ्य प्रदेशाचा राजा, शहेनशाह हा एका अडीच-साडेतीन जिल्ह्याच्या राजासाठी इथे ठाण मांडून का बसला?'

'त्याला माहिती होतं शिवाजी महाराजांचं निधन झालंय. मग का ठाण मांडून बसला होता? त्याला शिवाजी महाराज नावाचा विचार मारायचा होता. जो त्याला जमला नाही. सगळे प्रयत्न केले आणि शेवटी इथे मेला..' 

'जगाच्या इतिहासात औरंगजेब वाचला जातो. अभ्यास केला जातो त्याचा.. पण ज्यावेळेस त्याचा अभ्यास केला जातो तेव्हा जगभरातील लोकांना कळतं की, तो काय करायला गेला होता आणि कसा मेला..' 

'तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव येतं जगभरात. जी कबर आहे ना.. ती सजवलेली काढून टाका.. फक्त कबर दिसली पाहिजे आणि तिथे एक मोठा बोर्ड लावा.. आम्हा मराठ्यांना संपवायला आलेला औरंगजेब इथे गाडला गेला. हा आमचा इतिहास...' असं म्हणत राज ठाकरेंनी कबरीवरून वाद घालणाऱ्यांचा आपल्या ठाकरी शैलीत समाचार घेतला.

'प्रतापगडावर शिवाजी महाराजांच्या होकाराशिवाय अफजलखानला पुरला नसेल..'

राज ठाकरे पुढे असंही म्हणाले की, 'अफजल खान जेव्हा इथे आला आणि प्रतापगडावर मारला गेला तिथेच त्याची खाली कबर खोदली गेली. तिथेच त्याला पुरला मराठ्यांनी.. फार अप्रतिम तो शब्द आहे ना.. पुरून उरीन.. तो तोच आहे. तो जो पुरला तिकडे अफजलखानाला.. तो शिवाजी महाराजांच्या होकाराशिवाय पुरला नसेल. त्याची कबर जी केलीए ती महाराजांना विचारल्याशिवाय केली नसेल.' 

'महाराजांनी सांगितलं असेल निश्चित करा.. जगाला कळू दे कोणाला मारलाय.. अहो ज्या आपण मराठ्यांनी, महाराष्ट्रानी ज्यांना-ज्यांना गाडलंय त्यांची प्रतिकं नेस्तनाबूत करून चालणार नाही. जी जगाला दाखवलंय पाहिजं आम्ही यांना गाडलंय.' 

'इस्त्रायलची खूप मोठी संघटना आहे मोसाद.. त्याचं पुस्तक आहे. त्यातील एक ओळ खूप अप्रतिम आहे. त्यात असं आहे की, आम्ही अनेक स्मारकं बांधली इस्त्रायलमध्ये. पण अनेक लोकांची आम्ही स्मारकं बांधली नाहीत. कारण ते कृत्य आम्ही केलंय असं जगाला वाटेल. म्हणून आम्ही ते बांधलं नाही. असा विचार ते करतात.' 

'आणि आम्ही कोणाला गाडलंय हे जगाला दाखवायचं नाही? खरं तर शाळेतील लहान मुलांच्या तिकडे ट्रिप घेऊन गेल्या पाहिजे. लहान मुलांना सांगितलं पाहिजे महाराजांनी याला गाडला. हा आपल्यावर आला होता, आपल्या धर्मावर उलटला होता. हा आमची मंदिरं पाडत होता, हा आमच्या आया-बहिणींची अब्रू लुटत होता. याला आम्ही गाडला.' असं ते म्हणाले.

'महाराष्ट्रातील सर्व तरुण-तरूणींना व्हॉट्सअॅपवर इतिहास वाचायचा बंद करा'

'नाहीतर पुढच्या पिढ्यांना आपण काय इतिहास सांगणार होतो. महाराष्ट्रातील सर्व तरुण-तरूणींना सांगणं आहे की, व्हॉट्सअॅपवर इतिहास वाचायचा बंद करा. इतिहास जेव्हा तुम्हाला जातीतून सांगण्याचा कोणी तरी प्रयत्न करेल त्यावेळेला लक्षात ठेवा की, तो कोणत्या ना कोणत्या पक्षाला बांधील असेल.' 

'तुमची फक्त माथी भडकवण्यासाठी याचा वापर करतात. तुम्ही एक होऊच नये, मराठी म्हणून एक येऊच नये.. महाराष्ट्र म्हणून एक येऊ नये यासाठी हे प्रयत्न सुरू असतात.मुळात विषय वेगळे असतात. पण असे विषय काढून तुम्हाला भरकटवलं जातं. वेगळीकडे नेलं जातं.. आम्ही तिकडे बघतो आणि बाकीचे इकडे काम आटोपून घेतात. मधल्या मध्ये अदाणींना जमीन पण मिळून जाते.' 

'मुंबईचा विमानतळ दिला अदाणींना, नवी मुंबईचा दिला अदाणींना.. आता पालघरचा दिला अदाणीला, तिकडचं बंदर दिलं अदाणीला.. अदाणी हुशार निघाला आम्ही अडाणी निघालो.' 

'कित्येक गोष्टी आहेत ज्या विधानसभेत बोलल्या जाऊ नये? लाडकी बहीणचं काय झालं. काही नाही.. बंद होणार ती योजना.. माझं खरं सांगून तुम्हाला पटलं नाही. त्यांचं खोटं सांगून तुम्हाला पटलं. काय कमाल आहे. महत्त्वाचे जे विषय आहे याकडे दुर्लक्ष करून आम्ही कुठे भरकटायचं.. विधानसभेत चर्चा कशावर औरंगजेबावर..' असं म्हणत राज ठाकरेंनी या सगळ्या वादावर जोरदार टीका केली. 

'मी तुम्हाला मुद्दाम सांगतोय तुर्कस्थान आताचा टर्की हा देश तलवारीच्या धारेवर, धर्माच्या धारेवर उभा राहिला. सगळीकडे आक्रमणं केली. हा औरंगजेब याचे सगळे आहेत ना बाबर वैगरेपासून सगळे.. हे सगळे तुर्की मंगोलियन आहेत. आपण ज्यांना मुघल म्हणतो ना मोघल म्हणजे मंगोल.. हा तुर्की मंगोल आहे.' 

'सगळा मुस्लिम धर्म जगभर पसरविण्याचा प्रयत्न हा तलवारीच्या जोरावर झाला. नंतर धर्माच्या आधारावर तुम्हाला देश नाही उभा करता येत. हे अनेक देशांना समजलं. त्यातील पाहिला टर्की.' 

'तिकडे 1922 साली केमाल पाशा नावाचा माणूस आला आणि केमाल पाशाने तुर्कस्थानचं अख्खं चित्र पालटून टाकलं. 1938 साली ते गेले. त्यानंतर जे-जे आले तिथे इस्लाम.. इस्लाम हा म्हणण्यापुरता आहे. तिथे मशिदी वैगरे सगळं आहे. पण तिथे धर्म रस्त्यावर दिसत नाहीत. कारण त्यांच्या लक्षात आलं की, धर्मामुळे देशाची प्रगती होणार नाही.' असंही राज ठाकरे यावेळी म्हणाले.

हे वाचलं का?

    follow whatsapp