धनंजय मुंडेंनी नैतिकतेवर राजीनामा दिला नाही, म्हणाले 'मी तर...' 'या' प्रतिक्रियेचा अर्थ काय?
दोन महिने चाललेल्या संघर्षानंतर संतोष देशमुख यांची हत्या करताना आरोपींनी केलेल्या क्रूरतेची दृष्य काल 3 मार्चला समोर आली आणि महाराष्ट्र संतापला. या संपूर्ण वातावरणानंतर अखेर 4 मार्चला सकाळी धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

संतोष देशमुख यांच्या फोटोबद्दल काय म्हणाले धनंजय मुंडे?

धनंजय मुंडेंनी वैद्यकीय कारणास्तव दिला राजीनामा?

मोठ्या घडामोडींनंतर धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख यांची हत्या करतानाचे फोटो काल राज्यभर वाऱ्यासारखे पसले आणि संतापाची लाट निर्माण झाली. त्यानंतर राजकीय वर्तुळातही खळबळ माजली आणि धनंजय मुंडे यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव वाढला. त्यानंतर आज सकाळी धनंजय मुंडे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: माध्यमांसमोर येऊन नैतिकतेच्या आधारावर हा राजीनामा आपल्याकडे देण्यात आला असून, आपण तो राजीनामा राज्यपालांकडे देणार असल्याचं सांगितलं. तसंच त्यानंतर धनंजय मुंडे यांनीही आपल्या राजीनाम्याची माहिती आपल्या सोशल मिडिया हँडल्सवरुन प्रसिद्ध केली.
हे ही वाचा >>Dhananjay Munde Profile : फडणवीसांच्या मंत्रिमंडळातील पहिली विकेट, कोण आहेत धनंजय मुंडे? A टू Z कारकीर्द
धनंजय मुंडे यांनी संतोष देशमुख यांच्या समोर आलेल्या दृष्यांबद्दल म्हटलंय की, "बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, ही माझी पहिल्या दिवसापासूनची ठाम मागणी आहे. काल समोर आलेले फोटो पाहून तर मन अत्यंत व्यथित झाले. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून आरोपपत्र न्यायालयात दाखल झाले आहे. तसेच, न्यायालयीन चौकशीही प्रस्तावित आहे."
हे ही वाचा >>Dhananjay Deshmukh : गृहमंत्रालयाला सगळे फोटो, सगळी घटना माहिती होती, एवढे दिवस का थांबले?
राजीनाम्याच्या निर्णयाबद्दल बोलताना धनंजय मुंडे म्हणाले, "माझ्या सदसद् विवेक बुद्धीला स्मरून आणि मागील काही दिवसांपासून माझी प्रकृती ठीक नसल्याने पुढील काही दिवस उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे त्यामुळे वैद्यकीय कारणास्तव सुद्धा मी मंत्रिमंडळातून माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा मा. मुख्यमंत्री महोदयांकडे दिला आहे."