एकनाथ शिंदे यांची संपूर्ण माहिती : पत्नी, कुटुंब, संपत्ती आणि मातोश्रीला आव्हान… असा आहे प्रवास

मुंबई तक

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

एकनाथ शिंदे! आनंद दिघे आणि ठाणे जिल्ह्याच्या चर्चेत राहणार एकनाथ शिंदे हे नाव जून 2022 मध्ये झालेल्या राजकीय भूकंपाने महाराष्ट्रातच नव्हे तर देशात पोहोचलं. शिवसेनेत सर्वोच्च स्थानी मानल्या जाणाऱ्या मातोश्री आणि ठाकरे घराण्यालाच एकनाथ शिंदेंनी आव्हान दिलं. 40 आमदारांना सोबत घेऊन बंडाचं निशाण फडकावलं आणि उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदावरून खाली खेचलं. त्यामुळे एकनाथ शिंदे एका रात्रीत देशात पोहोचले. मात्र, ठाकरेंना आव्हान देण्याची ताकद शिंदेंमध्ये कशी आली. एकेकाळी उदरनिर्वाहासाठी रिक्षाचालवणारे शिंदे मुख्यमंत्री पदापर्यंत कसे पोहोचलो. त्यांच्या कुटुंबात कोण कोण आहेत? वाचा संपूर्ण माहिती…

एकनाथ शिंदे जन्म तारीख आणि शिक्षण

पूर्वाश्रमीचे शिवसेना नेते आणि महाराष्ट्रातील महत्त्वाचे राजकीय नेते असलेल्या एकनाथ शिंदे यांचा जन्म 9 फेब्रुवारी 1964 रोजी झाला. सातारा जिल्ह्यातील जावळी हे त्यांचं जन्मगाव. बालपणीच एकनाथ शिंदे यांचे आईवडील गावातून स्थलांतरित झाले आणि मुंबईला लागून असलेल्या ठाणे शहरात स्थायिक झाले.

एकनाथ शिंदे यांचा जन्म शेतकरी कुटुंबात झालेला. ते वारंवार याचा उल्लेखही करतात. शेतकऱ्याच्या पोटी जन्माला आलेल्या एकनाथ शिंदे यांनी ठाणे शहरातील किसन नगर येथील ठाणे महापालिकेच्या शाळेत प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं. ठाण्यातीलच राजेंद्र पाल मंगला हिंदी हायस्कूलमधून त्यांनी माध्यमिक शिक्षण पूर्ण केलं. पुढे घरच्या आर्थिक स्थितीमुळे एकनाथ शिंदेंना शिक्षण अर्ध्यावरच सोडावं लागलं. पण पुढे एकनाथ शिंदे यांनी नाशिक येथील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून बीएची पदवी घेतली.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

एकनाथ शिंदेंच्या कुटुंबात कोण कोण? दोन मुलांचं अकाली निधन

एकनाथ शिंदे आणि लता शिंदे या जोडप्याला तीन मुले झाली. दिपेश, शुभदा आणि श्रीकांत, अशी त्यांची नावं. एकनाथ शिंदे ठाण्याच्या राजकारणात स्वतःचं स्थान निर्माण करत असतानाच्या काळातच त्यांच्यावर मोठा आघात झाला होता.

एकनाथ शिंदे राजकीय जीवनात पुढे जात असताना त्यांच्यावर काळाने मोठा आघात केला. ते वर्ष 2000. एकनाथ शिंदे यांना दिपेश, शुभदा ही दोन मुलं अपघातात गमवावी लागली. 2000 साली घडलेल्या भयंकर घटनेनंतर एकनाथ शिंदे बरेच खचले होते. एकनाथ शिंदे यांचा तिसरा मुलगा श्रीकांत शिंदे यांनी डॉक्टरकीचं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर ते राजकारणात आले. श्रीकांत शिंदे सध्या हे खासदार आहेत.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

एकनाथ शिंदे यांच्या वडिलांचं नाव संभाजी नवलू शिंदे आहे, तर आईचं नाव गंगुबाई संभाजी शिंदे आहे. त्यांच्या आईचं 18 एप्रिल 2019 मध्ये निधन झालं. एकनाथ शिंदे यांच्या भावाचं नाव प्रकाश संभाजी शिंदे आहे. प्रकाश शिंदे हेही राजकारणात असून, ते नगरसेवक राहिले आहेत.

एकनाथ शिंदे ट्विटर, फेसबुक, यूट्यूब आणि इन्स्टाग्राम

एकनाथ शिंदे यांचं @mieknathshinde या नावाने ट्विटर हॅण्डल आहे. https://www.facebook.com/mieknathshinde/ हे फेसबुक पेज आहे. https://www.instagram.com/mieknathshinde/?hl=en हे एकनाथ शिंदे यांचं ट्विटर हॅण्डल आहे.

एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे यांच्यापैकी सर्वाधिक श्रीमंत कोण?

रिक्षाचालक एकनाथ शिंदे

घरची आर्थिक स्थिती हलाखीची असल्यानं एकनाथ शिंदेंनी काम करण्यास सुरूवात केली. सुरुवातीला एकनाथ शिंदेंनी ठाण्यातील वागळे इस्टेटमधील एका माशांचा कंपनीत सुपरव्हायझर म्हणून काम केलं. ती नोकरी त्यांनी फार काळ केली नाही. त्यांनी ठाण्यात ऑटो रिक्षा चालवण्यास सुरूवात केली. ऑटो रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत असतानाच एकनाथ शिंदे राजकारणाकडे झुकले.

आनंद दिघेंच्या संपर्कात आले अन्…

ठाण्यात राजकारणाकडे वळल्यानंतर एकनाथ शिंदेंनी शिवसैनिक म्हणून काम सुरू केलं. पुढे ते आनंद दिघेंच्या संपर्कात आले. वयाच्या 18 व्या वर्षी शिंदेंनी शिवसेनेत प्रवेश केला होता. पुढे आनंद दिघे यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांपैकी एक महत्त्वाचे झाले. एकनाथ शिंदे यांना वयाच्या विसाव्या वर्षी म्हणजेच 1984 साली ते किसन नगर येथील शिवसेनेच्या शाखेचे अध्यक्ष झाले. एकनाथ शिंदेंची लोकप्रियता या विभागात कायम राहिली.

एकनाथ शिंदे पहिल्या आले निवडून

शाखाध्यक्ष पदाची जबाबदारी व्यवस्थित पार पाडल्यानंतर एकनाथ शिंदेंना आनंद दिघे यांनी नगरसेवक पदाचं तिकीट दिलं. 1997 साली ते पहिल्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले. पुढे 2001 साली त्यांच्याकडे ठाणे महापालिकेचं सभागृह नेतेपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. 2002 मध्ये ते दुसऱ्यांदा निवडून आले. 2004 पर्यंत एकनाथ शिंदे नगरसेवक म्हणून काम करत होते. त्यांचं ठाणे शहरातील काम आणि पक्षाबद्दलची एकनिष्ठा पाहून आमदारकीचं तिकीट देण्यात आलं.

राज ठाकरे: उत्तम व्यंगचित्रकार ते रोखठोक राजकारणी! कसा आहे त्यांचा राजकीय प्रवास?

2004 मध्ये झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला फारसं यश मिळालं नाही. एकनाथ शिंदेंनी मात्र, ठाण्यातील वर्चस्व सिद्ध केलं. एकनाथ शिंदे विधानसभेत निवडून गेले. विधिमंडळ राजकारणात पाऊल ठेवल्यानंतर एकनाथ शिंदेंवर मोठी जबाबदारी आली. 2005 साली एकनाथ शिंदे शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख झाले.

एकनाथ शिंदेंची सुरू झालेली राजकीय कारकीर्द पुढे सुरू झाली. 2009 विधानसभा निवडणूक, 2014 विधानसभा निवडणूक अशा दोन्ही एकनाथ शिंदे ठाण्यातून पुन्हा आमदार झाले. यावेळी एक गोष्ट घडली होती, ती म्हणजे 2014 ची विधानसभा निवडणूक शिवसेनेनं स्वबळावर लढवली होती. शिवसेनेनं भाजपासून वेगळं होतं, 64 जागा जिंकल्या. निकालानंतर भाजप-शिवसेनेची सत्ता समीकरणं जुळली नाही, त्यामुळे निकाल लागल्यानंतर शिवसेना विरोधी बाकांवर बसली आणि एकनाथ शिंदे विरोधी पक्षनेते बनले. ऑक्टोबर 2014 ते डिसेंबर 2014 या काळात एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचे विरोध पक्षनेता म्हणून काम केलं.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील युती सरकारमध्ये एकनाथ शिंदे सार्वजनिक बांधकाम विकास मंत्री झाले. त्याचबरोबर 2014 ते 2019 या काळात ते ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्रीही होते. 2018 मध्ये एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या कार्यकारिणी वर्णी लागली. त्यांची शिवसेना नेता म्हणून नियुक्ती करण्यात आली.

2019 मध्ये भाजप आणि शिवसेनेनं युतीत निवडणूक लढवली. भाजपने मुख्यमंत्री पदाच अडीच अडीच वर्षांसाठी वाटून घेण्याचा शब्द दिला होता म्हणत निकालानंतर शिवसेनेनं युतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.

उद्धव ठाकरेंचा राजकीय प्रवास नेमका कसा आहे? उत्तम फोटोग्राफर ते राजकारणी म्हणून ते कसे घडले?

पुढे 2019 मध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आलं. उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात एकनाथ शिंदे नगरविकास मंत्री होते. त्याचबरोबर ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्रीही होते.

उद्धव ठाकरेंना आव्हान… शिवसेनेविरोधात बंडखोरी

21 जून 2022 रोजी एकनाथ शिंदेंनी शिवसेनेतल्या 40 आमदारांना सोबत बंडखोरी केली. शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निर्माण झालेल्या शिंदे गटाने भाजपसोबत युती करत सरकार स्थापन केलं. या सरकारमध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनले.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद आणि एकनाथ शिंदे

शिवसेनेचे सदस्यत्व स्वीकारल्यानंतर एकनाथ शिंदे अनेक आंदोलनं आणि कार्यक्रमात सहभागी झाले. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद आंदोलनात एकनाथ शिंदेंनी तुरुंगवास भोगला. 1986 मध्ये सीमा वाद आंदोलनात भाग घेतला होता. कर्नाटक पोलिसांनी अटक केलेल्या शिवसेनेच्या 100 कार्यकर्त्यांमध्ये एकनाथ शिंदेंचाही समावेश होता. त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी बेल्लारी तुरुंगात 40 दिवसांचा कारावास भोगला होता.

देवेंद्र फडणवीस : वकील ते कुशल राजकारणी, नगरसेवक ते उपमुख्यमंत्री व्हाया मुख्यमंत्री

एकनाथ शिंदे यांची संपत्ती

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रवास नोकर, रिक्षाचालकापासून सुरू झाला. एकनाथ शिंदे 9 कोटींचे मालक आहेत. त्यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, मुख्यमंत्री शिंदेंकडे 17 लाख रुपयांची जंगम मालमत्ता, तर त्यांच्या पत्नी लता शिंदे यांच्याकडे 1 कोटी 13 लाख रुपयांची जंगम मालमत्ता आहे.

यामध्ये बँक ठेवी, शेअर्स, दागदागिन्यांचा समावेश आहे. तर एकनाथ शिंदेंकडे 4 कोटी 47 लाख, तर पत्नी लता शिंदे 4 कोटी 98 लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे 17 लाख रुपयांची जंगम मालमत्ता, तर त्यांच्या पत्नी लता शिंदे यांच्याकडे 1 कोटी 13 लाख रुपयांची जंगम मालमत्ता आहे. यामध्ये 7 बँक ठेवी, शेअर्स, दागदागिन्यांचा समावेश आहे. एकनाथ शिंदेंची स्थावर मालमत्ता एकूण 4 कोटी 47 लाखांची असून, एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे यांच्या नावे 4 कोटी 98 लाखांची आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT