GBS मुळे नागपूरमध्ये एका रूग्णाचा मृत्यू, एकूण रुग्णांचा आकडा 207 वर, 20 रूग्ण व्हँटीलेटरवर
नागपूर सरकारी रुग्णालयाच्या औषध विभागाचे प्रमुख डॉ. अतुल राजकोंडावार यांनी 'आज तक'ला दिलेल्या माहितीनुसार, सध्या नागपूर सरकारी रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये जीबीएस आजाराचे दोन रुग्ण दाखल आहेत.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

GBS मुळे नागपूरमध्ये पहिला मृत्यू

राज्यातील एकूण रुग्णांचा आकडा 207

राज्यात एकूण 20 रूग्ण व्हँटीलेटरव
Nagpur GBS News : नागपुरात गुइलेन बॅरे सिंड्रोम (GBS) मुळे मृत्यूची पहिली घटना घडली आहे. शहरातील सरकारी रुग्णालयात उपचारादरम्यान एका 45 वर्षीय पुरूषाचा GBS आजाराने मृत्यू झाला. त्यामुळे आता आरोग्य विभागासमोरचं आव्हान वाढलं असून, नागरिकांमध्येही काहीशी चिंता निर्माण झाली आहे.
हे ही वाचा >> Ranveer Allahbadia : रणवीर अलाहाबादिया कुठे गायब? घराला कुलूप, फोनही बंद, काय म्हणाले पोलीस?
शहरातील पारडी कॉम्प्लेक्समधील रहिवासी असलेल्या 45 वर्षीय व्यक्तीला 11 फेब्रुवारी रोजी सरकारी रुग्णालयाच्या वॉर्ड क्रमांक 52 मध्ये दाखल करण्यात आलं होतं. रुग्णाला श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यामुळे त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं. रुग्णाला रक्तदाबाचा त्रास होता. शुक्रवारी संध्याकाळी त्यांची प्रकृती अचानक बिघडली आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
हे ही वाचा >> New India Cooperative Bank : RBI ची कारवाई, लोकांचे लाखो रुपये बँकेत अडकले, रांगेतील लोकांच्या वेदनादायी कहाण्या
नागपूर सरकारी रुग्णालयाच्या औषध विभागाचे प्रमुख डॉ. अतुल राजकोंडावार यांनी 'आज तक'ला दिलेल्या माहितीनुसार, सध्या नागपूर सरकारी रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये जीबीएस आजाराचे दोन रुग्ण दाखल आहेत. जीबीएस आजारामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर 1 रुग्ण गंभीर अवस्थेत आहे.
जीबीएस म्हणजे काय?
गुलियन-बॅरे सिंड्रोम (GBS) हा एक दुर्मिळ न्यूरोलॉजिकल आजार आहे ज्यामध्ये रुग्णाला अचानक सुन्नपणा आणि स्नायू कमकुवतपणा जाणवू लागतो. त्याच्या मुख्य लक्षणांमध्ये हात आणि पायांमध्ये तीव्र अशक्तपणा आणि सुन्नपणा समाविष्ट आहे. जीबीएस संसर्गाचे मुख्य कारण कॅम्पिलोबॅक्टर जेजुनी (Campylobacter Jejuni) नावाचा जीवाणू असल्याचे मानले जाते, जो दूषित अन्न आणि पाण्यात आढळतो.
आरोग्य विभागाने विशेषतः या भागातील लोकांना पाणी उकळून आणि गाळून पिण्याचा सल्ला दिला आहे. संक्रमित भागात पाण्याच्या स्रोतांचे निरीक्षण वाढवण्यात आले आहे आणि संशयास्पद लक्षणे असलेल्या लोकांना ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.