पुण्याच्या पोर्शे कार अपघातासारखीच घटना! मद्यधुंद तरूण, 120 चा स्पीड, भीषण अपघाता तिघांचा मृत्यू, 5 जखमी
मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवणाऱ्या तरूणाचं नाव रक्षित चौरसिया असं आहे. तो उत्तर प्रदेशातील वाराणसीचा रहिवासी असून, वडोदरा येथील एका विद्यापीठात कायद्याचं शिक्षण घेतोय. अपघातानानंतर तो "ओम नम: शिवाय, ओम नम: शिवाय, अजून एक राऊंड" म्हणत राहिला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

दारू पिऊन 120 च्या स्पीडने चालवली कार

एकाच कुटुंबातील 3 जणांचा जागीच मृत्यू

अपघातानंतर मद्यधुंद तरूण काय ओरडला?
Gujarat Vadodara Car Accident : काही महिन्यांपूर्वी पुण्यातील पोर्शे अपघाताचं प्रकरण देशभरात गाजलं होतं. धनाड्या बापाच्या लेकानं केलेला प्रताप पाहून अनेकजण संतापले होते. त्यानंतर आता गुजरातच्या वडोदरामध्ये तशीच घटना घडली आहे. वडोदरा शहरात एका 20 वर्षीय तरुणानं कारने चार जणांना धडक दिल्यानं भीषण अपघात घडला. या अपघातात एकूण तीन जणांचा मृत्यू झाला आहे.
हे ही वाचा >> Mumbai Police : नियम मोडणाऱ्यांचा रंग उतरवला, मुंबई पोलिसांनी वसुल केला पावणे 2 कोटी रुपयांचा दंड
एकाच कुटुंबातल्या तिघांचा मृत्यू
वडोदरामध्ये गुरुवारी रात्री 12.30 वाजेच्या सुमारास कारलीबाग परिसरात ही घटना घडली. सुरतच्या दिंडोलीमध्ये राहाणारं एक कुटुंब फिरायला पावागढमध्ये गेलं होतं. तिथून परतत असताना घडलेल्या अपघातात, कुटुंबातील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. इतर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
मद्यधुंद चालक अपघातानंतर काय ओरडला?
मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवणाऱ्या तरूणाचं नाव रक्षित चौरसिया असं आहे. तो उत्तर प्रदेशातील वाराणसीचा रहिवासी असून, वडोदरा येथील एका विद्यापीठात कायद्याचं शिक्षण घेतोय. अपघातानानंतर तो "ओम नम: शिवाय, ओम नम: शिवाय, अजून एक राऊंड" म्हणत राहिला. आरोपीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील दुसरा आरोपी, जो कारचा मालक आहे आणि अपघाताच्या वेळी चौरसियासोबत होता, त्यालाही अटक करण्यात आली आहे. मित चौहान असं त्याचं नाव असून, तो वडोदराचा रहिवासी आहे.
अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पुढची कारवाई सुरू केली. अग्निशमन विभागाने फायर कटरने वाहनाचा काही भाग कापून मृतदेह बाहेर काढले. एकूण आठ जणांपैकी पाच जणांना वडोदरा येथील सयाजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
हे ही वाचा >> Beed : "...म्हणून मी जीवन संपवतोय", त्रास देणाऱ्यांची नावं लिहून फेसबूक पोस्ट करत शिक्षकाचं टोकाचं पाऊल, बीड हादरलं
मृतांमध्ये 24 वर्षीय विनय पटेल, दीपिकाबेन पटेल आणि हितेश पटेल यांचा समावेश आहे. तर चिराग पटेल, घृव पटेल, विनय पटेल, जगदीश पटेल, नीरजबेन पटेल हे जखमी झाले आहेत.