Holi 2025 : 'या' 5 लोकांनी होळीच्या रंगांपासून राहा दूर, नाही तर होईल रंगाचा बेरंग

मुंबई तक

Holi 2025 : कुणाला सर्दी, खोकला, ताप किंवा इतर आजार असल्यास त्यांनी रंगांच्या संपर्कात येणे टाळावं. रंगांमधील रसायनं त्यांची प्रतिकारशक्ती आणखी कमकुवत करू शकते.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

होळी खेळताना कुणी कुणी घ्यावी काळजी?

point

व्हायरल इन्फेक्शन झालेल्या लोकांनी काय करावं?

देशभर आज मोठ्या उत्साहात रंगांचा सण साजरा केला जातोय. प्रत्येकजण या रंगात रंगून जाण्यासाठी उत्सुक असतो. होळी हा सण रंग आणि आनंदाचं प्रतीक आहे. मात्र, रंगांचा हा सण प्रत्येकासाठी सुरक्षित नाही. काही लोकांनी होळीच्या रंगांपासून दूर राहिलेलंच बरं असतं. कारण ते त्यांच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम करू शकतात. त्यामुळे काही लोकांनी दूर राहिलेलंच बरं.

1. त्वचेची ऍलर्जी असलेले लोक

रासायनिक रंगांमध्ये असलेले हानिकारक घटक त्वचेसाठी अत्यंत हानिकारक असू शकतात, ज्या लोकांना त्वचेवर जळजळ, रॅशेस किंवा ऍलर्जीची समस्या आहे त्यांनी हे रंग पूर्णपणे टाळावेत. रासायनिक रंगांमुळे त्वचेवर खाज आणि सूज येऊ शकते. या समस्या टाळण्यासाठी, नैसर्गिक रंग वापरा किंवा रंग पूर्णपणे टाळा.

हे ही वाचा >> Apple iPhone 17 ला मिळणार कुलिंग चेंबर, काय आहे हे भन्नाट फिचर?

2. श्वसनाचे रोग असलेले लोक

ज्यांना दमा, ब्राँकायटिस किंवा श्वसनाचे आजार आहेत त्यांनी होळीचे रंग आणि गुलालापासून दूर राहावं. हवेत उडणारा रंग श्वासातून शरिरात जाऊन फुफ्फुसांना हानी पोहोचवू शकतो. विशेषत: गुलालाची बारीक पावडर श्वसननलिकेत अडकल्यानं श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो.

3. डोळ्यांच्या समस्या असलेले लोक

ज्या लोकांना डोळ्यांशी संबंधित समस्या आहेत, संवेदनशील डोळे आहेत, डोळे लाल होणे किंवा जळजळ होणे, त्यांनी होळी खेळताना विशेष काळजी घ्यावी. रासायनिक रंग डोळ्यांत गेल्यास जळजळ, सूज आणि संसर्ग होऊ शकतो. डोळ्यांचं रक्षण करण्यासाठी किंवा रंगांपासून दूर राहण्यासाठी चष्मा घाला.

4. गर्भवती महिला

हे ही वाचा >> Personal Finance: जर क्रेडिट कार्ड धडाधड वापरलं अन्.. पाहा तुमचा कसा होऊ शकतो टप्प्यात कार्यक्रम

गर्भवती महिलांनी होळीचे रंग टाळावेत, कारण रासायनिक रंगांमध्ये असलेले विषारी पदार्थ आई आणि गर्भाच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम करतात. त्यामुळे गर्भवती महिलांनी दूर राहिलेलंच बरं.

5. व्हायरल आजार झालेले लोक

कुणाला सर्दी, खोकला, ताप किंवा इतर आजार असल्यास त्यांनी रंगांच्या संपर्कात येणे टाळावं. रंगांमधील रसायनं त्यांची प्रतिकारशक्ती आणखी कमकुवत करू शकते, त्यामुळे त्यांची प्रकृती आणखी बिघडू शकते. या लोकांनी आरोग्याला प्राधान्य देऊन विश्रांती घ्यावी.

या गोष्टी देखील लक्षात ठेवा:

  • होळी खेळताना नैसर्गिक आणि हर्बल रंग वापरा.
  • त्वचेला आणि केसांना खोबरेल किंवा मोहरीचे तेल लावा.
  • डोळे, तोंड आणि कानात रंग जाणार नाही याची काळजी घ्या.
  • गर्दीपासून दूर राहा आणि आरोग्याची विशेष काळजी घ्या.

 

हे वाचलं का?

    follow whatsapp