MS Dhoni: IPL मध्ये 6 वर्षांनी धोनी ठरला 'प्लेयर ऑफ द मॅच'; म्हणाला, "मला का दिलं...."
MS.Dhoni: चेन्नई सुपर किंग्स (CSK) चा कर्णधार महेंद्रसिंग धोनीला तब्बल 6 वर्षांनंतर 'प्लेअर ऑफ द मॅच' (POTM) हा पुरस्कार मिळाला. यानंतर एका दिग्गज खेळाडूचा विक्रमही त्याने मोडला. मॅचनंतर आणि या पुरस्कारावर धोनी नेमकं काय म्हणाला?
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

IPL मध्ये 6 वर्षांनंतर धोनी ठरला 'प्लेयर ऑफ द मॅच'

लखनऊ सुपर जायंट्स (LSG) विरुद्ध चेन्नई सुपर किंग्सचा सामना

धोनीने सामनावीर पुरस्कार मिळवून 'या' खेळाडूचा विक्रम मोडला
MS Dhoni LSG Vs CSK IPL 2025: 14 एप्रिल रोजी IPL सीझनमध्ये रंगलेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स (CSK) चा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने लखनऊ सुपर जायंट्स (LSG) च्या विरोधात मॅच फिनिशर म्हणून उत्तमरित्या भूमिका बजावली. यावेळी धोनीने LSG विरोधात 11 चेंडूंमध्ये नाबाद 26 धावांमध्ये चार चौकार आणि एक सिक्स मारला.
'प्लेअर ऑफ द मॅच' पुरस्कारासाठी निवड
14 एप्रिल रोजी झालेल्या आयपीएल सीझनमध्ये धोनीची 'प्लेअर ऑफ द मॅच' (POTM) पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. खरंतर, हा पुरस्कार मिळाल्यानंतर धोनी आश्चर्यचकित झाल्याचं दिसून आलं. त्याच्या मते, हा पुरस्कार नूर अहमदला मिळायला हवा होता. कारण, त्याने कोणतीच विकेट घेतली नसली तरी त्याच्या चार ओव्हरमध्ये त्याने फक्त 13 धावा दिल्या.
धोनीने या मॅचनंतर लेग स्पीनर प्रवीण तांबेचा एक आयपीएल रेकॉर्ड मोडला. कारण, IPL च्या इतिहासात 'प्लेअर ऑफ द मॅच' पुरस्कार मिळवणारा तांबे हा सर्वात वयस्कर खेळाडू होता.
धोनीने 'या' खेळाडूचा विक्रम मोडला
धोनीने 43 वर्षे आणि 281 दिवसांच्या वयात हे विजेतेपद जिंकले. तसेच, प्रवीण तांबेने 43 वर्षे आणि 60 दिवसांच्या वयात हे विजेतेपद जिंकले होते, याच वेळी तांबेने दिग्गज खेळाडू शेन वॉर्नचा (41 वर्षे 223 दिवस वय) विक्रम मोडला. धोनी 2019 नंतर, म्हणजेच तब्बल 6 वर्षांनंतर IPL मध्ये या पुरस्काराचा मानकरी ठरला.
या सामन्यानंतर धोनी म्हणाला, "मी विचार करत होतो की मला हा पुरस्कार (सामनावीर) का देत आहेत? कारण, नूरने खरोखरच चांगली गोलंदाजी केली."
हे ही वाचा: MS Dhoni Out Controversy: धोनीला बाद दिलं अन् गदारोळ! 'ते' दिसलं तरी थर्ड अंपायरने का बदलला नाही निर्णय?
मॅचनंतर धोनी काय म्हणाला?
धोनी पुढे म्हणाला, "सामना जिंकणे चांगले असते. अशा पद्धतीच्या टूर्नामेंटमध्ये मॅचमध्ये यश मिळावं, असं प्रत्येकालाच वाटतं. खरंतर, दुर्दैवाने पहिल्या सामन्यांमध्ये यश आमच्या पक्षात नव्हतं आणि याची बरीच कारणं असू शकतात. परंतु, आता सामना आमच्या बाजूने असणं चांगली गोष्ट आहे. यामुळे पूर्ण टीमला आत्मविश्वास मिळतो आणि आम्हाला सुधारणा करण्याची संधी मिळते. आपल्या सर्वांना माहित आहे, की जेव्हा क्रिकेटमध्ये गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होत नाहीत तेव्हा देव ते खूप कठीण करतो आणि हा खरंच एक कठीण सामना होता."
IPL 2025 च्या सात सामन्यांतील दुसरा विजय असूनही, चेन्नई सुपर किंग्ज अजूनही पॉइंट टेबलमध्ये तळाशी आहे कारण त्यांचा नेट रन रेट (NRR) फक्त तीन संघांपेक्षा कमी आहे. त्यांचा पुढील सामना 20 एप्रिल रोजी वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स (एमआय) विरुद्ध होईल. या टीमला चेन्नईने सुरुवातीच्या सामन्यात हरवले होते.