Nagpur : एकदाच 99,000 हजार भरा आणि आयुष्यभर अनलिमिटेड पाणी पुरी खा! ऑफरची तुफान चर्चा
व्हायरल झालेल्या जाहिरातीनुसार, जो ग्राहक 99,000 रुपये देणार, त्याला पाणीपुरी स्टॉलवर पुन्हा कधीही पाणीपुरीसाठी पैसे द्यावे लागणार नाहीत.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

नागपूरमध्ये पाणीपुरीवाल्यानं दिली भन्नाट ऑफर

ऑफरच्या जाहारातिची सोशल मीडियावर तुफान चर्चा

99,000 रुपयांच्या पाणी पुरीचा विषय नेमका काय?
भारतात लाखो लोक स्ट्रीट फूडवर प्रेम करतात. फिरताना, काम करताना, धावपळीत असताना आणि दुसरीकडे निवांत वेळ काढूनही आपल्याकडे स्ट्रीट फूड खाल्लं जातं. त्यातून रोज अनेकांना रोजगार मिळतात आणि मोठी उलाढालही होत असते. अशातच एका नागपूरच्या एका पाणी-पुरी विक्रेत्यानं एक अशी ऑफर आणलीये, ज्यामुळे त्याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होतेय. ग्राहकाने 99,000 रुपये भरून आयुष्यभर अमर्यादित पाणीपुरी खाण्याची ऑफर या पाणीपूर्वी विक्रेत्यानं दिली आहे.
हे ही वाचा >> Jalna Crime News : प्रेम प्रकरणातून वाद, घराबाहेर झोपलेल्या तरूणाला नेलं, खून करून जाळून टाकलं
व्हायरल जाहिरातीनुसार, जो ग्राहक 99,000 रुपये देणार, त्याला पाणीपुरी स्टॉलवर पुन्हा कधीही पाणीपुरीसाठी पैसे द्यावे लागणार नाहीत. एकही रुपया न देता, तुम्ही हवी तेवढी पाणीपुरी खाऊ शकता. या ऑफरमुळे खाद्यप्रेमींमध्ये चांगलीच चर्चा सुरू आहे. अनेकांना यामुळे आश्चर्यही वाटतंय आणि अशीही शंका येतेय, की हे खरं आहे की फक्त एक मार्केटिंग गिमिक?
@marketing.growmatics या इंस्टाग्राम पेजने ही भन्नाट ऑफर शेअर केली होती. या पोस्टला अगदी काही तासातच 16,000 हून अधिक लाईक्स मिळाले आणि कमेंट्सचा अक्षरश: पूर आला. काही वापरकर्त्यांना हा डील रोमांचक वाटला, तर काहींनी त्याच्या व्यावहारिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. एका युजरने विनोदी पद्धतीने विचारलं, "ही ऑफर माझ्या आयुष्यभरासाठी आहे की विक्रेत्याच्या आयुष्यभरासाठी?" तर दुसऱ्यानं म्हटलं, “त्याला माहित आहे की कोणीही पैसे देणार नाही, पण हे यातून त्याचं मार्केटिंग होतंय.”
हे ही वाचा >> Sanjay Raut : "पवारांकडून शिंदेंचा नाही तर महाराष्ट्र तोडणाऱ्या शाहांचा सत्कार, आम्हालाही राजकारण कळतं"
अनेकांनी अशीही शंका उपस्थित केलीय की, हा पाणी पुरीवाला जर पैसे घेऊन पळून गेला तर? मात्र, एकूणच या सर्व चर्चांमुळे पाणी पुरीवाल्याची चर्चा भरपूर होतेय. या चर्चेचा त्याला फायदा झाला, तर पाणी पुरीवाला चांगलाच मालामाल होईल अशी शक्यता आहे.