MIM चे खासदार म्हणतात, ‘शिवसेनेचे चार तुकडे झाले तर आमच्यासाठी चांगलंच’

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

MIM MP Imtiyaz Jaleel Statement on Shiv Sena: नवी मुंबई: एमआयएमचे (MIM) पहिले राष्ट्रीय अधिवेशन नवी मुंबई पार पडत आहे. याच अधिवेशनासाठी MIM चे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) ओवेसी आणि खासदार इम्तियाज जलील (imtiyaz jaleel) हे उपस्थित होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. पण यावेळी इम्तियाज जलील यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. (mim mp imtiyaz jaleel says shiv sena split into four will be good for us)

ADVERTISEMENT

‘शिवसेनेचे दोन किंवा चार गट होऊ दे.. हीच आमची प्रार्थना असून याचा फायदा आम्हालाच होणार आहे.’ असं वक्तव्य इम्तियाज जलील यांनी केलं आहे. पण त्यावरून आता शिवसैनिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे.

नेमकं काय म्हणाले इम्तियाज जलील?

हे वाचलं का?

‘शिवसेनेचे दोन किंवा चार गट होऊ दे.. हीच आमची प्रार्थना असून याचा फायदा आम्हालाच होणार आहे. शिवसेनेचा जन्म काँग्रेस राष्ट्रवादी विरोधासाठी, मात्र सत्तेसाठी उद्धव ठाकरे आघाडीत गेले. एकनाथ शिंदे यांचा सगळा रिमोट देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांच्याकडे आहे.’

मालेगाव महापालिका आयुक्तांवर गटारीचं पाणी, चहा ओतला; MIM आमदारांच्या आंदोलनातील प्रकार

‘पण या भांडणामध्ये मराठी माणसाला मागे टाकण्याचं जे प्रयत्न भाजपने केला आहे. तुम्ही एक मेसेज दिला आहे की, आम्हाला मराठी माणसांशी काही देणं घेणं नाही. उद्धव ठाकरे फक्त सत्तेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत आले. तुमच्या पक्षाचा जन्मच यासाठी झाला होता की, आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा विरोध करणार आहे.’

ADVERTISEMENT

‘म्हणून आम्ही शिवसेना स्थापन केली आहे. फक्त खुर्चीसाठी तुम्ही युती केली. आणि आता एकनाथ शिंदे जे करत आहेत. ते मराठी माणसांच्या डोक्यावर गुजराती लोकांना कसं आणून तुम्ही बसवलंय.. त्यामुळे मराठी लोकं तुम्हाला कधीही माफ करणार नाही.’ असं म्हणत इम्तियाज जलील यांनी मुख्यमंत्री शिंदेंसोबत भाजपवर देखील टीका केली आहे.

ADVERTISEMENT

औरंगाबादच्या नामांतरावरूनही राज्य सरकार टीका

यावेळी इम्तियाज जलील यांनी नामांतरावरुन देखील राज्य सरकारवर टीका केली आहे. ‘औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर नामांतर करण्यात आले. नामांतरणावरून सरकार राजकारण करत असून इतिहास चांगला किंवा वाईट होऊ शकतो. परंतु शहराचे नाव बदलून काय उपयोग होणार आहे का? शहरातील प्रश्न बदलणार आहे का? लोकांना विश्वासात न घेता हे नामकरण करण्यात आले असून आम्ही सुप्रीम कोर्टात असताना हा निर्णय दिला. याबद्दल कोणताही पक्ष बोलत नाही. मी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा देखील निषेध करतो.’ असं खासदार इम्तियाज जलील यावेळी म्हणाले.

‘माझ्यासाठी विषय संपलाय’, शरद पवारांनी MIM चा प्रस्ताव एका वाक्यात धुडकावला!

शिवसैनिकांचं खासदार इम्तियाज जलील यांच्या पोस्टरला जोडे मारो आंदोलन

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रिमोट फडणवीस आणि शाह यांच्याकडे असल्याचं खासदार इम्तियाज जलील म्हणाले. त्यांच्या याच वक्तव्याच्या निषेधार्थ आज नांदेड येथील आय टी आय चौकात उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर यांच्या नेतृत्वात जिल्हा अध्यक्ष बोंडारकर आणि शिवसेनेच्या वतीने इम्तियाज जलील यांच्या पोस्टरला जोडे मारून निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी शेकडो शिवसैनिकही उपस्थित होते.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT