“उद्धवला ओबेरॉयमध्ये घेऊन गेलो अन् विचारलं”; राज ठाकरेंनी सांगितला ‘तो’ प्रसंग

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Raj Thackeray from Gudhi Padawa Melava :

ADVERTISEMENT

मुंबई : मला आणि नारायण राणेंना (Narayan Rane) पक्ष सोडण्याची इच्छा नव्हती. पण उद्धव ठाकरेंनी लोकांना पक्ष सोडून जाण्यासाठी मजबूर केलं, असं म्हणतं मनसे प्रमुख राज ठाकरे शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. ते आज (बुधवारी) शिवाजी पार्कमध्ये मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यातून बोलत होते. यावेळी राज ठाकरे यांनी महाबळेश्वर अधिवेशनापूर्वी घडलेल्या प्रसंगाचे वर्णनं करत अनेक गौप्यस्फोट केले. (MNS Chief Raj Thackeray from Gudhi Padawa Melava, Shivaji park Mumbai)

शिवसेना तुझी की माझी हा वाद बघताना वेदना होत होत्या. मी तो पक्ष जगलो आहे. लहान असताना माझ्या शर्टावर तो वाघ असायचा. मी शिवसेना सोडताना म्हटलं होतं, माझा वाद माझ्या विठ्ठलाशी नाही तर आजूबाजूच्या बडव्यांशी आहे. तसंच ही चार टाळकी पक्ष खड्ड्यात घालणार, असंही सांगितलं होतं. कारण बाळासाहेब सोडून हे शिवधनुष्य कोणालाही पेलणार नाही. एकाला ते झेपलं नाही, आता दुसऱ्याला झेपेल की नाही माहित नाही.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

राज ठाकरेंनी सांगितला ‘तो’ प्रसंग :

मला सतत महाबळेश्वरचा प्रसंग सांगितला जातो. पण त्या प्रसंगापूर्वी अनेक प्रसंग घडले. मला भिंतीकडे दाबण्याचा प्रयत्न करत होत होता हे मला कळतं होतं. मी उद्धवला घेऊन ओबेरॉय हॉटेलला गेलो. त्याला समोर बसवलं आणि विचारलं तुला काय हवं आहे? पक्षप्रमुख व्हायचं आहे, मुख्यमंत्री व्हायचं आहे, हो. मला फक्त सांग, माझं काम काय आहे? मला फक्त प्रचाराला बाहेर काढू नका. निवडून आलेल्या लोकांनी काम करायचं नाही आणि मी प्रचाराला जाऊन काय तोंड दाखवायचं?

मला म्हणाला मला काही प्रॉब्लेम नाही. म्हटलं ठरलं? मला म्हणाला ठरलं. म्हटलं बघ. त्यानंतर आम्ही घरी आलो, बाळासाहेब झोपले होते, मी त्यांना उठवलं. मी त्यांना आज सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह केल्याचं सांगितलं. मला त्यांनी मिठी मारली आणि म्हणाले, उद्धवला बोलावं. त्याला बोलावलं तर बराच वेळ आला नाही आणि नंतर सांगितलं ते बाहेर निघून गेले. या सगळ्या गोष्टी मला बाहेर काढण्यासाठीच सुरु होतं. त्रास देऊन बाहेर कसं काढता येईल?

ADVERTISEMENT

नारायण राणेही शिवसेना सोडून गेलेच नसते… :

यावेळी राज ठाकरेंनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचाही शिवसेना सोडण्याचा प्रसंग सांगितला. ते म्हणाले, नारायण राणे बाहेर गेलेच नसते. जेव्हा त्यांचं हे सगळं ठरलं तेव्हा मी त्यांना फोन केला आणि म्हटलं नारायणराव काय करताय? म्हंटलं मी साहेबांशी बोलतो, तुम्ही जाऊ नका. मी बाळासाहेबांना फोन लावला. मला म्हणाले त्याला घरी घेऊन ये. म्हटलं नक्की ना? हो नक्की ये. पाच मिनिटांनी फोन आला, नको घेऊन येऊ त्यांना. मला मागे कोणचा तरी बोलण्याचा आवाज येत होता. उद्धव ठाकरेंनी लोकांना पक्ष सोडून बाहेर जाण्यासाठी मजबूर केलं, असा आरोप यावेळी राज ठाकरेंनी केला.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT