Mumbai : मुंबई पोलिसांकडून मोठ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, हिंदी मालिकेतील अभिनेत्रीला...

मुंबई तक

अधिकाऱ्यांनी सांगितलं की, गोपनीय माहिती मिळाल्यानंतर हॉटेलमध्ये सापळा रचला आणि महिलांना वेश्याव्यवसायात भाग पाडल्याच्या आरोपाखाली श्याम सुंदर अरोरा नावाच्या व्यक्तीला अटक केली. तसेच चार महिलांना वाचवलं.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मुंबई पोलिसांची मोठी कारवाई

point

पवई परिसरातील सेक्स रॅकटचा पर्दाफाश

point

हिंदी मालिकेतील अभिनेत्रीलाही सोडवलं

Mumbai Crime News : मुंबई पोलिसांनी पोलिसांनी एका मोठ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईमध्ये एका हॉटेलमधून चार महिलांचीही सुटका करण्यात आली असून, एका दलालालाही अटक करण्यात आली आहे.  सध्या पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत असून आरोपींची चौकशी करत आहेत अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

हे ही वाचा >> Astro: तुमच्या जन्मतारखेत लपलेले आहे नशिबाचे रहस्य, अंकशास्त्र बदलू शकतात तुमचं आयुष्य

मुंबई पोलिसांनी शुक्रवारी शहरातील पवई परिसरात एका सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आणि एका हॉटेलमधून चार महिलांची सुटका केली. एका गुप्त माहितीच्या आधारे पवई पोलिसांनी ही कारवाई केली. 

अधिकाऱ्यांनी सांगितलं की, गोपनीय माहिती मिळाल्यानंतर हॉटेलमध्ये सापळा रचला आणि महिलांना वेश्याव्यवसायात भाग पाडल्याच्या आरोपाखाली श्याम सुंदर अरोरा नावाच्या व्यक्तीला अटक केली. तसेच चार महिलांना वाचवलं.

हे ही वाचा >> Pune : स्विमिंग पूलमध्ये बुडून चिमुकल्याचा अंत, खेळायला सोडून गेले होते आजोबा...

पीडितांपैकी एकीने हिंदी टेलिव्हिजन मालिकांमध्येही काम केलं आहे. सध्या, आरोपी व्यक्ती आणि त्याच्या साथीदाराविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) आणि अनैतिक व्यवसाय (प्रतिबंध) कायद्याच्या कलमांखाली पवई पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp