Namdeo Shastri : धनंजय मुंडे यांच्यावर मीडिया ट्रायल, भगवानगड त्यांच्या पाठीशी : महंत नामदेव शास्त्री

मुंबई तक

संपूर्ण प्रकरणाचा भयंकर मोठा परिणाम वारकरी सांप्रदायावरही झाला. मागच्या अनेक दिवसांपासून धनंजय मुंडे यांच्यावर मिडियावर ट्रायल झाली आहे. 

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

भगवानगड धनंजय मुंडे यांच्या पाठिशी

point

महंत नामदेव शास्त्री यांची भूमिका

point

संपूर्ण प्रकरण हे गावातलं होतं

Bhagwangad Mahant  Namdeo Shastri : धनंजय मुंडे यांच्या पाठीशी भगवान गड भक्कमपणे उभा आहे अशी भूमिका भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी घेतली आहे. धनंजय मुंडे खंडणी घेऊन जगणारा माणूस किंवा तो गुन्हेगार नाही, त्यांची पार्श्वभूमी नाही. या संपूर्ण प्रकरणाचा भयंकर मोठा परिणाम वारकरी सांप्रदायावरही झाला. मागच्या अनेक दिवसांपासून धनंजय मुंडे यांच्यावर मिडियावर ट्रायल झाली आहे. धनंजय मुंडे हे काल रात्रीच भगवान गडावर दाखल झाले होते. यावेळी त्यांची महंत नामदेव शास्त्री यांच्यासोबत चर्चा झाली. (Bhagwangad Mahant Namdeo Shastri Supports Dhananjay Munde)

हे ही वाचा >> Nana Patole : "बीडमध्ये तर एकच वाल्मिक कराड पण पुण्यात...",DPDC मिटिंगनंतर नाना पटोलेंचा अजित पवारांवर निशाणा
 

धनंजय मुंडे हा गोपीनाथरावांचा पुतण्या आहे. सगळ्या नेत्यांसोबत तो राहिला आहे. त्याची पार्श्वभूमी ही गुन्हेगारी स्वरुपाची नाही. त्याला जाणीवपूर्वीक गुन्हेगार ठरवलं जातंय. यामध्ये वारकरी सांप्रदायाचं नुकसान झालं आहे. 700 वर्षांच्या संतांच्या कार्यावर पाणी फेरलं. जातीय सलोखा यामुळे नष्ट होतोय असंही महंत नामदेव शास्त्री महाराज म्हणाले. नामदेव शास्त्री म्हणाले, माझी आणि धनंजय मुंडे यांची बराच वेळ चर्चा झाली. राजकीय, सामाजिक, अध्यात्मिक विषयांवर आम्ही बोललो. त्याची मानसिक स्थिती समजून घेतल्यानंतर मला असं जाणवलं की, जो मुलगा राजकीय घराण्यात जन्माला आला. पक्षाचे सगळे लोक त्याचे बालमित्र आहे. त्याला गुन्हेगार का ठरवलं जातंय असा प्रश्न मला पडला असं नामदेव शास्त्री म्हणाले आहेत.

"आरोपींनाही आधी मारहाण झाली होती, ते सुद्धा दखल घेण्याजोगं"

जे गुन्हेगार असतील, त्यांचा शोध चालू आहे. ज्या लोकांनी हे प्रकरण केलं, त्यांची मानसिकता का नाही दाखवली, त्यांनाही अगोदर मारहाण झाली होती, ते सुद्धा दखल घेण्याजोगं आहे असं नामदेव शास्त्री म्हणाले. तो गावातला विषय होता, पण त्यामुळे सामाजिक सलोखा बिघडला असं महंत नामदेव शास्त्री म्हणाले. धनंजय मुंडे खंडणीवर जगणारा माणूस नाही, आम्ही त्यांच्या भक्कमपणे पाठीशी आहोत असं नामदेव शास्त्री म्हणाले आहेत. 

हे ही वाचा >>'पेनड्राईव्ह दिल्यापासून 500 लोक कोमात गेलेत..', सुरेश धसांच्या 'त्या' पेनड्राईव्हमध्ये आहे तरी काय?

महंत नामदेव शास्त्री म्हणाले, मी त्याला त्याला म्हणालो तू वारकरी सांप्रदायामध्ये असता तर एवढा त्रास सहन केल्यानंतर मोठा संत झाला असता. कारण धनंजय मुंडे यांनी घर फुटलं तेव्हा धनंजयने भरपूर सोसलं आहे. गेल्या 53 दिवसांपासून त्याची मानसिक अवस्था खालावली. त्याच्या हाताला आता सलाईन लावलेलं आहे. असं राजकारण चांगलं नाही, त्याचा फार काळ फायदा होईल असं वाटत नसल्याचं महंत नामदेव शास्त्री म्हणाले आहेत.

हे वाचलं का?

    follow whatsapp