नाना पटोलेंच्या भावावर काँग्रेस नेत्याच्या अपहरणाचा आरोप, काय आहे प्रकरण?

मुंबई तक

Nana Patole Brother Vinod Patole Series Allegation : गडचिरोली : कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांचा भाऊ विनोद पटोल (Vinod Patole) यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहे. विनोद पटोल यांनी अपहरणाचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डॉ. प्रमोद साळवे (pramod salve) यांनी केला आहे. या प्रकरणी पोलिसात तक्रारही दाखल करण्यात आली आहे. […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

Nana Patole Brother Vinod Patole Series Allegation : गडचिरोली : कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांचा भाऊ विनोद पटोल (Vinod Patole) यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहे. विनोद पटोल यांनी अपहरणाचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डॉ. प्रमोद साळवे (pramod salve) यांनी केला आहे. या प्रकरणी पोलिसात तक्रारही दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे नाना पटोले यांचा भाऊ अडचणीत सापडला आहे. यावर आता नाना पटोलेंचे भाऊ काय भूमिका मांडतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (nana patole brother vinod patole trying to kidnap series allegation by pramod salve)

Thackeray Vs Shinde: उद्धव ठाकरेंचा इशारा, एकनाथ शिंदेंना हसू अनावर, म्हणाले…

नाना पटोलेंच्या भावावर आरोप काय?

गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील कटेझरी येथील राईस मिल जबरदस्तीने हडपण्याच्या हेतूने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांचे भाऊ विनोद पटोले (Vinod Patole) यांनी गावगुंडाच्या सोबतीने आपले अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डॉ. प्रमोद साळवे यांनी केला आहे. पत्रकार परिषद घेऊन त्यांनी हा आरोप केला आहे.

शुक्रवारी चातगाव येथून गडचिरोलीकडे येत असताना बोदली गावाजवळ माझ्या कारसमोर अचानक एक कार थांबली. यावेळी दोन व्यक्तींनी मला कारबाहेर येण्यास सांगितले. कारबाहेर येताच आणखी दोन व्यक्तींनी मला शिवीगाळ करत गाडीत बसण्यासाठी जबरदस्ती करून माझा अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप प्रमोद साळवे (pramod salve) यांनी केला आहे.

Shiv Sena UBT: “मोदींची मुक्ताफळे देशाची बदनामी नव्हती तर काय?”

प्रकरण काय?

अडीच वर्षापूर्वी माझ्या बहिणीच्या कटेझरी येथील राईस मिल विक्रीचा तोंडी व्यवहार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पटोले यांचे मोठे भाऊ निवृत्त पोलीस अधिकारी विनोद पटोले यांच्या सोबत झाला होता. त्यावेळी सहा महिन्यात पैसे देण्याचे ठरले होते, मात्र तसे न झाल्याने नियमाप्रमाणे मी हा व्यवहार रद्द करीत यासंदर्भात कायदेशीर नोटीसही बजावली. मात्र, त्यांनी कोणतेही उत्तर दिले नसल्याचे म्हटले आहे.

प्रमोद साळवे यांनी विनोद पटोले सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक दामोधर मंडलवार, सुमीत कोठारी, छगन शेडमाके यांना घेऊन माझे अपहरण करण्याचा प्रयत्न केला. तसेच राईस मिल जाळून मला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप त्यांनी केला. या प्रकरणी आता प्रमोद साळवे (pramod salve) आणि विनोद पटोले या दोघांनीही एकमेकांवरोधात गडचिरोली पोलिसात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाचा तपास सुरु आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp