Varsha Gaikwad : काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांच्या निवडीला आव्हान देणारी याचिका फेटाळली, कोर्टाने काय म्हटलं?

मुंबई तक

वकील मोईन चौधरी यांच्यामार्फत दाखल केलेल्या सिद्दीकी यांच्या याचिकेत गायकवाड आणि त्यांच्या प्रचार पथकावर मतदारांना पैसे आणि काँग्रेस गॅरंटी कार्ड लाच म्हणून वाटल्याचा आरोप करण्यात आला आहे.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

वर्षा गायकवाड यांच्या विरोधातली याचिका फेटाळली

point

मुंबई उच्च न्यायालयाने याचिका फेटाळताना काय म्हटलं?

Varsha Gaikwad : 2024 च्या लोकसभा निवडणुकीत 29 व्या मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून डॉ. वर्षा एकनाथ गायकवाड या निवडून आल्या. मात्र, या निकालाला आव्हान देणारी एक याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. ही याचिका बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली.

वकील आसिफ अली सिद्दीकी यांनी दाखल केलेल्या याचिकेत निवडणूक गैरव्यवहाराचा आरोप करण्यात आला होता. लाचखोरी, लोकप्रतिनिधी कायद्याचे उल्लंघन या कारणांवरून गायकवाड यांची निवड रद्द करण्याची मागणी करण्यात आली होती. न्यायमूर्ती शर्मिला यू. देशमुख यांनी निकाल देताना असा निर्णय दिला की, याचिकेत कारवाईचे वैध कारण उघड करण्यात अयशस्वी झाले. त्यामुळे कोणत्याही ठोस पुराव्याशिवाय फक्त आरोपांच्या आधारे खटला चालवण्याची गरज नाही. त्यामुळे पुढे निकाल देताना
न्यायमूर्ती देशमुख म्हणाले, 'याचिका स्पष्ट, अचूक असणं आवश्यक आहे. पण या प्रकरणात संपूर्ण याचिकेचं वाचन करूनही कारवाईचं कारण लक्षात येत नाही, तिथे ती फेटाळली जाऊ शकते.'

हे ही वाचा >> बीडमध्ये हे चाललंय तरी काय? वाल्मिक कराडच्या बातम्या पाहणाऱ्या तरुणाला तुफान मारहाण

वकील मोईन चौधरी यांच्यामार्फत दाखल केलेल्या सिद्दीकी यांच्या याचिकेत गायकवाड आणि त्यांच्या प्रचार पथकावर मतदारांना पैसे आणि काँग्रेस गॅरंटी कार्ड लाच म्हणून वाटल्याचा आरोप करण्यात आला आहे. याशिवाय, योग्य माहिती न देता प्रचारात्मक साहित्य छापल्याचा आरोप देखील होता. असं करणं लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम १२७-अ चे उल्लंघन ठरतं. मात्र, न्यायालयाला असं आढळून आलं की, याचिकाकर्त्याने या आरोपांना सिद्ध करण्यासाठी व्हिडिओ रेकॉर्डिंग, छायाचित्रे किंवा साक्षीदारांचे जबाब यासारखे कोणतेही ठोस पुरावे सादर केले नाहीत.

स्कूटरवर फिरून रोख रकमेच्या वाटपाबाबतचे आरोप न्यायालयाला अस्पष्ट वाटले. जणू काही गाडीच्या मालकाचा आणि गायकवाडचा थेट संबंध नव्हता. त्याचप्रमाणे, गायकवाड आणि वाटप करण्यात येणाऱ्या साहित्यामध्ये स्पष्ट संबंध स्थापित करण्यात याचिकाकर्त्याला अपयश आल्याने अनधिकृत पत्रकांचा दावा फेटाळण्यात आला.

हे ही वाचा >> CM फडणवीसांसमोरच पंकजा मुंडेंनी मारला सुरेश धसांना टोमणा... मंचावर काय घडलं?

गायकवाड यांनी वकील तेजस देशमुख यांच्यामार्फत अंतरिम याचिका दाखल केली होती, ज्यामध्ये याचिका रद्द करण्याची मागणी करण्यात आली होती. खंडपीठाने गायकवाड यांची याचिका स्वीकारली आणि निवडणूक याचिका फेटाळून लावली. या निर्णयामुळे गायकवाड यांची निवडणूक वैध राहिली.

हे वाचलं का?

    follow whatsapp