देशी बॉम हल्ला…गळा चिरला,पद्दूचेरीच्या गृहमंत्र्यांच्याच नातेवाईकांचा निघृण खून
पद्दूचेरीत (paducherry) एक धक्कादायक हत्याकांड घडलंय. गृहमंत्र्यांच्याच (home minister) नातेवाईकाचा भररस्त्यात निघृण हत्या करण्यात आल्याची घटना घडलीय. 45 वर्षीय सेंथिल कुमार असे या मृत व्यक्तीचे नाव आहे.
ADVERTISEMENT
Attackers killed BJP Leader throwing bomb : पद्दूचेरीत (paducherry) एक धक्कादायक हत्याकांड घडलंय. गृहमंत्र्यांच्याच (home minister) नातेवाईकाचा भररस्त्यात निघृण हत्या करण्यात आल्याची घटना घडलीय. 45 वर्षीय सेंथिल कुमार असे या मृत व्यक्तीचे नाव आहे. तो कनुवापेट्टईच्या परीसरात राहतो आणि तो भाजपचा पदाधिकारी आहे. या घटनेनंतर मोठी खळबळ माजली आहे. हत्येनंतर अनेक भाजपचे कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले होते. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह ताब्यात घेतला आहे. तसेच पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. या घटनेनंतर पोलिस प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. (puducherry home minister relatives senthil kumar killed by throwing bomb nife attack)
ADVERTISEMENT
गृहमंत्री (home minister) नमचिवयमचे नातेवाईक सेंथिल कुमार रविवारी रात्री 9 वाजता बेकरी जवळ उभा होता. त्यावेळी सात जणांची टोळकी मोटर सायकलवरून आली होती. या टोळकीने सेंथिल कुमारला घेरत त्याच्यावर देशी ब़ॉमने हल्ला केला. या हल्ल्यानंतर त्यांनी त्याचा गळा चिरून हत्या देखील केली. हे हत्याकांड केल्यानंतर टोळकी फरार झाली होती. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच मोठी खळबळ माजली. गृहमंत्री नमचिवयम यांच्यासोबत सेंथिलचे नातेवाईक आणि शेकडो भाजप कार्यकर्त्यांनी घटनास्थळी गर्दी केली करत निषेध नोंदवला होता.
पत्नीचे परपूरूषासोबत अनैतिक संबंध, GPS ने फोडलं बिंग
पोलिसांनी (Police) मृतदेह ताब्यात घेत पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून सीसीटीव्ही फुटेजही ताब्यात घेतले आहे. या आधारावर आरोपींची ओळख पटवण्याचे काम सूरू आहे. तसेच ही टोळी नेमकी कोणत्या गॅंगची याचा तपास केला जात आहे.
हे वाचलं का?
सेंथिलच्या मागे त्याची पत्नी, 17 वर्षाची मुलगी आणि 16 वर्षाचा मुलगा असा परिवार आहे. सेंथिल यांची पार्श्वभूमी कॉग्रेसची आहे. माजी मुख्यमंत्री नारायणस्वामी यांचे ते निकटवर्तीय आहेत. गेल्या विधानसभा निवडणूकीत त्यांनी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. भाजपमध्ये मंगल निर्वाचन क्षेत्राचे ते प्रभारी होते. आणि रियल इस्टेटचा बिझनेस करायचे. त्याच्या या मृत्यूनंतर भाजप पक्ष आणि कार्यकर्त्यांमध्ये शोककळा पसरली आहे.
Crime : काळीज पिळवटून टाकणारी घटना! नवऱ्यासोबत भांडण अन् आईने 3 मुलांनाच संपवलं
दरम्यान या घटनेनंतर पोलिस प्रशासनावर अनेक सवाल उपस्थित केले आहेत. जर गृहमंत्र्यांचा नातेवाईकच राज्यात सुरक्षित नसेल तर सामान्य जनता काय सुरक्षित असणार आहे. तसेच या घटनेने राज्यात कायदा व सुव्यवस्था बिघडली आहे. सामान्य नागरीकांमध्ये या घटनेने दहशतीचे वातावरण पसरले आहे.आता या घटनेत पोलिस आरोपींना अटक करण्यात यशस्वी ठरतात की नाही हे पाहावे लागणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT