Pune : नोकरीसाठी पुण्यात आला, नोकरी न मिळाल्यानं इंजिनीअर तरूणानं सुरू केली चोरी, कसा सापडला?

मुंबई तक

एका पीजीमधून मोबाईल आणि लॅपटॉप चोरीच्या प्रकरणात, पोलीस कर्मचारी कारभारी आणि ओम कांबळे आरोपीबद्दलची माहिती मिळाल्यानंतर ते आरोपीवर लक्ष ठेवून होते.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

इंजिनीअर तरूणानं का स्वीकारला चोरीचा मार्ग?

point

पीजीमध्ये राहणाऱ्या तरूणांचे मोबाईल, लॅपटॉप चोरले

गेल्या काही वर्षांमध्ये देशात बेरोजगारीचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत जातंय. पुण्यात उच्च शिक्षण घेतलेल्या एका बेरोजगार तरुणानं नोकरी न मिळाल्यानं थेट चोरीचा मार्ग स्वीकारला. हिंजवडी पोलिसांनी 29 वर्षीय निखिल खाडे याला अटक केली आहे. त्याच्याकडून 10 मोबाईल फोन आणि 2 लॅपटॉप जप्त करण्यात आले आहेत. निखिल दोन महिन्यांपूर्वी नोकरीच्या शोधात पुण्यात आला होता, पण जेव्हा त्याला काम मिळालं नाही, तेव्हा त्यानं पीजीमध्ये राहणाऱ्या मुलांचे मोबाईल फोन आणि लॅपटॉप चोरायला सुरुवात केली.

हे ही वाचा >>Palghar : काका आणि भावानेच केला अल्पवयीन मुलीवर अत्याचार, गर्भपातही केला आणि...

निखिल खाडे हा यवतमाळ जिल्ह्यातील पुसदमधील रहिवासी आहे. पोलीस तपासात असं दिसून आलं की, त्यानं शेअर बाजारात पैसे गुंतवले होते आणि काही लोकांकडून पैसे उधारही घेतले होते. जेव्हा त्याला नोकरी मिळाली नाही आणि पैशांची गरज वाढली तेव्हा त्यानं चोरी सुरू केली.

एका पीजीमधून मोबाईल आणि लॅपटॉप चोरीच्या प्रकरणात, पोलीस कर्मचारी कारभारी आणि ओम कांबळे यांना निखिल आरोपी असल्याची गुप्त माहिती मिळाली. यानंतर पोलिसांनी त्याला हिंजवडीतील साखरे चौक परिसरातून अटक केली आणि त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून चोरीचा मोबाईल जप्त करण्यात आला. चौकशीदरम्यान निखिलने आतापर्यंत 10 मोबाईल आणि 2 लॅपटॉप चोरल्याची कबुली दिली.

हे ही वाचा >>हनिमूनच्या रात्री नवरीने केला मोठा कांड, नवऱ्या मुलाला बसला मोठा शॉक!

पोलिसांनी आरोपींकडून चोरीचा माल जप्त केला असून, पुढील तपास सुरू आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ पांचाळ यांच्या पथकानं ही कारवाई केली. या घटनेनं पुन्हा एकदा बेरोजगारीची समस्या अधोरेखित केली आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp