Pune : पोलीस आणि दरोडेखोर आमने-सामने, कोयत्यांना गोळीबाराने उत्तर, थरारात पोलीस जखमी, आरोपी अटक

मुंबई तक

पोलिसांना गुप्तचर माहिती मिळाली की, दरोडेखोर चिंचोशी गावात दरोडा टाकण्याच्या तयारीत आहेत. त्यानुसार, पोलिसांनी डीसीपी शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचला होता.

ADVERTISEMENT

दोन्ही जखमी पोलीस अधिकारी
दोन्ही जखमी पोलीस अधिकारी
social share
google news

बातम्या हायलाइट

point

खेडमध्ये पोलीस आणि दरोडेखोरांची चकमक

point

दरोडेखोरांना पकडायला गेल्यावर पोलिसांवर हल्ला

point

पोलिसांनी दरोडेखोराच्या पायावर गोळी मारत पकडलं

Pune Crime : पुण्यातील बहुल गावात झालेल्या दरोड्यानंतर दरोडेखोरांना अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर आरोपींनी हल्ला केला. या हल्ल्यात डीसीपी शिवाजी पवार आणि एपीआय प्रसन्न जराड जखमी झाले असून, त्यांच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चाकण पोलीस स्टेशन परिसरात मध्यरात्री एक ही थरारक घटना घडली.

काही दिवसांपूर्वी पुण्यातील चाकणमध्ये असलेल्या बहुलमध्ये एका वृद्ध जोडप्याच्या घरात सहा दरोडेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवून लुटमार केली. त्यांनी घरातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लुटून पळ काढला. या घटनेमुळे परिसरात घबराट पसरली आहे.

हे ही वाचा >> Maharashtra Assembly Session Live : पहिल्याच दिवशी विरोधक माणिकराव कोकाटे, धनंजय मुंडेंविरोधात आक्रमक

या प्रकरणाचा तपास करत असताना, पोलिसांना गुप्तचर माहिती मिळाली की, दरोडेखोर चिंचोशी गावात दरोडा टाकण्याच्या तयारीत आहेत. त्यानुसार, पोलिसांनी डीसीपी शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचला. पोलिसांनी दरोडेखोरांना पकडण्याचा प्रयत्न करताच त्यांनी थेट पोलिसांवर कोयत्याने हल्ला केला. अचानक झालेल्या हल्ल्यात डीसीपी शिवाजी पवार आणि एपीआय प्रसन्न जराड जखमी झाले.

दरम्यान, डीसीपी पवार यांनी स्वसंरक्षणार्थ दोन गोळ्या झाडल्या. एका आरोपीच्या पायाला गंभीर दुखापत झाली आणि त्याला घटनास्थळी अटक करण्यात आली. अंधाराचा फायदा घेऊन पळून जाणाऱ्या दुसऱ्या आरोपीचा पाठलाग करून त्याला पकडण्यात आलं.

हे ही वाचा >> Thane : 15 वर्षांपासून होतं रिलेशन, तरूणाने लग्न करण्यास नकार दिला, लग्न केल्यानंतरही ठेवत होता संबंध, तरूणीने शेवटी...

बहुल दरोडा प्रकरणातील प्रमुख आरोपी सचिन चंद्र भोसले आणि मिथुन चंद्र भोसले पोलिसांच्या रडारवर होते. चाकण पोलिसांना माहिती मिळाली होती की, ते आणखी एक दरोडा टाकण्याच्या तयारीत आहेत. सचिन भोसले हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर 9 गंभीर गुन्हे दाखल आहेत.

हे वाचलं का?

    follow whatsapp