Raju Patil : गंगेत कधीही डुबकी मारली तर पाप धुतलं जाईल, पण इथं पुण्य जास्त मिळेल, एकनाथ शिंदेंवर मनसेचा थेट निशाणा
जोपर्यंत हे असेच चालू राहील तोपर्यंत येथे काहीही होणार नाही, गँग ऑफ डोंबिवलीचा म्होरक्या ठाण्यात आहे असंही राजू पाटील म्हणाले.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

"गँग ऑफ डोंबिवलीचा म्होरक्या ठाण्यात"

एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदेंवर जोरदार हल्लाबोल

डोंबिवलीच्या 65 इमारतींंचा मुद्दा तापणार
कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील 65 बेकायदेशीर बांधकामांवर कारवाई करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. यानंतर या मुद्द्यावरुन राजकारण तापलंय. मनसे नेते आणि माजी आमदार राजू पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे खासदार पुत्र डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यावर बेकायदेशीर बांधकामाच्या मुद्द्यावरून जोरदार टीका केली. राजू पाटील म्हणाले की, बेकायदेशीर बांधकाम माफिया, कागदपत्रे बनावट करणारे आणि लोकांची फसवणूक करणाऱ्यांना ठाण्यातून आश्रय देण्यात आला आहे.
हे ही वाचा >> Sharad Pawar: "नीलम गोऱ्हेंचं वक्तव्य मूर्खपणाचं...", पत्रकार परिषदेत शरद पवार नेमकं काय म्हणाले?
राजू पाटील पुढे बोलताना म्हणाले, "तुमच्याकडे सेलिब्रिटीच्या घरी जाण्यासाठी वेळ आहे पण डोंबिवलीतील 65 इमारतींमधील रहिवाशांना भेटण्यासाठी वेळ नाही. तुम्ही पालकमंत्री आहात, नगरविकास मंत्री आहात, तुमचा मुलगा खासदार आहे. गंगेत डुबकी मारून पुण्य कमवण्यापेक्षा इथे येऊन 65 इमारतींमधल्या रहिवाशांना भेटा, तुम्हाला जास्त पुण्य मिळेल." विधानसभा निवडणुकीदरम्यान इमारत पाडण्याची धमकी देऊन संबंधित बिल्डरला काम करायला लावण्यात आलं असा आरोपही राजू पाटील यांनी केलाय.
जोपर्यंत हे असेच चालू राहील तोपर्यंत येथे काहीही होणार नाही, गँग ऑफ डोंबिवलीचा म्होरक्या ठाण्यात आहे असंही राजू पाटील म्हणाले.
राजू पाटील यांनी आपण रहिवाशांच्या पाठीशी उभं राहणार असल्याचं म्हटलं आहे. आम्ही त्यांना कायदेशीर सल्ला आणि आर्थिक मदत देणार असल्याचंही राजू पाटील यांनी म्हटलं आहे.
हे ही वाचा >>इंडिया-पाकिस्तान मॅच सुरू असतानाही 'छावा'ची डरकाळी, कमाई लय भारी!
पुढे राजू पाटील म्हणाले, दिवामध्ये एका स्लॅबसाठी 3 लाख रुपये आकारले जातात हा गंभीर आरोप आहे. दिवामध्ये आरक्षित जमिनीवर बांधकाम सुरू असल्याबद्दल तक्रार केली होती, त्यानंतर इमारतीवर कारवाई करण्यात आली होती, पण त्यानंतरही तिथे पुन्हा इमारतीचं बांधकाम सुरू झालं. यामध्ये पाच नगरसेवक आणि जोशी नावाचा एक अधिकारी भागीदार असल्याचं सांगण्यात आले. आतापर्यंत या इमारतीवर कोणतीही कारवाई झालेली नाही, पण इथल्या इमारतीला नोटीस बजावण्यात आली आहे.