Ranveer Allahbadia : रणवीर अलाहाबादिया कुठे गायब? घराला कुलूप, फोनही बंद, काय म्हणाले पोलीस?

मुंबई तक

मुंबई पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. या प्रकरणाच्या चौकशीसाठी सर्वांना चौकशीसाठी मुंबईतील खार पोलिस स्टेशनमध्ये प्रत्येकाला बोलावलं जातंय.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

रणवीर अलाहबादियाच्या वक्तव्यानं वाद

point

वादानंतर रणवीर अलाहाबादिया फरार?

point

मुंबई पोलिसांनी नेमकं काय सांगितलं?

समय रैनाच्या 'इंडियाज गॉट लेटेंट' या शोमध्ये केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर युट्यूबर रणवीर अलाहाबादिया अडचणीत सापडला आहे. शोमध्ये एका स्पर्धकाशी बोलताना, रणवीरने पालकांच्या लैंगिक जीवनाबद्दल एक प्रश्न विचारला होता, ज्यामुळे तो चांगलाच वादाच्या भोवऱ्यात सापडला. हा गोंधळ एवढा वाढला की, जनतेसोबतच राजकारणी आणि धार्मिक संघटनाही रणवीरचा निषेध करताना दिसल्या. हे प्रकरण संसदेत गेलं आणि देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये रणवीरच्या नावावर एफआयआर देखील दाखल करण्यात आला.

हे ही वाचा >> New India Cooperative Bank : RBI ची कारवाई, लोकांचे लाखो रुपये बँकेत अडकले, रांगेतील लोकांच्या वेदनादायी कहाण्या

रणवीर अलाहाबादियासह, शोचा होस्ट समय रैना, अपूर्वा मखीजा, युट्यूबर आशिष चंचलानी आणि 'इंडियाज गॉट लेटेंट' शोची टीम देखील कायदेशीर अडचणीत अडकली आहे. मुंबई पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. या प्रकरणाच्या चौकशीसाठी सर्वांना चौकशीसाठी मुंबईतील खार पोलिस स्टेशनमध्ये प्रत्येकाला बोलावलं जातंय. रणवीर अलाहाबादियालाही चौकशीसाठी पोलिसांसमोर हजर राहावं लागणार आहे. पण रणवीर पोलीस स्टेशनला पोहोचला नाही. 13 फेब्रुवारी रोजी, पोलिसांकडून दुसऱ्यांदा समन्स मिळाल्यानंतर, रणवीरने पोलिसांना आपल्या घरी येऊन स्टेटमेंट घ्यायला सांगितलं.मात्र, पोलिसांनी हे स्पष्टपणे नाकारलं.

हे ही वाचा >> Mumbai Airport : मुंबई विमानतळाचे अधिकारी हादरले... दुबईहून आलेल्या तस्करांच्या टोळीकडे सापडलं 7 किलो सोनं

त्यातच आता मुंबई पोलिसांनी एक धक्कादायक खुलासा केला आहे. रणवीर अलाहाबादिया यांने अजूनही स्टेटमेंट नोंदवलं नसून, फोन बंद असल्यानं त्याच्याशी संवादही होत नसल्याचं सांगितलंय. तसंच पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार रणवीरचं मुंबईतील घरही बंद आहे. पोलिसांचा वकिलांशीही संपर्क होऊ शकला नाही. दरम्यान, 'इंडियाज गॉट लॅटेंट'च्या टीमचा सदस्य प्रथम सागर चौकशीसाठी खार पोलिस स्टेशनमध्ये पोहोचला होता.

हे वाचलं का?

    follow whatsapp