Santosh Deshmukh Case : विष्णू चाटेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, सुनावणीला सरकारी वकीलच अनुपस्थित?

मुंबई तक

संतोष देशमुख हत्या प्रकरणात आतापर्यंत कृष्णा आंधळे वगळता इतर सर्व आरोपींना ताब्यात घेण्यात आलं आहे. विष्णू चाटे हा या प्रकरणातला महत्वाचा आरोपी असून, वाल्मिक कराडला विष्णू चाटेनेच फोन करुन दिला होता असं सांगितलं जातंय.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

आरोपी विष्णू चाटेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

point

केज न्यायालयात पार पडली सुनावणी

point

अवघ्या काही मिनिटांतच चाटेला सुनावली न्यायलयीन कोठडी

विष्णू चाटेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. विष्णू चाटे याला आज केज न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला आज 34 दिवस उलटून गेले आहेत. या काळात वेगवेगळ्या आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणहून ताब्यात घेण्यात आलं आहे. विष्णू चाटे हा या प्रकरणातला महत्वाचा आरोपी असून, आज त्याला न्यायालयीन कोठडी मिळणार की, पोलीस कोठडी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष होतं. पण धक्कादाय म्हणजे आजच्या या प्रकरणात आज सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे  हेच अनुपस्थित होते अशी माहिती समोर आली आहे. 

हे ही वाचा >> Dhananjay Deshmukh : जरांगेंचा फोन, पोलिसांचं आश्वासन... धनंजय देशमुख खाली उतरायला तयार

संतोष देशमुख हत्या प्रकरणात आतापर्यंत कृष्णा आंधळे वगळता इतर सर्व आरोपींना ताब्यात घेण्यात आलं आहे. विष्णू चाटे हा या प्रकरणातला महत्वाचा आरोपी असून, वाल्मिक कराडला विष्णू चाटेनेच फोन करुन दिला होता असं सांगितलं जातंय. त्यामुळे वाल्मिक कराडचा फोन सापडणं महत्वाचं आहे. पण अजूनही त्याचा फोन सापडलेला नाही. त्यामुळे या प्रकरणात वाल्मिक कराडचा रोल स्पष्ट व्हायला अजून वेळ लागणार असल्याचं दिसतंय.

मस्साजोगमध्ये काय घडलं? 

हे ही वाचा >> Thane Crime News : पाणी पिण्यासाठी बसमधून खाली उतरला प्रवासी, चोरट्यांनी लांबवली 2 कोटीचे दागिने असलेली बॅग

धनंजय देशमुख हे बीडमध्ये पाण्याच्या टाकीवर चढले असून, मस्साजोगमध्ये सध्या वातावरण चांगलंच तापलेलं दिसतंय. गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या घटना आणि तपास यंत्रणांवर अविश्वास व्यक्त करत मस्साजोगमध्ये आंदोलन सुरू आहे. पोलिसांनी मोबाईल टॉवरखाली मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावला होता, मात्र धनंजय देशमुख हे पाण्याच्या टाकीवर चढले, त्यामुळे पोलिसांची धावपळ झाली. या सर्व घडामोडींनंतर आता पोलीस धनंजय देशमुख यांना खाली आणण्यासाठी प्रयत्न केले. यासाठी स्वत: पोलीसही बाजूच्या दुसऱ्या टाकीवर चढले होते. त्यानंतर धनंजय देशमुख अखेर खाली उतरले आणि मनोज जरांगे यांच्याशी त्यांनी चर्चा केली. 

हे वाचलं का?

    follow whatsapp