Abu Azmi Suspended : औरंगजेबाचं कौतुक, आयशा टाकियाचे सासरे निलंबित, कोण आहेत अबू आझमी?
औरंगजेबावरील वक्तव्यामुळे अबू आझमी यांच्याविरोधात सत्ताधारी आक्रमक झालेले पाहायला मिळाले होते. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अबू असीम आझमी यांना अधिवेशन संपेपर्यंत विधानसभेतून निलंबित करण्याचा प्रस्ताव मांडला होता. त्यानंतर अबू आझमी यांना निलंबित केलं.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

औरंगजेबाचं कौतुक करणं भोवलं, अबू आझमी निलंबित

विधानसभेत तुफान राडा, सत्ताधारी आक्रमक

अबू आझमी अधिवेशन संपेपर्यंत निलंबित
Abu Azmi Suspended : सपा आमदार अबू असीम आझमी यांना अधिवेशन संपेपर्यंत विधानसभेतून निलंबित करण्यात आले. औरंगजेबावरील त्यांच्या वक्तव्यामुळे सत्ताधारी त्यांच्याविरोधात आक्रमक झालेले पाहायला मिळाले होते. अबू आझमी यांनी औरंगजेबावा उत्तम प्रशासक म्हटलं होतं. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अबू असीम आझमी यांना अधिवेशन संपेपर्यंत विधानसभेतून निलंबित करण्याचा प्रस्ताव मांडला होता. भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, त्यांना फक्त एका सत्रासाठी नाही, तर आमदारपदावरून निलंबित केलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज पूजनीय आहेत आणि त्यांचा अपमान करणाऱ्यांना इतक्या सहजपणे सोडलं जाऊ नये असं मुनगंटीवार म्हणाले. अबू आझमी यापूर्वीही अनेकदा वादात सापडले होते. सध्या औरंगजेबाच्या कौतुकामुळे वादात सापडलेल्या आझमींना एकदा आमदारानं थेट भर सभागृहात कानाखाली मारली होती.
अबू आझमींची राजकीय कारकीर्द
अबू आझमी हे राज्यसभा सदस्य देखील राहिले आहेत. 2009 च्या विधानसभा निवडणुकीत आझमी यांनी मानखुर्द शिवाजी नगर मतदारसंघातून निवडणूक लढवली. त्यांच्या विरोधात काँग्रेसचे सईद अहमद होते, ज्यांचा पराभव करून अबू आझमी पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आले.
हे ही वाचा >> Jalna Crime : जाळावर सळई तापवून दिले चटके, जुन्या वादातून केला छळ, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
2009 ला मराठीत शपथ न घेतल्यानं वाद
विधानसभा सभागृहात शपथ घेताना अबू आझमी यांनी मराठीत शपथ न घेतल्यानं वाद झाला होता. आमदारांच्या शपथविधीवेळी सर्वांनी मराठीतच शपथ घ्यावी अशी भूमिका राज ठाकरे यांच्या मनसेनं घेतली होती. तसंच मराठीत शपथ न घेतल्यास परिणाम भोगावे लागतील असा इशारा दिला होता.
त्यावेळी अबू आझमी यांनी या भूमिकेला विरोध करत हिंदीमध्ये शपथ घेण्यास सुरूवात केली होती. त्यावेळी मनसेचे सर्व 13 आमदार त्यांच्याकडे धावले आणि मनसे आमदार रमेश वांजळे, राम कदम यांनी माईक काढून त्यांना कानाखाली मारली होती.
हे ही वाचा >> Santosh Deshmukh Case : आरोपी फक्त 8 नाही, मुंडेंचा राजीनामा म्हणजे शेवट नाही? घडामोडींचा अर्थ काय?
यानंतर, 2014 च्या निवडणुकीत, समाजवादी पक्षाने पुन्हा एकदा अबू आझमी यांना मानखुर्द शिवाजी नगर मतदारसंघातून उमेदवार म्हणून घोषित केलं. या निवडणुकीत लढत शिवसेनेशी होती आणि अबू आझमी पुन्हा एकदा 41719 मतांनी आमदार म्हणून निवडून आले.
त्यानतंर अबू आझमी 2019 आणि पुढे 2024 ला पुन्हा शिवाजीनगर-मानखुर्द मतदारसंघातून निवडून येत आहेत.
आयशा टाकियाचा पती, अबू आझमींचा लेकही अडचणीत
सलमान खानच्या 'वॉन्टेड' चित्रपटातून लोकांची मनं जिंकणारी अभिनेत्री आयशा टाकिया ही अबू आझमी यांची सून असून, फरहान आझमीची ती पत्नी आहे. इकडे वडील अबू आझमी सभागृहातून निलंबित झालेले असताना, दुसरीकडे मुलगा फरहानवरही गोव्यात गोंधळ घातल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.