Jalna Crime : जाळावर सळई तापवून दिले चटके, जुन्या वादातून केला छळ, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Jalna Crime News: जालन्याच्या भोकरदन तालुक्यातील आन्वा येथील हा मारहाणीचा व्हिडीओ आहे. 27 फेब्रुवारी रोजी रात्री एका तरूणाला गरम लोखंडी रॉडचे चटके देऊन बेदम मारहाण करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

जालन्यात तरूणाला गरम रॉडने दिले चटके

जुन्या वादातून तरूणा छळ

टोळक्यानं तरूणाला घेरून दिले चटके
Jalna Crime News : बीडमध्ये असलेल्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनं महाराष्ट्र हादरला होता. त्यातच आता बीडच्या शेजारीच असलेल्या जालना जिल्ह्यातूनही एक चीड आणणारी घटना समोर आली आहे. आठवडाभरापूर्वी घडलेल्या या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. एका तरूणाला लोखंडी रॉडने गरम चटके देत छळ करतानाचा संतापजनक प्रकार या व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसतोय.
हे ही वाचा >> Pune: पुण्यात 19 वर्षीय तरूणीवर बलात्कार, भावासोबत बसवून काढले आक्षेपार्ह व्हिडीओ
जालन्याच्या भोकरदन तालुक्यातील आन्वा येथील हा मारहाणीचा व्हिडीओ आहे. 27 फेब्रुवारी रोजी रात्री एका तरूणाला गरम लोखंडी रॉडचे चटके देऊन बेदम मारहाण करण्यात आली आहे. तरुणाला लोखंडी रॉड गरम करून चटके देतानाचा व्हिडिओ समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. या प्रकरणी पारध पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. तर एक आरोपी अद्याप फरार आहे.
व्हिडीओमध्ये ज्या तरूणाला मारहाण होतेय, त्याचं नाव कैलास बोराडे असं आहे. या तरुणाला जुन्या वादातून आन्वा येथे भागवत उर्फ सोनू दौड आणि त्याचा भाऊ नवनाथ दौड यांनी लोखंडी रॉड गरम करून दिले. तसंच कैलास याला जबर मारहाण देखील करण्यात आली होती. त्यांनतर पारध पोलिसांनी या प्रकरणी भागवत उर्फ सोनू दौड आणि नवनाथ दौड या दोघांवर पोलिसात गुन्हा दाखल केला.
हे ही वाचा >> अब्दुल 2 हँड ग्रेनेड घेऊन निघालेला राम मंदिरात, घडवणार होता विध्वंस; पण...
पोलिसांनी आरोपी भागवत दौडला अटक देखील केलीय. मात्र, अद्याप पर्यंत नवनाथ दौड हा आरोपी फरार असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत. दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ आता व्हायरल झाल्यानं संतापाची लाट निर्माण झालीय.