Thane Ulhasnagar : उल्हासनगर पोलीस ठाणेत गोळीबार प्रकरणात ट्विस्ट, भाजप नेत्याच्या मुलाला क्लिन चीट, प्रकरण काय?

मुंबई तक

पोलीस ठाण्यात घडलेल्या या घटनेच्या प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. आता या गोळीबार प्रकरणात एक नवीन वळण आलं आहे. या आरोपपत्रात गणपत गायकवाड यांचा मुलगा वैभव गायकवाड याला क्लीन चिट देण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

उल्हासनगर पोलीस स्टेशनमधील गोळीबार प्रकरण

point

गोळीबाराचा सीसीटीव्ही पाहून हादरला होता महाराष्ट्र

point

तक्रालीन भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या मुलाला क्लिनचीट

तत्कालीन भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे नेते महेश गायकवाड आणि त्यांचे सहकारी राहुल पाटील यांच्यावर पोलीस ठाण्यात गोळीबार केला होता. गणपत गायकवाड यांनी सुमारे 6 राउंड गोळीबार केला होता. सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झालेला हा प्रकार पाहून महाराष्ट्र हादरला होता.

हे ही वाचा >> SYSTRA : मुंबई उच्च न्यायालयाचा MMRDA ला दणका, फ्रेंच कंपनी सिस्ट्रासोबत करारावर करावा लागणार पुनर्विचार

पोलीस ठाण्यात घडलेल्या या घटनेच्या प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. आता या गोळीबार प्रकरणात एक नवीन वळण आलं आहे. या आरोपपत्रात गणपत गायकवाड यांचा मुलगा वैभव गायकवाड याला क्लीन चिट देण्यात आली आहे. याशिवाय, दोन नवीन आरोपींची नावं समाविष्ट करण्यात आली आहेत.

या प्रकरणी उल्हासनगर न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. या आरोपपत्रात दोन नवीन आरोपींची नावं समाविष्ट करण्यात आली आहेत. नागेश बडेराव आणि कुणाल पाटील अशी आरोपींची नावं आहेत. मात्र, या आरोपपत्रात गणपत गायकवाड यांचा मुलगा वैभव गायकवाड याला क्लीन चिट देण्यात आली आहे. आरोपपत्रात नमूद केलंय की, वैभव गायकवाडविरुद्ध कोणतेही ठोस पुरावे सापडले नाहीत. गुन्ह्यात वैभवचा कोणताही सहभाग नाही, तसंच वैभव गायकवाड अजूनही फरार आहे.

हे ही वाचा >>Crime : मुलीशी मैत्री केली, खासगी क्षणांचे फोटो काढले, तेच फोटो नंतर ब्लॅकमेल करायला वापरले, पोलिसांनी ठोकल्या बेड्या

महेश गायकवाड हे तिसगाव, कल्याण पूर्वे येथील रहिवासी आहेत. केबल व्यवसायात गणपत गायकवाड यांच्याशी स्पर्धा केल्यानंतर महेश गायकवाड प्रसिद्धीच्या झोतात आले. माजी कल्याण महेश गायकवाड हे गणपत गायकवाड यांचे कट्टर विरोधक म्हणून उदयास आले. 2015 मध्ये महेश गायकवाड यांनी शिवसेनेकडून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची निवडणूक लढवली आणि नगरसेवक झाले. हळूहळू महेश गायकवाड यांनी बांधकाम उद्योगातही मोठं नाव कमावलं.वर्षभरापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर, महेश गायकवाड यांनी त्यांच्या समर्थकांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला.

हे वाचलं का?

    follow whatsapp